ह्या तऱ्हेने मिसरी लोकांची इस्राएल लोकांवर कृपादृष्टि होईल असे परमेश्वराने केले. (निर्गम ११: ३).
पापकबुली
आणि परमेश्वराने मला, माझ्या कुटुंबाला आणि करुणा सदन सेवाकार्याला सर्वांपेक्षा अधिक कृपा केली.
कृपा
तूं लोकांना सांगून ठेव की, प्रत्येक पुरुषाने आपल्या शेजाऱ्यापासून व प्रत्येक स्त्रीने आपल्या शेजारणीपासून सोन्याचांदीचे दागिने मागून घ्यावे. ह्यातऱ्हेने मिसरी लोकांची इस्राएल लोकांवर कृपादृष्टि होईल असे परमेश्वराने केले. तशांत मिसर देशांत फारोचे सेवक आणि सामान्य लोक ह्यांच्या दृष्टीने मोशे हा पुरुष अति थोर होता. (निर्गम ११: २-३).
लक्षात घ्या हे असे म्हणत नाही, "आणि लोकांनी जाणले की ते इस्राएली लोकांना काही देणे आहे" किंवा"इस्राएली लोक हे किती चांगले आहे". नाही, हे असे म्हणते,मिसरी लोकांची इस्राएल लोकांवर कृपादृष्टि होईल असे परमेश्वराने केले. ही एक अद्भुत घटना होती.
परमेश्वर हा लोकांवर सामर्थ्यहीन असा नाही. जेव्हा त्याला पाहिजे कीपरिस्थिती ही एका निश्चित प्रकारे व्हावी, तो त्या गोष्टी तशा होऊ देतो. त्याकडे सामर्थ्य आहे की परिस्थितीवर आणि लोकांच्या निर्णयावरप्रभाव टाकावा. जसे नीतिसूत्रे २१: १, म्हणते, "राजाचे मन पाटांच्या पाण्याप्रमाणे परमेश्वराच्या हाती आहे. त्याला वाटेल तिकडे तो तें वळवितो."
लक्षात ठेवा औगुस्त कैसरच्या मनात विचार आला कीएक आदेश जारी करावा की पृथ्वीवरील सर्व रहिवाश्यांची जनगणना झाली पाहिजे.ही त्याची कल्पना होती काय? नाही, परमेश्वराने त्याच्या मनाला असा निर्णय घेण्यास लावले, म्हणजे येशू ने बेथलेहेम मध्ये जन्म घ्यावा, आणि अशा प्रकारे भविष्यवाणी ही पूर्ण होईल.
परमेश्वर तुमच्या परिस्थिती मध्ये सुद्धा दखल देण्यास समर्थ आहे. आज, लोक कदाचित तुमच्याकडे एक गुलाम म्हणून पाहत असतील. परंतु उदया परमेश्वर तुमच्यावर त्यांच्या दृष्टीने कृपा करेल. आज, तुम्ही कदाचित एका चुकीच्या ठिकाणी असाल, परंतु परमेश्वर परिस्थिती आणि अंत:करणावर प्रभाव करण्याद्वारे तुमच्यासाठी त्याची इच्छा अद्भुतरित्या पूर्ण करू शकतो किंवा करेल.
मग मोशे म्हणाला, "परमेश्वर असे म्हणतो की, आज मध्यरात्रीच्या सुमारास मी मिसर देशामधून फिरेन. तेव्हा मिसराच्या सिंहासनावर बसणाऱ्या फारोपासून तो जात्यावर बसणाऱ्या दासीपर्यंत सर्वांचे ज्येष्ठ पुत्र व गुरांचेही प्रथमवत्स मरतील. (निर्गम ११: ४-५)
ही ती दुसरी वेळ होती की परमेश्वराने मोशे द्वारे ती पीडा येण्याविषयी इशारा दिला होता. जळत्या झुडूपाजवळ परमेश्वरानेमोशे ला आदेश देण्यात आला होता की फारो ला ह्या शब्दाने इशारा दे: "परमेश्वरम्हणतो, इस्राएल हा माझा पुत्र, माझा ज्येष्ठ पुत्र आहे; मी तुला सांगितले की माझ्या पुत्रास माझी सेवा करण्यास जाऊ दे; पण तूं त्यांस जाऊ देण्याचे नाकारीले; तर पाहा, मी तुझा पुत्र, तुझा ज्येष्ठ पुत्र जीवे मारीन." (निर्गम ४: २२-२३)
राजा फारो च्या आदेशा द्वारे, मिसरी लोकांनी इब्री लोकांनाहोणाऱ्या पुरुष लेकरांची कत्तल केली. आता, राजांच्याराजाच्या आदेशा द्वारे,मिसरी लोकांच्या प्रथम जन्मलेल्या पुत्रांनात्याप्रकारेच होईल.
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ३९
- अध्याय ४०