हे याकोबाच्या घराण्या, ऐक, तुला इस्राएल हे नांवआहे, तूं यहूदाच्या झऱ्यातून निघाला आहेस; तूं परमेश्वराच्या नामाची शपथ वाहतोस व इस्राएलाच्या देवाचे स्तवन करितोस, पण सत्याने व धर्माने नव्हे. (यशया ४८:१)
यहूदा ने ह्या सुरुवातीच्या वाक्याकडे लक्ष दयावे. परमेश्वराने त्याच्या लोकांना याकोबाचे घराणे असे ओळखले आहे-नाव याकोब, मुख्यत:"फसविणारा,लुबाडणारा", असे आहे- आणिम्हणतोकी त्यांना केवळ इस्राएल हे नाव आहे, इस्राएल चे चारित्र्य नाही, ज्याचा अर्थ "परमेश्वराच्या आज्ञेनुसार" चालणारे नाही.
तूं त्या ऐकल्या नव्हत्या, जाणिल्यानव्हत्या; प्राचीन काळापासून तुझे कान उघडिले नव्हते, कारण तूं विश्वासघातकी आहेस; गर्भवासापासून तुला फितुरी हे नांव पडले आहे, हे मला ठाऊक होते. (यशया ४८:८)
बायबल शिकविते की आपण जन्मापासूनच पापी आहोत आणि आपण पापी स्वभाव जन्मजात प्राप्त केला आहे कारण आपण आदामापासून आलोआणि आदामामध्ये पापी आहोत. (रोम ५:१२)
हे आपले व्यक्तिगत पापाचे कृत्य जे आपल्याला पापी करीत नाही; तर हे आपले आदामापासून येणे आहे. आपले व्यक्तिगत पापाचे कृत्ये केवळ हे सिद्ध करते कीआपण प्रत्येक जण जन्मापासूनच पापी आहोत.
दावीद म्हणतो, "पाहा, मी जन्माचाच पापी आहे; माझ्या आईने गर्भधारण केले तेव्हाचाच मी पातकी आहे." (स्तोत्रसंहिता ५१:५) "मातेच्या उदरी असतानाच दुर्जन फितूर होतात; ते जन्मापासूनच असत्य बोलत बहकत जातात." (स्तोत्रसंहिता ५८:३)
पवित्र आत्म्याने जन्मल्यावाचून, आपला परमेश्वराच्या राज्यात प्रवेश होणारच नाही. (योहान ३:३)
"माझ्या नामाप्रीत्यर्थ मी आपला क्रोध लांबणीवर टाकिला;
तुझा उच्छेद करू नये म्हणून माझ्या प्रशंसेप्रीत्यर्थ मी स्वतःला आवरिले." (यशया ४८:९)
हे जाणून की त्याचे लोक हे किती अधिक पापी आहेत, तर मग परमेश्वर का त्याच्या लोकांना कधी दया दाखवेल? तो असे करतो त्याच्या नावा खातर. हे यासाठी नाही की इस्राएल दयेस पात्र आहे; वास्तवात; दयेसाठी कधीही पात्र नसतो. परमेश्वर ते देतो की स्वतःचे गौरव करावे आणि त्याचे सार्वकालिक उद्देश पूर्ण करावे.
"तुम्ही मजजवळ या, हे ऐका;
प्रारंभापासून मी गुप्तपणे बोललो नाही;
ते होऊ लागल्यापासून तेथे मी आहेच;
आता प्रभू परमेश्वराने मला व आपल्या आत्म्याला पाठविले आहे." (यशया ४८: १६)
त्याची वाणी ऐकण्यासाठी, आपल्याला त्याच्या जवळ येण्याची गरज आहे.
परमेश्वर तुझा उद्धारकर्ता, इस्राएलाचा पवित्र प्रभु, म्हणतो; तुला जे हितकारक तें मी परमेश्वर तुझा देव तुला शिकवितो; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याने तुला नेतो. (यशया ४८:१७)
परमेश्वराचे मार्गदर्शन नेहमीच लाभासाठी नेते आणि नुकसान साठी नाही.
जेव्हा प्रभु येशूने पेत्राला उजव्या बाजूला जाळे टाकण्यासाठी सांगितले, त्या जाळ्यात इतके मासे आले की त्यांची नाव त्याच्या वजनाने बुडू लागली होती.
तूं माझ्या आज्ञा लक्षपूर्वक ऐकतास तर बरे होते; मग तुझी शांति नदीसारखी, तुझी धार्मिकता समुद्राच्या लाटांसारखी झाली असती; तुझा वंश रेतीसारखा, तुझ्या पोटचे संतान रेतीच्या कणांइतके असते; त्याचे नांव मजसमोरून उच्छेद पावले नसते, ते नष्ट झाले नसते. (यशया ४८:१८-१९)
वचन पाळण्याचा पुरस्कार
१. शांति
२. धार्मिकता
३. वंशव पोटचे संतान रेतीसारखे
Chapters