मिसर देशाविषयीचीदेववाणी; परमेश्वर शीघ्रगति मेघावर आरूढ होऊन मिसराकडे येत आहे; मिसरातील मूर्ति त्याजसमोर कापत आहेत आणि मिसराचे हृदय आंतल्या आत विरघळत आहे. (यशया १९:१)
परमेश्वराची उपस्थिती हे नेहमीच मूर्खांना थरथर कापण्यास व पडण्यास लावेल. तेच घडले जेव्हा देवाच्या कराराचा कोश दागोन देवताच्या मंदिरात त्याच्यासमोर ठेवण्यात आला, दागोन दैवताची मूर्ति पडली आणि तुकडेतुकडे झाली. (१ शमुवेल ५ वाचा.)
मिसर ची वर्चस्व ठेवून असलेली मूर्ति ही मुस्लीम आहे.
मी मिसऱ्यावर मिसरी उठवीन;
प्रत्येक आपल्या भावाबरोबर व प्रत्येक आपल्या शेजाऱ्याबरोबर, नगर नगराशी, राज्य राज्याशी लढेल. मिसराच्या अंगची हिंमत खचेल;
त्याची मसलत, मी व्यर्थ करीन;
ते मूर्तींना, मात्रिकांना, भूत
वैद्यांना व गारुड्याना प्रश्न विचारतील.
मी मिसऱ्यांना एका कठोर धन्याच्या हाती देईन;
एक उग्र राजा त्यांजवर सत्ता करील असे प्रभु सेनाधीश परमेश्वर म्हणतो. (यशया १९:२-४)
मिसर संबंधी भविष्यवाणी
येथे मिसर मध्ये एक नागरिक युद्ध येणार आहे.....त्या देशाचे लोक एकमेकाबरोबर लढतील. त्या देशात संपूर्ण गडबडी निर्माण होईल. तेथे मिसर मध्ये लवकरच एक हुकुमशहा निर्माण होईल. हे नागरी युद्धसभोवतालच्या राज्यांमध्ये सुद्धा पसरेल. आपल्याला खरेच ह्या देशासाठी प्रार्थना करण्याची गरज आहे.
समुद्राचे पाणी आटून जाईल, नदी आटून कोरडी होईल. नदीच्या फाट्याना घाण सुटेल;
मिसर देशाचे कालवे बारीक होऊन सुकून जातील;
बोरू व लव्हाळे सुकून जातील.
नील नदीजवळची, नील नदीतीरीची कुरणे व नील नदीच्या आसपासची सर्व शेती वाळून जाईल व त्यातील सर्व काही विखरून नाहीसे होईल.
तेव्हा धीवर शोक करितील;
नील नदीत गळ टाकणारे सर्व विलाप करितील;
पाण्यावर पाग टाकणारे म्लान होतील.
पिंजलेल्या तागाचे काम करणारे, कापसाचे विणकाम करणारे काळवंडतील.
देशाचे स्तंभ भग्न होतील;
वेतन घेऊन काम करणाऱ्या सर्वांची मने खिन्न होतील. (यशया १९:५-१०)
ह्या नागरी युद्धानंतर दुष्काळ येईल. मिसर मधील अर्थव्यवस्था मोठया संकटात सापडेल. तेथे संपूर्ण विनाश होईल.
त्या समयी मिसर देशाची पाच नगरे कनान देशाची भाषा बोलतील; ती सेनाधीश परमेश्वरापुढे एकनिष्ठतेची शपथ वाहतील; त्यापैंकी एकाला ईर-हरेस (विनाश-नगर) म्हणतील. (यशया १९: १८)
ही हेलीओपोलीस असू शकते- सूर्याची नगरी, सूर्यदेवता रा च्या उपासकाचे मुख्य केंद्र, मिसराच्या पाच दैवतांपैकी एक मुख्य दैवत.
त्या काळी मिसर देशाच्या मध्ये परमेश्वरासाठी वेदी होईल, व त्याच्या सीमेवर परमेश्वरासाठी स्तंभ होईल. ही मिसर देशात सेनाधीश परमेश्वराचे चिन्ह व साक्ष अशी होतील; आपणांवर जुलूम करणाऱ्यामुळे लोक परमेश्वराचा धावा करितील तेव्हा तो एक उद्धारक व कैवारी पाठवून त्यांस मुक्त करील. त्या काळी परमेश्वर मिसऱ्यांस आपली ओळख देईल व मिसरी परमेश्वराला ओळखतील; ते यज्ञ व बली अर्पून त्याची उपासना करितील; ते परमेश्वरास नवस करितील व तो फेडतील.
परमेश्वर मिसर देशास मारील; मारील व बरेही करील; ते परमेश्वराकडे वळतील आणि तो त्यांची विनंति ऐकेल व त्यांस बरे करील. (यशया १९:१९-२२)
परमेश्वर जुन्या करारा प्रमाणे योसेफा सारखा एक पुढारी निर्माण करेल जो त्यांस परमेश्वराकडेवळविल. मिसर परमेश्वराला ओळखेल.
Chapters