कारण परमेश्वर म्हणतो की मोलावाचून तुम्हांस विकिले, आणि पैक्यावाचूनतुमची मुक्तता होणार. (यशया ५२:३)
आता याचा अर्थ हा नाही की यासाठी काहीही किंमत मोजावी लागली नाही. यशया५२ चा शेवट उद्धाराच्या महान किंमती विषयी वर्णन करण्यास सुरुवात करतो, एक किंमत जी प्रभु येशू ख्रिस्ता शिवाय इतर कोणीही भरली नाही.
जो सुवार्ता सांगतो, शांतीची घोषणा करितो, शुभवृत्त विदित करितो, तारण जाहीर करितो, तुझा देव राज्य करीत आहे असे सियोनास म्हणतो, त्याचे पाय पर्वतावरून येताना किती मनोरम दिसतात. (यशया ५२:७)
ते जे सुवार्ता-शुभवृत्त प्रसार करतात त्यांचे पाय किती मनोरम आहेत-याविषयी संदेष्टा यशया भविष्य करतो.
शुद्ध राहा-तुम्ही जे परमेश्वराचे पात्र आहात. (यशया ५२: ११)
ते जे परमेश्वराची सेवा करितात, त्यांनी पवित्र राहावे याचे आवाहन आहे.
म्हणून जर कोणी त्यापासून दूर राहून स्वतःला शुद्ध करील, तर तो पवित्र केलेले, स्वामीला उपयोगी पडणारे, प्रत्येक चांगल्या कामासतयार केलेले, असेमानाचे पात्र होईल. (२ तीमथ्यी २:२१)
प्रवासासाठी पापकबुली
तुम्हांला घाईघाईने निघावे लागणार नाही; पळ काढावा लागणार नाही; कारण परमेश्वर तुमचा पुढारी आहे; इस्राएलाचा देव तुमचा पाठीराखा आहे. (यशया ५२:१२)
पाहा, माझा सेवक सज्ञतेने वर्तेल, तो थोर व उन्नत होईल, तो अत्युच्च होईल. (यशया ५२:१३)
हा उतारा, यशया ५३ च्या शेवटापर्यंत, परमेश्वराचा सेवक हा त्याच्या केद्रस्थानी आहे. हा तो सेवक आहे ज्याच्याविषयी मागे यशया ४२:१, आणि यशया ४९:३, ६ मध्ये सांगितले आहे.
प्रेषित ८:२४ मधील इथिओपियाच्या षंढाने यशया ५२:१३ ते यशया ५३:१२ विषयी प्रश्न केला: कोणाविषयी संदेष्टा हे बोलत आहे, स्वतःविषयी किंवा इतर कोणा मनुष्या विषयी? हा प्रश्न आजही विचारला जात आहे, आणि उत्तर हे अत्यंत महत्वाचे आहे.
यशया च्या संपूर्ण पुस्तकात, अनेकांबद्दल एक किंवा अनेक मार्गा द्वारे सेवक असे म्हटले गेले आहे. ह्यामध्ये यशया स्वतः सुद्धा आहे (यशया २०:३), एल्याकीम (यशया २२;२०), दावीद(यशया ३७:३५), इस्राएल(यशया ४१:८-९). तथापि, यात काही शंका नाही की हे वाक्य मशीहा-प्रभु येशू ख्रिस्ता साठी सुद्धा विशेष शीर्षक असे वापरले आहे.
ज्याप्रमाणे तुला पाहून बहुत लोक चकित झाले त्याचा चेहरा मनुष्यांच्यासारखा नव्हता, त्याचे स्वरूप मनुष्यजातीच्यासारखे नव्हते इतका तो विरूप होता. (यशया ५२: १४)
येथे अनेक असे प्रसंग होते जेव्हा माझ्या प्रार्थना सभेला अनेक लोक येत असत ज्यांच्या चेहऱ्याला कॅन्सर होता. एके वेळी एक मनुष्य आला ज्याचा गाल कॅन्सर द्वारे खाल्ला गेला होता तो प्रार्थनेसाठी पुढे आला होता. दुसऱ्या वेळी एक मनुष्य पुढे आला होता ज्याचे नाक कॅन्सर द्वारे खाल्ले गेलेले होते.
ते ऐकण्यासकिती दु:खी वाटते, पवित्र शास्त्र तरीही सांगते की येशूच्या चेहरा इतर कोणाही मनुष्यापेक्षा विरूप झालेला होता.
तुम्ही कल्पना करू शकता की त्याचा चेहरा किती विद्रूप असा केला गेला होता. मूळ इब्री भाषे मध्ये याचा अर्थ असा की येशू हा मनुष्यासारखा सुद्धा दिसत नव्हता.
लोकांनी म्हटले की एक प्रसिद्ध नट आणिनिर्देशक मेल गिब्सन त्याचा सिनेमा "पैशन ऑफ ख्राईस्ट" मध्येयेशू ला मारहाण व त्यास वधस्तंभी देणे हे दाखविण्यात फारच वर्णनात्मकअसा होता. तथापि, मेल गिब्सन स्वतः हे मानतो की, पवित्र शास्त्रात जसे वर्णन केले आहे त्यापेक्षा फारच कमी असे त्यासदाखवावे लागले नाहीतर मग कोणीही ते पाहू शकले नसते.
Chapters