"त्याने त्यास सांगितले जा, मुख्य याजक हिल्कीया यास सांग की जो पैका परमेश्वराच्या मंदिरी आलेला आहे व द्वारपाळांनी लोकांपासून जमविला आहे त्याचा हिशोब करा." (२ राजे २२:४)
यिर्मया १:१-२ दर्शविते की संदेष्टा यिर्मया हा हिल्कियाचा पुत्र होता. योशिया राजा जेव्हा राज्य करीत होता त्यावेळी यिर्मया संदेष्ट्याने त्याच्या सेवेला सुरुवात केली होती.
"त्या नियमशास्त्राच्या ग्रंथांतली वचनें राजाने ऐकली तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडली." (२ राजे २२:११)
देवाचे लोक मूर्तीपूजेकडे देवापासून दूर गेले होते. देवाच्या मंदिराकडे (देवाचे घर) दुर्लक्ष केले गेले होते. अशा आध्यात्मिक अंधाराच्या क्षणी, देवाने योशीया नावाच्या तरुण राजाला आणले.
वरील वचनांची पार्श्वभूमी ही आहे की प्रमुख याजक, हिल्कीया, मंदिराची दुरुस्ती करीत असताना त्यास मंदिरात नियमशास्त्र सापडले. नियमशास्त्राचे (देवाचे लिखित वचन) ते पुस्तक तो योशीया राजाकडे आणतो. योशीयाने जेव्हा नियमशास्त्राच्या ग्रंथांतील वचनें ऐकली तेव्हा त्याने स्वतःला दोषी मानिले आणि पश्चातापाचे चिन्ह म्हणून आपली वस्त्रे फाडीली.
त्याप्रमाणेच, जेव्हा तुम्हीं देवाचे वचन ऐकता, तेव्हा तुमच्या वतीने देवाच्या वचनाला उत्तर असले पाहिजे. आपण फक्त वचन ऐकावे आणि काहीही करू नये असे करू शकत नाही. "मी देवाच्या वचनावर विश्वास ठेवतो" असे केवळ म्हणणे पुरेसे नाही, तर तुम्हाला त्यानुसार कार्य करण्याची गरज आहे.
"तेव्हा हिल्कीया याजक, अहिकाम, अखबोर, शाफान व असाया हे हुल्दा संदेष्ट्रीकडे गेले व तिच्याशी त्यांनी भाषण केले. ती शल्लूम बिन तिकवा बिन हरहस नावाचा जामदार याची स्त्री असून ती यावेळी यरुशलेमेच्या दुसऱ्या पेठेत राहत होती." (२ राजे २२:१४)
देवाच्या या स्त्रीबद्दल येशील उल्लेखाशिवाय फारसे काहीही माहीत नाही (आणि समान वृत्तांत जो २ इतिहास ३४:२२ मध्ये नोंदला आहे). राजा योशीयाच्या स्पष्ट संमतीने, हिल्कीया याजकाने देवाचे मन जाणून घेण्यासाठी देवाच्या या स्त्रीचा सल्ला घेतला.

Chapters