माणसांनी पाहावे ह्या हेतूने तुम्ही आपले धर्माचरण त्यांच्यासमोर न करण्याविषयी जपा; केले तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ तुम्हांला प्रतिफळ नाही. (मत्तय ६:१)
प्रीति व धर्मादायाचे आपले कार्य हे केवळ इतरांना आशीर्वाद देण्याच्या शुद्ध हेतूने केले पाहिजे. जर गुपित हेतू हे स्वतःची प्रशंसा असेल, तर मग परमेश्वर आपल्याला पुरस्कार देणार नाही.
ह्यास्तव जेव्हा जेव्हा तूं दानधर्म करितोस तेव्हा तेव्हा लोकांनी आपला गौरव करावा म्हणून, ढोंगी जसे सभास्थानात व रस्त्यांत आपणांपुढे शिंग वाजवितात तसे करू नको. मी तुम्हांस खचित सांगतो की, ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. तूं तर दानधर्म करितोस तेव्हा तुझा उजवा हात काय करितो हे तुझ्या डाव्या हाताला कळू नये. (मत्तय ६:२-३)
"तुझा उजवा हात काय करितो हे तुझ्या डाव्या हाताला कळू नये" हे केवळ एक रूपक आहे जे येशूने वापरले की गुप्ततेवर भर दयावे (मत्तय ६:४). हे शक्य नाही की शरीराच्या एका अवयवाने इतर अवयावंपेक्षा स्वतंत्रपणे कार्य करावे (१ करिंथ १२:२६). ह्यात मुद्दा हा आहे की आपले हेतू हे शुद्ध असले पाहिजे.
"तसेच जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करिता तेव्हा तेव्हा ढोंग्यांसारखे असू नका; कारण लोकांनी आपणांस पाहावे म्हणून सभास्थानात व चवाठ्यावर उभे राहून प्रार्थना करणे त्यांस आवडते. मी तुम्हांस खचित सांगतो की, ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. तूं तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करितोस तेव्हा तेव्हा 'आपल्या खोलीत जा व दार लावून घेऊन' आपल्या गुप्तवासी पित्याची 'प्रार्थना कर' म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला तिचे फळ देईल." (मत्तय ६:५-६)
प्रभु येशू सार्वजनिक प्रार्थनेच्या विरोधात नव्हता, तो केवळ आपल्याला ताकीद देत होता की प्रार्थने मागील आपला हेतू हा आपल्या भोवती असणाऱ्या लोकांकडून प्रशंसा प्राप्त करून घेण्यात नसावा.
तुम्ही जेव्हा प्रार्थना करता तेव्हा दार लावून घ्या
देवाकडून असमाधानी असण्याच्या भावनेने तुम्ही सतत संघर्ष करीत आहात काय?
तुम्ही जेव्हा प्रार्थना करता तेव्हा देवाच्या उपस्थिती साठी तुम्ही धडपड करता काय?
परमेश्वर अत्यंत दूर आहे असे तुम्हाला वाटते काय?
तुमच्या प्रार्थनेच्या समयामध्ये तुम्हाला वाढावयाचे आहे काय?
हे रहस्य आहे-दार लावणे
अनावश्यकपणे याचा अर्थ हा नाही की आपण प्रत्यक्षात घरामध्ये एका खाजगी खोली मध्ये असावे. जेव्हा येशू ने स्वतः प्रार्थना केली, ती नेहमी एका बागेत किंवा डोंगरावर केली होती-कोठेतरी जमावापासून दूर. तसेच करण्यास तो आपल्याला शिकवीत आहे. आपल्याला एकटे राहण्याची गरज आहे. इतरांची उपस्थिती आपल्या विचारांमध्ये अडथळा आणते.
"कारण जेथे तुझे धन आहे तेथे तुझे मनही लागेल." (मत्तय ६:२१)
एका मनुष्याची एक कथा सांगण्यात आली होती, जो ह्या जगाच्या तात्पुरत्या गोष्टींवर प्रेम करीत होता. जे काही हस्तगत करावे व मिळवावे म्हणून त्याने पुष्कळ प्रयत्न केले. असे घडले की जेव्हा तो मनुष्य मरण पावला आणि त्याच्या शरीराची चीरफाड (शव-विच्छेदन) केली गेली. चिरफाड ने जाहीर केले की त्याच्या शरीरात हृदय नव्हते. त्याचे मित्र, त्याचे चरित्र जाणून, त्याच्या खजान्याच्या कोठाराकडे गेले, आणि तेथे त्याच्या सर्व संपत्तीच्या मध्य, तेथे त्यांना रक्तबंबाळ असे त्याचे हृदय मिळाले.
ही केवळ एक काल्पनिक कथा आहे, परंतु ही आपल्याला काहीतरी सांगते. तुमचे हृदय हे नेहमीच तुमच्या संपत्तीच्या विचारात असेल. पृथ्वीवरील संपत्ति-ती तुम्ही तुमच्यासोबत घेऊन जाऊ शकत नाही.
...त्याचे (याकोब) हृद्य त्याच्या मुलाच्या जीवा मध्ये अडकलेले होते. "हे घडेल जेव्हा तो हे पाहील की मुलगा हा आमच्याबरोबर नाही आहे, तर तो मरेल. (उत्पत्ति ४४:३०-३१)
तुमची संपत्ति काय आहे हे कसे ओळखावे? तुमचे जीवन कशाने व कशामध्ये अडकलेले आहे? जर तुमचे हृदय काही विषयात अडकलेले किंवा जुडलेले असेल- जी तुमची संपत्ति असेल.
मी तुम्हाला काही सांगू शकतो काय? परमेश्वर तुमच्या संपत्ति विषयी पूर्णपणे जाणून आहे. दु:खद गोष्ट ही आहे की सैतानाला सुद्धा तुमची संपत्ति काय आहे हे ठाऊक आहे.
मग त्याने त्यांना एक दाखला सांगितला: कोणाएका धनवान मनुष्याच्या जमिनीला फार पीक आले. तेव्हा त्याने आपल्या मनात असा विचार केला की, मी काय करू? कारण माझे उत्पन्न साठवावयास मला जागा नाही. मग त्याने म्हटले, मी असे करीन: मी आपली कोठारे मोडून मोठी बांधीन; आणि तेथे मी आपले सर्व धान्य व माल साठवीन. मग मी आपल्या जिवाला म्हणेन, हे जिवा, तुला पुष्कळ वर्षे पुरेल इतका माल ठेवलेला आहे; विसावा घे, खा, पी, आनंद कर; परंतु देवाने त्याला म्हटले, अरे मुर्खा, आज रात्री तुझा जीव मागितला जाईल, मग जे काही तूं सिद्ध केले आहे, ते कोणाचे होईल? जो कोणी स्वतःसाठी द्रव्यसंचय करितो व देवविषयक बाबतीत धनवान नाही, तो तसाच आहे. (लूक १२:१६-२१)
डोळा शरीराचा दिवा आहे; ह्यास्तव तुझा डोळा निर्दोष असला तर तुझे संपूर्ण शरीर प्रकाशमय होईल. (मत्तय ६:२२)
प्रभु येशू आध्यात्मिक प्रकाश विषयी बोलत होता.
Chapters