नूनाचा मुलगा यहोशवा ह्याने गुप्तपणे दोन हेर शिट्टीम येथून पाठविले; त्याने त्यांना सांगितले की, जा आणि तो देश व विशेषतः यरीहो हेरुन या. त्याप्रमाणे ते गेले आणि राहाब नावाच्या वेश्येच्या घरी उतरले. मग कोणी यरीहोच्या राजाला खबर दिली की, काही इस्राएल लोक देशाचा भेद काढण्यासाठी आज रात्री येथे आले आहेत. (यहोशवा २: १-२)
जेव्हाआत्म्याने भरलेला एक मनुष्य नवीन क्षेत्रात प्रवेश करतो, शत्रूचा कारभार कार्यवाही करू लागतो आणि शत्रू पुढाऱ्याला तुम्ही कोठे आहात त्याविषयी खबर दिली जाते.
प्रार्थना मुद्दे
माझ्या, माझ्या कुटुंबाच्या आणि करुणा सदन सेवाकार्याच्या विरोधातीलशत्रूच्या हेरगिरीचे प्रत्येक जाळे हे निष्कामी होवो आणि ते पूर्णपणे विखरून जावो येशूच्या नांवात.
मग त्या स्त्रीने त्या दोन पुरुषांना घेतले आणि त्यांना लपविले.(यहोशवा २: ४)
हे मध्यस्थी विषयी बोलते. मध्यस्थी ही देवाच्या लोकांनाशत्रूच्या योजनेपासून लपविते. मध्यस्ती करणारे नेहमी शत्रूच्या योजनांना धुडकावून लावतात.
त्यांच्या मागावरील निघालेले लोक यार्देनेकडे जाणाऱ्या वाटेने उतारांपर्यंत गेले.(यहोशवा २: ७)
पाण्याचाउतार हा उथळ भाग जेथे स्थिर राहता येते जेथे पाण्याच्या प्रवाहाला चालत किंवा वाहनातून त्याचे चाक भिजून पार करता येते.
पाण्याचाउतार हा पूल पेक्षा नदी ओलांडण्याचा अगदी स्वस्त प्रकार आहे, परंतु जास्त पाऊस किंवा पुराच्या स्थितीत तसे पारकरणे अशक्य असते. पाण्याचाउतार भाग हा त्यामुळे केवळ काही कच्चे रस्त्यासाठी उपयोगी असतो (आणिपायी चालणाऱ्यासाठी आणि घोड्यावर बसून जाण्यासाठी वगैरे).
राहाब, जी वेश्या, तिने तिचे जीवन त्या लोकांसाठी धोक्यात घातले ज्यांना ती ओळखत नव्हती. तिने यहोशवाच्या हेरांना लपविण्यासाठीच जन्म घेतला होता म्हणजे इस्राएली लोकांनी यरीहोस पराभूत करावे.(यहोशवा २: ६ पाहा)
मग ती म्हणाली, "तुमच्या सांगण्याप्रमाणेच होईल." आणि तिने त्याना पाठवून दिले, आणि ते निघून गेले. आणि तिने किरमिजी डोर आपल्या खिडकीला बांधला.(यहोशवा २: २१)
कुटुंब रक्ता खाली
घर रक्ता खाली
संपत्तीयेशूच्या रक्ता खाली
यरीहो हे त्यावेळेस जगामध्ये सर्वात प्रबळ नगर होते. त्यांची सुरक्षा ही उत्तम होती. भिंत ही मजबूत आणि विशाल होती. इतिहासात नोंद आहे की यरीहो शहराची भिंत इतकी रुंद होती कीसहा घोडेस्वार बाजूबाजूला राहून त्यावरून सहज जाऊ शकत होते. ती इतकी विशाल होती की राहाब, वेश्ये ने त्यावर आपले घर बांधले होते.
यरीहोची भिंत इतकी मजबूत होती की संपूर्ण घराला सामावून ती होती ..." कारण तिचे घर हे शहराच्या भिंतीवर होते आणि ती त्या भिंतीवर राहत होती"(यहोशवा २: १५). परंतु ही भिंत कराराच्या लोकांसमोर टिकाव धरू शकली नाही. कोणतीही भिंत कराराच्या लोकांच्या विरुद्ध ठाम राहू शकत नाही.
Chapters