तेव्हा तो तारवात बसून पलीकडे गेला व आपल्या नगरास जाऊन पोहचला. (मत्तय ९:१)
त्याचे स्वतःचे नगर हे कफर्णहूम असे म्हटले आहे. (मत्तय ४:१३)
मग पाहा, बाजेवर पडून असलेल्या कोणा एका पक्षघाती मनुष्याला त्याच्याकडे आणिले, तेव्हा येशू त्यांचा विश्वास पाहून पक्षघाती माणसाला म्हणाला, मुला, धीर धर; तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. (मत्तय ९:२)
बाजेवर पडून असलेल्या कोणा एका पक्षघाती मनुष्याला त्यांनी त्याच्याकडे (येशू)आणिले.
हे चित्र मध्यस्थीचे आहे. व्यक्तीला येशूकडे आणणे हे मध्यस्थी करणाऱ्याचे चित्र आहे. लक्षात घ्या ते त्यांच्या स्वतःच्या लाभाकडे पाहत नव्हते परंतु ज्यास त्यांनी त्याच्याकडे आणिले होते त्याच्या लाभासाठी. खरी मध्यस्थी ही निस्वार्थी आहे.
जेव्हा येशूने त्यांचा विश्वास पाहिला
येशूचे नेत्र हे नेहमीच मध्यस्थी करणाऱ्यांवर आहे. हे मनोरंजक आहे की येथे येशूने पक्षघाती मनुष्याच्या विश्वासाकडे पाहिले नाही परंतु ज्यांनी ह्या मनुष्याला त्याच्याकडे आणिले होते त्यांच्या विश्वासाकडे पाहिले.
विश्वास हा दिसू शकतो.
विश्वास कसा दिसू शकतो?
१. आपल्या कृती द्वारे
मग त्यांनी त्याच्याकडे एका पक्षघाती माणसाला घेऊन आले, त्याला चौघांनी उचलून आणिले होते. (मार्क २:३)
कोणताहीव्यक्ति ज्यास चार व्यक्तींनीउचलून घेऊन जाण्याची गरज लागते तो निश्चितच फार वजनदार व्यक्ति असेन. हे त्यांच्यासाठी सोपे नव्हते की त्या माणसाला येशूकडे आणावे.
मला ठाऊक आहे की अनेक लोक जे प्रार्थना सभेला येत नाहीत कारण हे त्यांच्यासाठी थोडे असुविधाजनक असे होते. ते नेहमी बोलतात, "येथे बस नाही, ऑटो-रिक्षा नाही, मला चालावे लागते, मला दोन मजले चढावे लागते वगैरे.
विश्वास हा आपल्या कृती द्वारे दिसतो.
मला दया पाहिजे यज्ञ नको' ह्याचा अर्थ काय, हे जाऊन शिका. (मत्तय९:१३)
संदेष्टा होशेय ६:६ चा संदर्भ येशू देत होता, ज्याने, अनेक शतकांअगोदर, नेमिलेलेप्राणी अर्पण करण्याद्वारे त्यांच्या मूर्तीपूजेबद्दल वगरिबांच्या विरोधात अत्याचार बद्दल बहाणा करण्याच्या प्रयत्नासाठी यहूद्यांचा धिक्कार केला होता.
Chapters