इस्राएल आणि यहूदा यांना समज देण्यासाठी परमेश्वराने सर्व संदेष्टे आणि द्रष्टे यांचा उपयोग केला. त्यांच्यामार्फत लोकांना सांगितले, (२ राजे १७:१३)
संदेष्टा आणि द्रष्टा यांत फरक आहे काय?
सर्व खरे द्रष्टे हे संदेष्टे आहेत, परंतु सर्व संदेष्टे हे द्रष्टे नाहीत. शब्द द्रष्टा हे एका विशेष प्रकारच्या संदेष्ट्याचे वर्णन करते जो एक विशेष प्रकारचे भाविष्यात्मक प्रकटीकरण किंवा संस्कार प्राप्त करतो. जेव्हा भविष्यात्मक प्रकटीकरणाचा विषय येतो, तेव्हा एक संदेष्टा हा प्रेरित ऐकणारा असतो, आणि मग बोलणारा असतो, तर द्रष्टा हा प्रामुख्याने दृश्यमान असतो. दुसऱ्या शब्दात, संदेष्टा हा संवादात्मक परिमाण आहे, आणि द्रष्टा हा ग्रहणक्षम परिमाण आहे.
क्षुद्र दैवतांच्या नादी लागून त्यांनी काहीच साधले नाही..(२ राजे १७:१५)
सामान्य सिद्धांत हा, "तुम्ही त्यासारखे होता, ज्याचे तुम्ही अनुसरण करता." "तुम्ही जमावाचे अनुसरण करू नये की वाईट करावे" (निर्गम २३:२). काय प्रसिद्ध आहे किंवा अधिकतर लोक जे करीत आहेत त्याद्वारे आपण नेहमी प्रेरित किंवा प्रभावित होत असतो. देवाचे वचन आपल्याला चेतावणी देते की वाईट करण्यासाठी जमावाचे अनुकरण करू नये. लक्षात घ्या की जर जमाव हा चांगले करीत आहे, तर तुम्ही त्याचे अनुसरण करू शकता. उदाहरणार्थ, जर लोकांचा जमाव बाह्य सुवार्ता प्रसारासाठी जात आहे, तर तुम्ही तेथे जाऊ शकता.
काही लोक अश्शूरच्या राजाला म्हणाले, “तू ज्या लोकांना शोमरोनमध्ये आणून ठेवलेस त्यांना या देशातील परमेश्वराचे नियम माहित नाहीत. म्हणून परमेश्वराने त्यांच्यावर सिंह सोडले. या लोकांना त्या परमेश्वराच्या नियमांचे ज्ञान नसल्यामुळे ते लोक मारले गेले.”(२ राजे १७:२६)
अरामी लोक हे प्रांतीय आत्म्यांच्या कल्पनांशी परिचित होते. त्यांच्या देशाच्या देवाचा संदर्भ लक्षात घ्या.
Chapters