मग यहोशवाने यार्देनेच्या मध्यभागी बारा धोंडे लावले. (यहोशवा४:९)
यहोशवा ने यार्देन नदीच्या प्रत्येक पात्रात स्मारक म्हणून धोंड्यांची रास उभी केली होती, म्हणजे दुष्काळाच्या वेळेस जेव्हा पाण्याची पातळी कमी होते, ती धोंडे ही पाहिली जाऊ शकतात आणि त्या वेळेची साक्ष देतील की परमेश्वराने यार्देन नदी पूर्णपणे कोरडी केली होती.
विशेषतः दुष्काळाच्या वेळी,परमेश्वराने ज्या महान गोष्टी केल्या आहेत त्याचे आपण स्मरण करण्याची गरज आहे.
जसे परमेश्वराने यहोशवाला आदेश दिला.(यहोशवा४:१०)
जर तुमची सेवा ही आदेशित नाही, तर तुम्ही अडखळून राहाल. जेव्हा तुम्ही आदेशित असे कार्य करता, तर तुम्ही अधिकारात आहात. यहोशवाच्या यशाचे हे गुपित होते.
त्या दिवशी परमेश्वराने सर्व इस्राएलाच्या दृष्टीने यहोशवाची थोरवी वाढविली; म्हणून जसे ते मोशेचे भय धरीत तसेच त्यांनी यहोशवाचे भय त्याच्या सगळ्या हयातीत बाळगले.(यहोशवा४: १४)
लोकांनी हे पाहण्याची गरज आहे की परमेश्वर तुमच्याबरोबर आहे, तरच मग ते तुमचे ऐकतील.
Chapters