मग परुशी तेथे आले आणि त्याची परीक्षा पाहण्याच्या उद्देशाने म्हणाले, कोणत्याही कारणावरून बायको टाकणे सशास्त्र आहे काय? (मत्तय १९:३)
परुशी लोकांनी विचार केला की घटस्फोट विषयी कठीण प्रश्न विचारण्याद्वारे येशूला कचाट्यात पकडावे. मत्तय सांगतो की ते "त्याची परीक्षा पाहत" होते (वचन ३), याचा अर्थ ते त्यांच्या प्रश्ना विषयी गंभीर नव्हते. म्हणी व एका कठीण प्रसंगा मध्ये येशूला केवळ कचाट्यात पकडावे हे त्यांना पाहिजे होते.
म्हणून त्यांनी त्यास विचारले, "कोणत्याही कारणावरून बायको टाकणे सशास्त्र आहे काय?" (वचन, ३)
त्यास आधुनिक समयाच्या भाषेत म्हटल्यास, तुम्हाला पाहिजे त्या कारणासाठी कोणतीही चूक-नसताना तुम्ही घटस्फोट घेऊ शकता काय?
ह्यामुळे ती पुढे दोन नव्हत तर एकदेह अशी आहेत. म्हणून देवाने जे जोडले आहे ते माणसाने तोडू नये. (मत्तय १९:६)
परमेश्वर घटस्फोट चा द्वेष करतो मग याची पर्वा नाही की ते किती योग्य आहे; त्याने त्यांना एकदेह असे केले आहे व त्यास विभक्त केलेले नाही. "कारण इस्राएल चा परमेश्वर देव म्हणतो,
मला सूटपत्राचा तिटकारा आहे; सेनाधीश परमेश्वर म्हणतो, जो आपल्या पत्नीबरोबर क्रूरतेने वागतो त्याचा मी द्वेष करितो; तर तुम्ही आपल्या आत्म्यास जपा, विश्वासघाताने वागू नका. (मलाखी २:१६)
जरी तुमचे जोडीदार विश्वासहीन होतात व ख्रिस्ताचा नकार करतात, प्रेषित पौल म्हणतो, "ख्रिस्ती पतीच्या द्वारे ख्रिस्तीतर पत्नीस पवित्र करते; व लेकरांना पवित्र करते (१ करिंथ ७:१३). जर तुमचे जोडीदार हे तुमच्या विश्वासासाठी समस्या होतात, तर एखादया योग्य वेळेपर्यंत तुम्ही वेगळे राहू शकता परंतु तुम्ही अशा व्यक्तीसाठी निरंतर प्रार्थना करीत राहिले पाहिजे.
एकदेह
देवाच्या दृष्टित, पती व पत्नी हे एकदेह असे आहेत! हे कारण असले पाहिजे जेव्हा आदामाने, प्रथम त्याच्या पत्नीला पाहिले, त्याने उत्पत्ति २:२३ मध्ये असे का म्हटले, "....आता ही मात्र माझ्या हाडांतले हाड व मांसातले मांस आहे; हिला नारी म्हणावे, कारण ही नरापासून बनविली आहे."
वैवाहिक संबंधामध्ये एक पुरुष व एक स्त्री हे एकदेह समान आहे. हे देवाचे गणित आहे! हे पती व पत्नीचे संयुक्त होण्याचा संदर्भ देते, दोन वेगळे घटक एका मध्ये. ह्या क्षणी, ते अविभाजित आहेत; त्यांस येथूनपुढे "वेगळे करता" येऊ शकत नाही. ते एक कायमचे व मोठया कालावधीचे संबंध होऊन जाते. हे दुसरे काही नसून एक महान रहस्य आहे! इफिस ५:३२ मध्ये देवाचे वचन याचा दुजोरा देते.
विवाह ही एक दैवी संस्था
त्यामुळे, विवाह ही एक मानवी संस्था नाही, परंतु स्वयं परमेश्वरा द्वारे एक दैवी, निर्देशित, स्थापित, जोपासलेली, व संरक्षित आहे.
आणि तसे पाहिले तर, हे केवळ ख्रिस्ती लोकांसाठीच नाही. परमेश्वर सर्व विवाह मानतो, ते सुद्धा जे अविश्वासणाऱ्यांमध्ये होतात कारण विवाह ही दैवी संस्था आहे जी मानवजातीला दिली आहे. (मत्तय १९:४-६)
यामुळेच योहान बाप्तिस्मा देणारा हेरोद अन्तिपास चा त्याच्या व्यभिचार साठी धिक्कार करीत होता (मत्तय १४:१-४). परमेश्वराने परराष्ट्रीय शासक हेरोद चा विवाह सुद्धा मानला.
त्या त्यांस म्हणाला, तुमच्या अंत:करणाच्या कठोरपणामुळे मोशेने तुम्हांस आपल्या बायका टाकू दिल्या; तरी सुरुवातीपासून असे नव्हते. (मत्तय १९:८)
अंत:करणाचा कठोरपणा हा घटस्फोटाचे मूळ कारण आहे. अंत:करणाचा कठोरपणा हा संबंधामध्ये सर्व अपयशाचे कारण आहे.
तेव्हा पेत्राने त्याला म्हटले, "पाहा, आम्ही सर्व सोडून आपल्यामागे आलो आहो, तर आम्हांला काय मिळणार?" (मत्तय १९:२७)
तुमच्या मार्गात जे काही येते त्यासर्वाच्या मागे तुम्ही चालू शकत नाही. तुम्ही कोणत्याही दिशे विना राहाल. तुम्ही कोठेही पोहोचणार नाही. हे केवळ सामाजिक माध्यमावर तुम्ही प्रत्येकाच्या मागे जाऊ शकता ज्याची निश्चितच मी पुष्टी करीत नाही-ज्ञानी पणाने निवड करा.
शिष्यांना प्रभूच्या मागे चालण्यासाठी काहीतरी मागे सोडावयाचे होते. प्रभूच्या मागे चालण्यात येथे व्यक्तिगत त्यागाचा समावेश आहे. ते प्रभूच्या मागे तेव्हा चालले नाही जेव्हा प्रभूच्या मागे चालणे हे त्यांच्यासाठी सोयीस्कर असे होते. प्रभूच्या मागे संपूर्ण अंत:करणपूर्वक चालण्यामध्ये तुम्हाला निश्चितच काही गोष्टींचा त्याग हा करावा लागेल, काही गोष्टी सोडून द्याव्या लागतील.
ख्रिस्त येशूच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व काही हानि असे समजतो. (फिलिप्पै ३:८)
प्रभूच्या मागे महान त्याग करून चालणे हे तुम्हाला हे आणेल...
१. सार्वकालिक पुरस्कार
२. शारीरिक आशीर्वाद सुद्धा
येशूने त्यांस म्हटले, मी तुम्हांस खचित सांगतो, पुनरुत्तीत मनुष्याचा पुत्र आपल्या गौरवाच्या राजासनावर बसेल तेव्हा माझ्यामागे आलेले तुम्हीही बारा राजासनावर बसून इस्राएलाच्या बारा वंशांचा न्यायनिवाडा कराल. आणखी ज्या कोणी घरे, भाऊ, बहिणी, बाप, आई, मुले किंवा शेते माझ्या नांवाकरिता सोडिली आहेत त्याला अनेकपटीने मिळून सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल; परंतु जे पाहिले ते शेवटले आणि शेवटले ते पाहिले असे पुष्कळ जणांचे होईल. (मत्तय १९:२८-३०)
Chapters