योसेफाचे वंशज यहोशवाला म्हणाले, परमेश्वराचा आशीर्वाद आमच्यावर आजपर्यंत असल्यामुळे आमची संख्या पुष्कळ वाढली असूनही तूं आम्हांला वतनातला एकच वाटा का दिला?
यहोशवा त्यांना म्हणाला, तुमची लोकसंख्या वाढली असली व एफ्राइमाचा डोंगराळ प्रदेश तुम्हांला पुरत नसला तर परिज्जी व एफाई ह्यांच्या प्रदेशातील जंगलात जाऊन व झाडे तोडून तेथे राहा. (यहोशवा १७:१४-१५)
लक्षात घ्या, यहोशवा त्यांच्या महानते बद्दल प्रश्न करीत नाही, किंवा ते त्यांच्यासाठी एक मोठी जागा प्राप्त करण्यास पात्र आहेत किंवा नाही. तो सरळ त्यांचा उद्धटपणा केवळ त्यांच्यावरच उलटत आहे आणि त्यांना ते देत आहे जे ते अपेक्षा करीत आहेत.
जर ते त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी कठीण कार्य पूर्ण करतील. वास्तवात, यहोशवा हे म्हणत होता, "तुम्हांला अधिक भूमी पाहिजे? जा आणि प्राप्त करा!" "तुम्ही महान लोक आहात? मग बलाढ्य लोक हे तुमच्यासाठी काही समस्या नसणार! तेथे भूमी आहे ज्याची तुम्हांला कधी अधिक गरज वाटेन किंवा त्यापेक्षा अधिक आहे-जा आणि प्राप्त करा!"
दुसऱ्या शब्दात, यहोशवाम्हणाला, "जर तुम्ही तुमच्याविषयी जे म्हणत आहात ते खरे आहे, आणि मी त्यावर विश्वास ठेवतो, तर मग त्याने तुमच्या जीवनात फळ उत्पन्न केले पाहिजे! ते प्राप्त करण्यास जा, आणि चला आपण ते पाहू या!"
Chapters