चित्र हे की मोशे जो देवाचा माणूस आता मरून गेलेला आहे. इस्राएल अजून आश्वासित देशात पोहचलेले नाही. अशा वेळी, परमेश्वर स्वतः यहोशवाला बोलतो, आणि तीन वेळा स्पष्ट आदेश देतो, "खंबीर हो, हिंमत धर." (यहोशवा १: ६, ७, ९)
यहोशवा ने हे कसे करावयाचे आहे?
त्याने खंबीरता आणि हीमत कोठून आणावयाची आहे?
मुख्य गोष्ट ही, जर परमेश्वर तुम्हांला काहीतरी करण्यास सांगतो, ते कसे करावे हे सुद्धा तो तुम्हाला सांगेल.
देवाचे वचन हे "आध्यात्मिक" बी आहे ज्याकडे शक्ती आहे की जे काही तुमच्या जीवनात तुम्हाला गरज आहे ते निर्माण करावे.
ते बी तुमच्या हृदयात पेरणे यासाठी मुख्य गोष्ट ही मननआहे.
नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे; त्यात जे काही लिहिले आहे ते तूं काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश:प्राप्ति घडेल. (यहोशवा १:८)
मनन हे सकाळी बायबल चा काही भाग फार लवकर वाचून काढणे नाही, परंतु त्याद्वारे लक्ष वेधून गेले पाहिजे आणि बायबल मधील सापडणाऱ्या सत्या द्वारे आपले जीवन निर्माण करावे.
आपले रिकामटेकडे विचार, आपले आळशी विचार हे तेथे गेले पाहिजे.देवाच्या वचनाच्या सुचनाह्या आपल्या जीवनास स्थिर करण्यास, आपल्याला दिशा देण्यास, त्याच्या मनाला आकार देण्यास, आपल्या पद्धती बनवाव्या, आपल्या आवडीच्या गोष्टींसाठी प्रेरणा दयावे, आणि आपल्या कृतीला प्रेरणा दयावी.
पापकबुली:
प्रत्येक ठिकाण जेथे माझ्या पायाचा तळभागहा चालून जातो, जेपरमेश्वराने मला दिले आहे.
पापकबुली:
नियमशास्त्राचे पुस्तक हे माझ्या मुखापासून दूर जाऊ नये, परंतु मी त्यावर दिवस व रात्र मनन करावे, म्हणजे जे सर्व काही त्यात लिहिले आहे. तेव्हा मग मी माझा मार्ग संपन्न करेन आणि मग मला चांगले अश मिळेल.
मग यहोशवाने रऊबेनी, गादी व मनश्शेचा अर्धा वंश ह्यांना म्हटले, परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने तुम्हाला जी आज्ञा दिली होती तिचे स्मरण करा; तो तुम्हांला म्हणाला होता की, तुम्हांला स्वास्थ्य मिळावे म्हणून तुमचा देव परमेश्वर हा देश तुम्हाला देणार आहे. ह्या यार्देनेच्या पूर्वेकडील जो देश मोशेने तुम्हांला दिला आहे त्यांतच तुमच्या स्त्रिया, मुलेबाळे आणि गुरेढोरे ह्यांनी राहावे; पण तुम्ही सर्व योद्ध्यांनी सशस्त्र होऊन आपल्या बांधवापुढे नदीपलीकडे कूच करावे आणि त्यांना कुमक दयावी. परमेश्वर तुमच्याप्रमाणेच तुमच्या बांधवांना स्वास्थ्य देईल आणि तुमचा देव परमेश्वर ह्याने त्यांना दिलेल्या देशाचा तेही ताबा घेतील; मग परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने यार्देनेच्या पूर्वेस, उगवतीकडे जो देश तुम्हांला दिला आहे त्या तुमच्या वतनाच्या देशात परत येऊन त्याचा ताबा तुम्ही घ्यावा. (यहोशवा १: १२-१५)
रऊबेनी, गादी व मनश्शेचा अर्धा वंश ह्यांना अगोदरच यार्देनेच्या पूर्वेस त्यांचा वंश परंपरागत हिस्सा मिळाला होता. मोशे जो देवाचा सेवक ह्याने त्यांना इशारा दिला होता की त्यांनी त्यांच्या आशीर्वाद सह तेथेच स्थिर होऊ नये परंतु ज्यांनी अजून त्यांचा भाग प्राप्त केलेला नाही त्यांच्यासह यार्देन ओलांडून सशस्त्र जावे की त्यांच्या इतर बांधवास साहाय्य करावे.
अनेक वेळेला आपण जेव्हा आपले आशीर्वाद, किंवा आपले चमत्कार प्राप्त करतो, आपण आपले आशीर्वाद किंवा चमत्कार यांचा आनंद घेण्यात व्यस्त होतो की आता प्रार्थना करण्यास किंवा इतर ज्यांनी अजूनही त्यांचा आशीर्वाद प्राप्त केलेला नाही त्यांच्याबद्दल विचार करण्यास आपल्याला वेळ नसतो.
त्यांनी सुद्धा त्यांचा भाग प्राप्त करावा म्हणून आपल्याला त्यांस साहाय्य करण्याची गरज आहे. असे करण्याने परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देईल.
Chapters