(मत्तय१:१-१७ वाचा)
वंशावळीची नोंद करण्यास मत्तय चे दोन उद्धेश होते:
१. जुन्या कराराच्या इस्राएलव येशू मधील सातत्य दर्शवावे.
२. येशूचा राजेशाही वंश (दाविदाचा पुत्र) वयहूदी वंशाचा संस्थापक (अब्राहामाचा पुत्र) बरोबर त्याचे संबंध दर्शवावे.
अब्राहामाचा पुत्र दावीद ह्याचा पुत्र जो येशू ख्रिस्त, त्याची वंशावळी
मत्तयाचे शुभवर्तमान प्रभु येशूला'राजा' असे सादर करते म्हणून ते असे सुरुवात करते: "अब्राहामाचा पुत्र दावीद ह्याचा पुत्र जो येशू ख्रिस्त, त्याची वंशावळी" काळजीपूर्वक लक्षात घ्या दाविदाला अब्राहामा अगोदर ठेवले आहे.
जुन्या कराराने भविष्यवाणी केली होती की मशीहा हा दाविदाचा पुत्र असेल; अगदी पहिल्या वाक्यात,जुन्या कराराच्या भविष्याची पूर्णता म्हणून मत्तय येशूकडे निर्देश करतो.
मत्तय ने केवळ येशूला दाविदालाजोडले नाही परंतु त्याहूनही मागे अब्राहामापर्यंत.येशू हा अब्राहामाचा वंशज आहे ज्यामध्ये पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. (उत्पत्ति १२:३)
असे विचार त्याच्या मनात घोळत असता पाहा, प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नांत दर्शन देऊन म्हटले, योसेफा, दावीदाच्या पुत्रा, तूं मरीयेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास अनमान करू नकोस, कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. (मत्तय १:२०)
असे विचार त्याच्या मनात घोळत असता पाहा,प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नांत दर्शन दिले:
आपल्या विचारामध्ये सामर्थ्य आहे की स्वर्ग किंवा नरक ला कार्य करावयास लावावे. लक्षातघ्या, योसेफाने केवळ ह्या गोष्टीबद्दल विचार केला, आणि स्वर्ग कार्यरत झाले. तुम्ही दररोज कशावर मनन करिता असता
प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नांत दर्शन दिले:
दूत तुमच्या स्वप्नात तुम्हाला दर्शन देऊ शकतो. त्याच प्रमाणे, सैतान सुद्धा, तुम्हाला तुमच्या स्वप्नात दर्शन देऊ शकतात.
आध्यात्मिक स्तर हा तुम्हाला तुमच्या स्वप्नात उघडा आहे.
तुमच्या स्वप्नात काय म्हटले आहे त्यास तुम्ही ऐकू शकता.
तुमचा आत्मा ऐकण्याचे कार्य करतो.
तरी तिला पुत्र होईपर्यंत त्याने तिलाजाणले नाही; त्याने त्याचे नांव येशू असे ठेविले.
"तरी तिला पुत्र होईपर्यंत त्याने तिलाजाणले नाही"
हे दर्शविते की प्रभु येशूचा जन्म झाल्यावर योसेफ आणि मरीयेचे एक पती-पत्नी असे सामान्य संबंध होते.
Chapters