मग यहोशवा पहाटे उठला (यहोशवा ३:१)
यहोशवा हा भल्या पहाटे उठणारा व्यक्ति होता, जो दिवसाचा पहिला तास देवाबरोबर संगती मध्ये घालवित होता. त्याने आपल्या प्रभु येशूचे अनुकरण केले होते. (मार्क १:३५; यशया ५०:४)
यहोशवा सर्व इस्राएल लोकांसह अकाशियाहून (अथवा शिट्टिमाहून) निघून यार्देन नदीपर्येत आला. नदी पार करण्यापूर्वी त्यांनी तेथे मुक्काम केला. (यहोशवा ३:१)
यहोशवा ने संपूर्ण डेऱ्यास आज्ञा केली की यार्देनेकडे बाभळीच्या झुडुपा (शिट्टीम) पासून दहा मैलावर सरका.
तीन दिवसांनंतर अधिकारी छावणीतून फिरले. त्यांनी लोकांना आज्ञा दिल्या. ते म्हणाले, “लेवी याजक तुमच्या परमेश्वर देवाच्या कराराचा कोश वाहून नेताना तुम्हाला दिसतील तेव्हा त्यांच्या पाठोपाठ जा. पण फार जवळून जाऊ नका. त्यांच्या पासून सुमारे एक हजार यार्ड अंतर ठेवा. या पूर्वी कधी या वाटेने तुम्ही गेला नाहीत. तेव्हा ती कळावी म्हणून त्यांच्या मागून जा.” (यहोशवा ३: २-४)
परमेश्वर आपली करुणा आहे जेव्हा आपण ह्या जीवनातून चालतो, परंतु आपण औपचारिकपणे किंवा निरादरतेने त्याच्याशी व्यवहार करण्याचे धाडस करू नये.
येशूच्या रक्ता साठी मी देवाचे आभार मानतो, आज परमेश्वर व आपल्यामध्ये कोणतेही अंतर नाही. पण आता, ख्रिस्तामध्ये जे तुम्ही एके काळी देवापासून दूर होता, ते तुम्ही ख्रिस्ताच्या रक्ताने त्याच्याजवळ आणलेले आहात. (इफिस २:१३)
मग यहोशवा लोकांना म्हणाला, “शुचिर्भूत आणि पवित्र व्हा कारण उद्या परमेश्वर तुमच्यामार्फत अद्भुत गोष्टी करणार आहे.” (यहोशवा ३: ५)
इस्राएली लोक हे त्यांच्या एक सर्वात मोठया विजयाच्या उंबरठ्यावर होते. हे मग त्याच क्षणी यहोशवा ने इस्राएली लोकांना हे सांगितले होते. यहोशवा साठी हा काही नवीन सिद्धांत नव्हता. त्याने हे पाहिले होते की मोशे जो देवाचा माणूस जो त्याचा प्रशिक्षक होता त्याने तो सिद्धांत लागू केला होता.
ज्याप्रत्येक वेळी परमेश्वर त्याच्या लोकांच्या मध्ये काहीतरी करण्यास तयार होत असे, तेव्हा प्रभु त्यांना सांगत असे की त्यांनी स्वतःला शुद्ध करावे.
परमेश्वर मोशेला म्हणाला, “आज आणि उद्या माझ्या विशेष भेटीसाठी लोकांना पवित्र कर; त्यांनी कपडे स्वच्छ धुवावेत.
व तिसऱ्या दिवशी माझ्या भेटीसाठी तयार राहावे कारण तिसऱ्या दिवशी परमेश्वर सीनाय पर्वतावर उतरेल आणि सर्व लोक मला पाहतील. (निर्गम १९: १०-११)
यहोशवाला ठाऊक होते की त्यांना त्यांच्या मध्य परमेश्वराचे अद्भुत कार्य जर पाहावयाचे असेल, तर त्यांना आध्यात्मिकदृष्टया तयार असले पाहिजे होते.
कोणत्याही वेळेला परमेश्वरास जेव्हा आपल्याला भेट दयायची असेल, आपल्यामध्ये अद्भुते करावयाची असतील, तेव्हा आपण आपल्या स्वतःला शुद्ध केले पाहिजे. शुद्ध करणे म्हणजे देवाच्या सान्निध्यामध्ये येत स्वतःला वेगळे करावे म्हणजे तो आपल्याला स्वच्छ करू शकतो व त्याला जे पाहिजे ते त्याने आपल्या मध्ये व आपल्या द्वारे करावे.
पास्टर व पुढाऱ्यांसाठी आध्यात्मिक सल्ल्या साठी उपदेश. उपासनेच्या दिवशी तयारी करू नका. कमीत कमी एक दिवस अगोदर तयारी करा.
शुद्धीकरण हे यासाठी नाही की आपण देवाचा आशीर्वाद प्राप्त करू शकावे, परंतु हे याकारणासाठी की आपण आपल्या स्वतःला तयारीच्या योग्य स्थानी आणावे की आशीर्वाद प्राप्त करावे
मग याजकांना यहोशवाने कराराचा कोश घेऊन सर्वांच्या आधी जायला सांगितले. (यहोशवा ३: ६)
याजकांकडे जबाबदारी होती की कराराच्या कोश ला उचलून न्यावे व जेव्हा ते चालू लागतात तेव्हा लोकांच्या पुढे चालावे. हे ते याजक होते ज्यांना प्रथम त्यांचे पाय ओले करावे लागत होते यापूर्वी की परमेश्वराने पाणी मोकळे करावे. याजकांना नदीच्या पात्रात मध्यभागी उभे राहावयाचे होते जोपर्यंत सर्व लोक पार निघून जात नाहीत. जेव्हा याजक पलीकडील स्थानी येतील, तेव्हा पाणी त्याच्या मूळ अवस्थे मध्ये परत येईल. याजकांना त्यांचे हे काम करण्यासाठी विश्वास व धैर्याची गरज होती, परंतु त्यांनी परमेश्वरावर भरंवसा ठेवला व त्याच्या वचनाच्या विश्वासूपणावर निर्भर राहिले.
परमेश्वर तेव्हा यहोशवाला म्हणाला, “आज मी सर्व इस्राएल लोकांच्या दृष्टीने तुझी थोरवी वाढविण्यास सुरूवात करीन. म्हणजे मग मोशेला मी साथ दिली तशीच तुलाही देणार आहे हे लोकांना कळेल. (यहोशवा ३: ७)
जेव्हा मोशेने राष्ट्राला तांबडया समुद्रातून पार नेले, ह्या चमत्काराने लोकांसमोर मोशे ची महती वाढविली, आणि त्यांनी ओळखले की तो वास्तवात परमेश्वराचा सेवक आहे (निर्गम १४:३१). परमेश्वर तेच यार्देन नदी काठी यहोशवा साठी करणार होता आणि असे करण्याने, तो लोकांना स्मरण देणार होता जसे तो मोशे बरोबर होता तसेच यहोशवा बरोबर आहे.
याप्रमाणे परमेश्वराने यहोशवाला साथ दिली आणि यहोशवाची सर्व देशात ख्याती पसरली. (यहोशवा ६:२७ )
यार्देन नदी ओलांडण्याचे महत्त्व
त्यांचे चमत्कारिकरित्या पार निघून जाण्याने हे निश्चित केले की
परमेश्वराचे सान्निध्य त्यांच्यासोबत आहे व त्याचे आश्वासन की त्यांच्या शत्रूंना देशातून घालवून दयावे.
पुढारी सोबत परमेश्वराची उपस्थिती, त्यास लोकांच्या नजरेत श्रेष्ठ करेल. अनुयायांनी हे जाणले पाहिजे की परमेश्वर पुढारी सोबत आहे (यहोशवा ३:१०)
लोकांना प्रमाण पाहिजे की परमेश्वर त्यांच्या मध्य आहे.
शहर ऐडम तेल-ऐड दामीया. यार्देने काठी एक शहर, सारतान जवळ ज्याचा उल्लेख बायबल मध्ये यहोशवा ३:१६ मध्ये केला आहे, जेथे यार्देन नदीचे पाणी दुभंगले गेले होते. होशेय ६:७ मध्ये सुद्धा याचा उल्लेख केलेला आहे. नदीच्या पश्चिमी तटावर ह्या शहरास तेल-ऐड दामीया म्हणून अनेकांनी सांगितलेले आहे, जब्बोकच्या खालच्या भागाजवळ आणि यरीहोच्या उत्तरेला १८ मैलावर.
Chapters