परमेश्वर त्याच्या लोकांना हाक मारतो परंतु त्याच्या लोकांना त्याची वाणी ऐकण्यास त्रास वाटतो. म्हणून, तीन वेळा ह्या एकाच अध्यायात केवळ परमेश्वर म्हणत आहे, "माझे ऐका." (यशया ५१: १, ४, ७)
तुम्ही जे धार्मिकतेस अनुसरणारे, परमेश्वरास शरण जाणारे, ते माझे ऐका. (यशया ५१:१)
ही वचने दोन लोकांना उद्देशून म्हटली आहेत.
१. ते जे धार्मिकता अनुसरतात
२. ते जे परमेश्वरास शरण जातात
परमेश्वरास शरण जाणे हे असे असू शकते:
१. व्यक्तिगत
२. कौटुंबिक
३. सांघिक
आणि त्याला आशीर्वाद दिला आणि त्यास वाढविले. (यशया ५१:२)
परमेश्वराचा आशीर्वाद हा नेहमीच उन्नति आणेल.
वर आकाशाकडे आपले डोळे लावा; खाली पृथ्वीकडे लक्ष दया;
कारण आकाश धुराप्रमाणेविरून जाईल;
पृथ्वी वस्त्राप्रमाणे जीर्ण होईल, तिचे रहिवासी चिलटाप्रमाणे मरतील;
तरी माझे तारण सर्वकाळ टिकेल;
माझा न्याय भंग पावणार नाही. (यशया ५१:६)
प्रभु येशूच्या दुसऱ्या येण्याच्या घटनेसंबंधी येथे काही संदर्श आहेत (मत्तय २४:३५,२ पेत्र ३:७-१०; प्रकटीकरण ६: १२-१७).
हे शेवटी घडेल जेव्हा परमेश्वराचा न्याय इस्राएल व सर्व राष्ट्रांना प्रगट होईल.
हे धर्म जाणणाऱ्यांनो, माझे धर्मशास्त्र मनात वागविणाऱ्यांनो, तुम्ही माझे ऐका; मर्त्य मानव नावे ठेवितोस त्यांस भिऊ नका; त्यांच्या निंदेने घाबरू नका.
कारण वस्त्राप्रमाणे त्यांस कसर भक्षील, लोकरीप्रमाणे त्यांस कीड खाऊन टाकील;
माझा न्याय तर सर्वकाळ टिकेल, पिढ्यानपिढ्या राहील. (यशया ५१:७-८)
ही वचने जगाच्या लोकांना उद्धेशून बोललेली नाहीत परंतु देवाच्या लोकांना. तुम्ही ज्यांस धार्मिकता ठाऊक आहे, लोक जे तुमच्या हृदयात माझे नियमशास्त्र आहे.
एकव्यक्ति जो परमेश्वराला प्रेम करतो त्याने मनुष्याला अप्रसन्न करण्यापेक्षा परमेश्वराला अप्रसन्न करण्यास घाबरले पाहिजे.
इस्राएल मध्ये एक राजा होता, तोपरमेश्वरालाअप्रसन्न करीत आहे यापेक्षा मनुष्याला अप्रसन्न करीत आहे यास घाबरत असे. आणि तो परमेश्वराचा मोठा अपमान होता. त्याचा परिणाम हा त्याने त्याचे राज्य गमाविले.
वास्तवात, तुमचे सांत्वन करणारा मी, केवळ मीच आहे; तूं मर्त्य मनुष्याला, तृणवत मानवपुत्राला भितेस अशी तूं कोण? आकाश पसरणारा, पृथ्वीचा पाया घालणारा परमेश्वर तुझा कर्ता, याला तूं का विसरलीस?जुलूम करणारा तुझा नाश करण्यास पाहत आहे म्हणून त्याच्या क्रोधास सारा दिवस एकसारखी का भितेस? जुलुमाचा क्रोध उरला आहे कोठे? (यशया ५१:१२-१३)
मनुष्याचे भय हे कदाचित गर्व करण्यासारखे वाटणार नाही, परंतु ते तसेच आहे असे परमेश्वर बोलत आहे, "तुम्ही स्वतःला काय समजता की तुम्हीं मनुष्याला घाबरत आहात, आणि तुमच्या निर्माणकर्त्यालाविसरला आहात!"
हेरोदास याचा फार विचार पडत असे की त्याचे पाहुणे त्याच्याविषयी काय विचार करतील: म्हणून त्याने ते केले ज्याने त्यास अति दु:खी केले," त्याने योहान बाप्तिस्मा देणाऱ्याचे डोके तरवारीने शरीरापासून कापले. पिलाताने यहूदी लोकांना दु:खी करू नये म्हणून चिंता केली: म्हणून त्याने ते केले जे त्याच्या मनाने सांगितले कीतेअन्यायी होते- त्याने येशूला वधस्तंभावर खिळण्याकरिता दिले.
केवळ परमेश्वराला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करा, आणि मग तो लवकरच इतर तुमच्याशी प्रसन्न होतील असे करील. "मनुष्याचे मार्ग परमेश्वराला आवडले म्हणजे तो त्याच्या शत्रूसही त्याच्याशी समेट करावयास लावितो." (नीतिसूत्रे १६:७)
प्रार्थना
पित्या, तुझे वचन माझ्या मुखात ठेव;
तुझ्याहाताच्या सावलीने मला आवरून धर. (यशया ५१:१६)
ऊठ, ऊठ!
हे यरुशलेमे जागी हो. (यशया ५१: १७)
देवाचे लोक कधीकधी "झोपी" जातातआणि त्यांना जागे करण्याची गरज असते.
रोम १३: ११-१२ म्हणते, "समय ओळखून हे करा, कारण तुम्ही आता झोपेतून उठावे अशी वेळ आली आहे; कारण आपण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा तारण आता आपल्या जवळ आले आहे. रात्र सरत येऊन दिवस जवळ आला आहे; म्हणून आपण अंधकाराची कामे टाकून दयावी आणि प्रकाशाची शस्त्रसामग्री धारण करावी."
Chapters