इस्राएल लोक यार्देनेपलीकडे जाईपर्यंत परमेश्वराने तिचे पाणी त्यांच्यासाठी कसे आटविले हे यार्देनेपलीकडील अमोऱ्याच्या सर्व राजांनी वा समुद्रकिनाऱ्याच्या सर्व कनानी राजांनी ऐकले, तेव्हा इस्राएल लोकांच्या भीतीने त्यांच्या काळजाचे पाणीपाणी झाले आणि त्यांच्यात काही हिंमत राहिली नाही. (यहोशवा ५: १)
जेव्हा शत्रू देवाच्या कार्याविषयी ऐकतात, शत्रू हे घाबरतात आणि हेच तर कारण आहे की ते प्रयत्न करतात आणि सर्व काही करतात की देवाचे कार्य निष्फळ करावे.
म्हणून यहोशवाने गारगोटीच्या सुऱ्या बनविल्या, आणिअग्रत्वचांची टेकडीवर इस्राएल लोकांची सुंता केली.(यहोशवा५:३)
गिबअथ हा-अरालोथ म्हणजे अग्रत्वचांची टेकडी
त्यांनी देशातले उत्पन्न खाल्ले त्याच्या दुसऱ्या दिवसापासून मान्ना बंद झाला; तो पुन्हा इस्राएल लोकांना मिळाला नाही; त्या वर्षी त्यांनी कनान देशातले उत्पन्न खाल्ले.(यहोशवा५:१२)
मान्ना का बंद झाला?
१. ही त्यांच्या आध्यात्मिक प्रगती मधील प्रक्रिया होती.
२. आतापर्यंत ते आशीर्वादित अन्न खात होते आणि भूमी शापित होती परंतु देवाच्या आश्वासनात त्यांनी प्रवेश केला होता.भूमी ही आता शापित नव्हती-ती आशीर्वादित जमीन होती.
यहोशवाने यरीहोजवळ असताना समोर पाहिले तो कोणी पुरुष आपल्या हाती उपसलेली तरवार घेऊन उभा आहे असे त्याच्या नजरेस पडले. यहोशवानेजवळ जाऊन विचारले, तूं आमच्या पक्षाचा की आमच्या वैऱ्यांच्या पक्षाचा?
तो म्हणाला, नाही, मी येथे परमेश्वराचा सेनापती ह्या नात्याने आलो आहे. तेव्हा यहोशवाने त्याला दंडवत घालून म्हटले, स्वामीची आपल्या दासाला काय आज्ञा आहे?
परमेश्वराचा सेनापती यहोशवाला म्हणाला, आपल्या पायातले जोडे काढ; कारण ज्या जागी तूं उभा आहेस ती पवित्र आहे. तेव्हा यहोशवाने तसे केले. (यहोशवा ५: १३-१५)
ह्या आदेश देणाऱ्याची ओळख:
यहोशवा त्या मनुष्याला इब्री शब्द वापरून संबोधत आहे त्याचा अर्थ "स्वामी" किंवा"प्रभु" आहे. यहोशवाला ह्या सत्वाला स्पष्टपणे फारच सन्मान होता. शेवटी तो मनुष्य यहोशवाला म्हणतो, की त्याने त्याचे जोडे काढावे. "कारण ज्या जागी तू उभा आहेस ती पवित्र आहे." बायबल विज्ञानी म्हणतात की ख्रिस्ताचे देहधारण होण्यापूर्वीचे हे दर्शन होते कारण परमेश्वराचा कोणताही देवदूत उपासना स्वीकारणार नाही.
Chapters