तिसरा बहाणा: त्यांनी जर ऐकले नाही तर काय? (निर्गम ४: १-३)
मोशे दहशतीमुळे गडबडला. लोकांच्या त्याच्याप्रती प्रतिक्रिया बद्दल तो विचार करीत होता. संदेष्टा यिर्मया सुद्धा हे बोलताना गडबडला होता, हे लोक कणखर आहेत, ते माझे ऐकणार नाहीत. मनुष्याचे भय अनेक लोकांना देवाचे त्यांना पाचारण, देवाची वाणी ऐकण्यापासूनदूर करते.
परमेश्वराचे प्रत्युत्तर: जेव्हा मी पूर्ण केले आहे, ते ऐकतील, माझ्यावर विश्वास ठेव.
चवथा बहाणा: मी कधीही एक चांगला बोलक्या नव्हतो. (निर्गम ४: १०-११-१२)
मोशे बोलण्यात अडखळत असे, कोण त्याच्यामागे चालेल जर तो चांगला बोलू शकत नाही? तुम्ही हे म्हणत आहात काय, तुम्हाला वरदान नाहीत.
परमेश्वराचे प्रत्युत्तर: अंदाज लाव कोणी तुझे मुख बनविले आहे? मी तुझ्या वरदानाचे स्त्रोत आहे.
पाचवा बहाणा:मला ठाऊक आहे तूं इतर कोणाला शोधू शकतो (निर्गम ४: १३-१४)
मोशेन्यूनगंड मुळे संघर्षात होता, तो स्वतःला इतर अधिक सक्षम व्यक्तींशी तुलना करीत होता, आणि मग त्याला कनिष्ठ वाटले. किती वेळा आपण स्वतःचीइतरांशी तुलना केली आहे आणि तुमच्या पाचारणास पूर्ण करण्यास थांबविले आहे.
परमेश्वराचे प्रत्युत्तर: ठीक आहे, मी अहरोन ला तुझ्याबरोबर पाठवितो......परंतु मी अजूनही तुला बोलावीत आहे. परमेश्वर लोकांना पाठवेल की तुमचे साहाय्य करावे आणि तुमचे सहकार्य करावे.
तुमच्यासाठी प्रश्न:
चांगले पुढारीपण न देण्यासाठी तुमच्याकडे कोणते बहाणे आहेत?
तुम्ही काय विश्वास ठेवता देवाचे प्रत्युत्तर हे काय असेन?
मग मोशे तेथून निघून आपला सासरा इथ्रो याच्याकडे गेला व त्याला म्हणाला, मला मिसरांतल्या माझ्या भाऊबंदांकडे परत जाऊ दयावे आणि ते अजून जिवंत आहेत किंवा नाहीत ते मला पाहू दयावे. तेव्हा इथ्रो मोशेला म्हणाला, सुखाने जा. (निर्गम ४: १८)
मोशे ने त्याच्या सासऱ्याला हे सांगितले नाही की परमेश्वराने त्यास दर्शन दिले आहे.
निर्गम ४: २४-२६ सुंता
लक्षात घ्या परमेश्वराने मोशे ला प्रथम बोलाविले याअगोदर की त्याच्याकडे सर्व काही होते. तो निराश आणि अपमानित केलेला होता परंतु तो निश्चितच सिद्ध असण्यापेक्षा कमी होता.
एक गोष्ट जी मोशे ने करण्याचे टाळले ती ही की सुंतेचा करार पाळावा जे परमेश्वराने अब्राहामाबरोबर केला होता.
उत्पत्ति १७: ९-१२, "परमेश्वराने अब्राहामाला म्हटले, आता तूं आणि तुझ्या पश्चात तुझ्या संततीने पिढ्यानपिढ्या माझा करार पाळावा. माझ्यामध्ये आणि तूं व तुझ्या पश्चात तुझी संतति यांच्यामध्ये स्थापिलेला माझा करार जो तुम्ही पाळावयाचा तो हा: तुमच्यातील प्रत्येक पुरुषांची सुंता व्हावी. तुमची अग्रत्वचा काढण्यात यावी; ही माझ्या व तुमच्यामध्ये झालेल्या कराराची खूण होईल. पिढ्यानपिढ्या प्रत्येक पुरुष आठ दिवसांचा झाला की त्याची सुंता व्हावी, मग तो तुमच्या घरी जन्मलेला असो अथवा तुमच्या बीजाचा नसलेला, परक्यांपासून पैका देऊन घेतलेला असो...."
मोशे ने तो करार पाळला नव्हता. आणि जेव्हा ते एका रात्रीच्या मुक्कामासाठी थांबले, तेव्हा त्यास त्रास झाला आणि जवळजवळ तो मरणार होता.
जेव्हा परमेश्वर तुम्हाला सेवे साठी बोलावितो, तो परिस्थितीला थोडेसे तापवितो. गोष्टी ज्या तो तुम्हाला करण्यास सांगतो, विनंती ज्या तो तुम्हाला करतो, तो अपेक्षा करतो की तुम्ही त्या कराव्या. येथे जबाबदारी वाढलेली असते, दोघांसाठी, परमेश्वर आणि मनुष्यांस. याकोब ३: १, माझ्या बंधुंनो, तुम्ही पुष्कळ जण शिक्षक होऊ नका; कारण आपल्याला अधिक दंड होईल हे तुम्हांस माहीत आहे.
तुमच्याकडे तुमच्यासाठी एक प्रमाण आणि लोकांसाठी दुसरे प्रमाण असू शकत नाही.
परुश्यांनी लोकांना काही गोष्टी करण्यास सांगितल्या परंतु त्यांनी स्वतः ते केल्या नाहीत
तेव्हा येशू लोकसमुदायांस व आपल्या शिष्यांस म्हणाला, शास्त्री व परुशी हे मोशेच्या आसनावर बसले आहेत; म्हणून ते जे काही तुम्हांस सांगतील ते सर्व आचरीत व पाळीत जा; परंतु त्यांच्या कृतीप्रमाणे करू नका; कारण ते सांगतात पण तसे आचरण करीत नाहीत. (मत्तय २३: १-३)
जर मोशे हा देवाच्या लोकांचे पुढारीपण करणार आहे, परमेश्वर त्याससिद्ध करणार नाही, परंतु तो त्याच्या जीवनातून गहन पाप आणि अवज्ञा काढून टाकेन-एका प्रकारे किंवा दुसऱ्या प्रकारे.
मोशे ची पत्नी सिप्पोरा च्या बाबतीत, तिने कसेतरी त्याची अवज्ञा आणि त्याच्या जिवावर बेतलेल्या प्रसंगाचा संबंध जोडला आणि त्यांच्या मुलाची सुंता केली. हे उघडच आहे की असे करताना तिला राग आला होता आणि ती म्हणाली, "तूं रक्ताने मिळविलेला नवरा आहे" असे म्हणत संस्कारविरहितपणे ती शस्त्रक्रियेचा परिणाम त्याच्या पायाजवळ फेकते.
आपण फार वेळ ती किंवा तिच्या मुलाबद्दल काहीहीऐकणार नाही. काही क्षणाला-आणि हे सहज आहे जसे येथे-मोशे त्याची पत्नी आणि त्याच्या मुलाला त्याचा सासरा जेथ्रो कडे पाठवितो. अध्याय १८ मध्ये, जेथ्रो त्यांस पुन्हा मोशे कडे आणतो.
मोशे काय तिला घटस्पोट देत आहे? काय तो अगोदरच तिला वैतागला आहे? काय तो हा विचार करीत आहे की ती त्याच्या नवीन सेवाकार्याचा हिस्सा होण्यास एवढी आध्यामिकनाही? काय तो सरळपणे घाबरला आहे की मिसर मध्ये ते धोक्यामध्ये येतील? बायबल हे आपल्याला सांगत नाही. आपल्याला केवळ एवढेच माहीत आहे की एका वेळी तो तिला परत पाठवीत आहे.
नंतर मोशे व अहरोन यांनी जाऊन इस्राएलवंशाचे सर्व वडील जण जमविले; आणि परमेश्वरानेमोशेस जे काही सांगितले होते ते सर्व अहरोनाने लोकांस कळविले आणि त्यांस चिन्हे करून दाखविली. तेव्हा लोकांना विश्वास आला; परमेश्वराने इस्राएलवंशजांची भेट घेऊन त्यांची विपत्ति पाहिली हे त्यांनी ऐकले तेव्हा त्यांनी नमन करून त्याची आराधना केली. (निर्गम ४: २९-३१)
चिन्हांनी लोकांमध्ये विश्वास आणला की परमेश्वर हा मोशे बरोबर आहे आणि निश्चितच देवाने त्यांची भेट घेतली आहे.केवळ शब्दाने लोकांना तेव्हा पटविले नाही आणि आज सुद्धा नाही.
वचन प्रचार करण्यासाठी पद्धत
लक्षात घ्या की वचन हे प्रचार केले गेले आणि मग वचन प्रदर्शित केले गेले.
प्रभु येशू ख्रिस्ताचे शुभवर्तमान प्रचार करण्याची ही सिद्ध पद्धतीआहे.
Join our WhatsApp Channel
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ३९
- अध्याय ४०