मग तो डोंगर उतरल्यावर लोकांचे थवे त्याच्यामागे चालले. (मत्तय ८:१)
एका व्यक्तीला डोंगरावरून खाली येणे हे सांगते कीव्यक्ति हा डोंगरावर होता. प्रभु येशू ला एक नित्याची सवय होती की डोंगरावर जावे.
डोंगरावर असणे हे परमेश्वराच्या घनिष्ठ संगतीत असणे असे दर्शविते. हेच तर कारण होते की असंख्य लोक हे त्याच्यामागे आले. ही तुमची सामाजिक माध्यम उपस्थिती(सामाजिक माध्यमाच्या विरोधात असे काही नाही)नाही की जी असंख्य लोकांना आकर्षित करते, ही केवळ परमेश्वराची उपस्थिती आहे जी लोकांना आकर्षून घेते.
आणि पाहा, एक कुष्ठरोगी त्याचाकडे आला व त्याच्या पाया पडून त्याला म्हणाला, प्रभुजी, आपली इच्छा असली तर मला शुद्ध करावयास आपण समर्थ आहां. (मत्तय ८:२)
तेथे असंख्य लोक येशूच्या भोवती होते, तरीसुद्धा ह्यासर्वांच्या मध्ये, एका कुष्ठरोग्याला येशूकडे येण्यास जागा मिळाली. उपासना ही मार्ग मिळविण्याची किल्ली आहे की येशूच्या उपस्थितीत प्रवेश करावा.
अधिकतर लोकांना यात काही शंका नाही की परमेश्वराकडेसामर्थ्य आहे. त्यांची केवळ हीच शंका आहे की मग परमेश्वर तयार आहे काय? कुष्ठरोग्याने येशूच्या स्वस्थ करण्याच्या सामर्थ्यावरशंका घेतली नाही, त्याने म्हटले, जर तुझी इच्छा असली तर. मला ठाऊक आहे की तूं समर्थ आहे, परंतुमला खात्री आहे की तूं तुझे सामर्थ्य माझ्या खातर वापरण्यास तयार आहे."
पापकबुली: परमेश्वराच्या चारित्र्याच्या संबंधात येथे एक पापकबुली आहे. "तूं मला शुद्ध करू शकतो. तूं मला स्वस्थ करू शकतो. मला स्वस्थ करण्यास तुझ्याकडे सामर्थ्य आहे."
कदाचित तुम्ही कोणत्यातरी रोगाने पिडीत आहात आणि आश्चर्य करीत आहात की परमेश्वर तुम्हाला स्वस्थ करण्यास तयार आहे काय?
तुमची खात्री नाही, की तो तयार आहे की नाही कारण जसे तुम्ही पाहिले आहे की लोक स्वस्थ होत होते, तुम्ही हे सुद्धा पाहिले आहे की लोक स्वस्थ होत नव्हते. माझ्या मित्रा, लोकांच्या अनुभवाकडे पाहू नको. वधस्तंभाकडे पाहा!
जसे हे निश्चित आहे की येशूने तुझे पाप वाहिले आहे, त्याने तुझा आजार सुद्धा वाहून नेला आहे! ह्या सत्यावर विश्वास ठेवण्यासाठी मला तुम्हाला आज एक भक्कम पाया द्यायचा आहे. यशया ५३ मध्ये, आपल्या प्रभूच्या वधस्तंभावर जाण्यासंबंधी अध्याय मध्ये, येथे वचन ४ मध्ये हे म्हणते, "खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले." आता, चला आपण थोडेसे इब्री शिकू. येथे शब्द "व्याधी" व "क्लेश" याचा अर्थ हा मूळ इब्री शब्दात "आजार" व"पीडा" असे आहे. म्हणून यशया शारीरिक स्वस्थतेबद्दल संदर्भ देत आहे.
आज, परमेश्वराला हे पाहिजे की तुम्ही हे जाणावे की तो तुम्हालास्वस्थ करण्यास समर्थ तसेच तयार आहे. हे समजण्यास सुरु करा आणि त्यावर विश्वास ठेवा कीतुम्हाला स्वस्थ व्हावे असे वाटण्यापेक्षा तुम्ही स्वस्थ व्हावे हे त्यास पाहिजे.
तेव्हा त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श केला व म्हटले, माझी इच्छा आहे, शुद्ध हो; लागलेच त्याचे कुष्ठ जाऊन तो शुद्ध झाला. (मत्तय ८;३)
येशूच्या स्पर्शाने कुष्ठरोग्यास स्वस्थ केले.
तुम्हाला आणि मला इतर सर्व गोष्टींपेक्षा कशाची अधिक गरज आहे ती येशूच्या स्पर्शाची. त्याचा स्पर्श सर्व काही बदलेल जे तुमच्या जीवनात योग्य नाही.
मग येशूने त्याला म्हटले, पाहा, हे कोणाला सांगू नको; तर जाऊन स्वतःस 'याजकाला दाखीव' आणि त्यांना प्रमाण पटावे म्हणून तुझ्या शुद्धीकरीता, मोशेनेनेमिलेले अर्पण वाहा. (मत्तय ८:४)
प्रत्येकवेळी जेव्हा तुम्ही परमेश्वराला दान देताहीदेवाची तुमच्या प्रती विश्वसनीयतेची साक्ष आहे. प्रत्येकवेळी जेव्हा तुम्ही दान देता तुम्ही म्हणत आहां, "परमेश्वरा तूं माझ्याबरोबर चांगला राहिला आहे."
येशूने त्या मनुष्याला त्याच्या स्वस्थ होण्याची साक्ष देण्यास सांगितले.
मग येशू कफर्णहुमास आल्यावर एक शताधिपती त्याच्याकडे आला व त्याला विनंती करून म्हणाला, प्रभुजी, माझा चाकर पक्षघाताने अतिशय पीडित होऊन घरांत पडला आहे. (मत्तय ८:५-६)
हा शताधिपती येशूकडे त्याच्या चाकराच्या वतीने आला. ही मध्यस्थी आहे.
"परंतु राज्याचे पुत्र बाहेरील अंधारात टाकिले जातील, तेथे रडणे व दांत खाणे चालेल." (मत्तय ८:१२)
येथे पवित्र शास्त्रात तीन उतारे आहेत, जे"बाहेरील अंधार" चा संदर्भ देतात, आणि सर्व तीनही मत्तय च्या शुभवर्तमान मध्ये नोंदले आहेत.(मत्तय ८:१२; २२:१३; २५:३०)
तिन्हीहीघटनेत, वाक्य"बाहेरील अंधार" याचे पुढे स्पष्टीकरण हे "रडणे व दांत खाणे याचे ठिकाण" असे वर्णन केले आहे.
कदाचित न्यायाचे ठिकाण हे "अंधार" असे चित्रित केलेले आहे, कारण देवाच्या प्रेरणा देणाऱ्या उपस्थितीची तेथेअनुपस्थिती आहे.
तेव्हा त्याने भुते शब्दानेच घालविली. (मत्तय ८:१६)
कोणाचे केस ओढणे किंवा त्यास झाडूने मारण्याची गरज नाही जसे हे भुते काढण्याच्या अनेक प्रकरणात घडत असते.
मग तो उठला व त्याने वारा व लाटा यांस धमकाविले, आणि तेथे अगदी निवांत झाले. (मत्तय८:२६)
तो वादळ शमवितो, म्हणजे त्याच्या लाटा शांत होतात (स्तोत्रसंहिता १०७:२९)
जे सर्व काही येशूने केले ते वचनाचे पूर्ण होणे होते.
समुद्राच्या खळबळाटावर तूं अधिकार चालवितोस; तो उचंबळतो तेव्हा त्याच्या लाटा तूं शांत करितोस. (स्तोत्रसंहिता ८९:९)
Chapters