काही बी कांटेरी झुडूपांमध्ये पडले व कांटेरी झुडपांनीच वाढून त्यांची वाढ खुंटविली, म्हणून त्याला काही पीक आले नाही. (मार्क ४:७)
कोणत्यागोष्टी आहेत जे वचनालाबाधा करतात?
१. या जगाचे विचार व चिंता
२. या काळाचा अडथळा
३. सुख आणि हर्ष आणि खोटे सौंदर्य आणि श्रीमंतीची फसवणूक
४. इतर गोष्टींसाठी ओढ आणि आवेशपूर्ण इच्छा निर्माण होतात आणि वचनास अडवितात आणि गुदमरवून टाकतात आणि मग तेनिष्फळ होते.
पापकबुली
देवाच्या राज्याचे रहस्यदान हे मला दिले आहे ते म्हणजे परमेश्वराचे गुप्त उपदेश जे अभक्त लोकांकडून गुपित ठेवलेले आहे. (मार्क ४:११ ऐम्पलीफाईड)
कोणास ऐकावयास कान आहेत तर तो ऐको. (मार्क ४:२३)
आपल्यापैंकी अनेक आहेत जे देवाचीवाणी ऐकण्यास समर्थ असे स्वाभाविकपणे जन्मलेले नाहीत. हे काहीतरी आहे जे पवित्र आत्म्याने आपल्याला दिले पाहिजे. हेकाहीतरी जे प्रतिदिवशी जोपासले पाहिजे. तेव्हा मग प्रथम सिद्धांत हा ऐकण्याची योग्यता, देवाची वाणी ऐकण्याची योग्यता.
पुन्हा तो त्यांना म्हणाला, तुम्ही जे काही ऐकता त्याविषयी सावध राहा. ज्या मापाने तुम्ही मापून दयाल त्याच मापाने तुम्हांला मापून देण्यात येईल, किंबहुना जास्तही देण्यात येईल. (मार्क ४:२४)
तुम्ही जे काही ऐकता त्याविषयी सावध राहा (मार्क ४:२४).
तुम्ही जे ऐकता ते महत्वाचे आहे कारण:
१. विश्वास ऐकण्याने येतो (रोम १०:१७)
देवाचे वचन ऐकण्याने विश्वास येतो. जेव्हा तुम्ही देवाच्या वचनाचा अभ्यास करता आणि त्यावर मनन करता, तुम्ही तुमच्या विश्वासाला वाढविता. जेव्हा तुम्ही तुमचा विश्वास कार्यात आणता (तुमचा विश्वास कृती मध्ये दाखविणे) तेव्हा तुम्ही त्यास समर्थ करता.
२. भीती ही ऐकण्याने येते
भीती ही शत्रूच्या खोटया गोष्टी ऐकण्याने येते. शत्रूचे खोटेपण असे म्हणण्याचा माझा अर्थ काय आहे? काहीही जे देवाच्या वचनाशी विसंगत आहे.
अधिक मिळण्याचे गुप्त हे ऐकणे,
आणि तुम्ही कोणाचे ऐकता, तेव्हा तुम्हांला अधिक देण्यात येईल. (मार्क ४:२४)
पेत्राने हे ठरविले की येशू काय सांगत आहे ते ऐकावे आणि त्याने त्याची जाळी टाकली आणि भरपूर मिळाले.
बायबल मधील प्रत्येकजण ज्यांनी अधिक प्राप्त केले त्यांनी हे ठरविले की ऐकावे. हे असे असू शकते ते जे त्यांच्या जीवनात बढत पाहत नाहीत ते त्याबाबतीत काळजी घेत नसतील की आत्मा त्यांस काय सांगत आहे?
ज्या मापाने तुम्ही मापून दयाल त्याच मापाने तुम्हांला मापून देण्यात येईल. (मार्क ४:२४)
जितके अधिक आपण देवाची वाणी ऐकण्यास स्वतःला देतो, परमेश्वरस्वतःस तितकेच अधिक परत आपल्याला देईल.
दुसऱ्या शब्दात,प्रमाणहे आपण स्वतःठरवितो कीज्याद्वारे परमेश्वराने स्वतः आपल्याला परत दयावे. प्रमाण ज्याद्वारे आपण ऐकतो हे ते प्रमाण आहे ज्याद्वारे परमेश्वर स्वतः आपल्याला परत देईल.
कारण ज्याला आहे त्याला दिले जाईल व ज्याला नाही त्याचे असेल नसेल तेही त्याच्यापासून काढून घेतले जाईल. (मार्क ४:२५)
चुकीचे ऐकण्याने (किंवा ऐकण्यात चूककरणे), आपणआपले आध्यात्मिक स्त्रोत कमी करतो आणि शेवटी आध्यात्मिकदृष्टया कंगाल होतो.
इतक्या वर्षांपासून, मीमाझ्या जीवनात अनेक ख्रिस्ती लोकांना भेटलो आहे, जेपूर्णपणे कंगाल झालेले दिसत होते, जरी ते मागील वर्षात परमेश्वराच्या आशीर्वादाने भरपूर होते. कशाने त्यांना कंगाल केले? त्यांनी ऐकण्याची योग्यता गमाविली (त्यांनी ती योग्यता जोपासणे सोडले होते) आणि चुकीच्या गोष्टींना ऐकण्यास सुरुवात केली होती. त्यांनी देवाला बाजूलाकेले होते आणि स्वतःला वाईटाला, नकारात्मक स्त्रोत ला उघडे केले होते, ज्याने त्यांना आध्यात्मिकदृष्टया कंगाल केले होते.
निवड ही तुमची आहे: तुम्ही इतर आवाज द्वारे देवाच्या वाणी चा कोंडमारा करू देणार काय, आणि ते काढून घेऊ देणार काय जे तुम्ही अगोदर प्राप्त केले होते? किंवा तुम्ही निवडणार की तुम्ही कोणी होणार जे ऐकतात...कोणीतरी ज्यास प्रतिदिवशी अधिक दिले जाईल?
तो तर वरामास उशास घेऊन झोपी गेला होता'; तेव्हा ते त्याला जागे करून म्हणाले, गुरुजी, आपण बुडत आहोत तरी आपणांला काहीच वाटत नाही काय? (मार्क ४:३८)
येशू नेहमीच शांत होता. तो कधीही घाई मध्ये नसायचा. तो त्या नावे मध्ये सुद्धा झोपू शकत होता जी वादळात होती. मार्क ४:३५-३९ मधील घटनेत, हे ते वादळ नव्हते ज्याने त्यास उठविले, परंतु त्याच्या शिष्यांची ओरड.
जेव्हा तो उठला, त्याने वारा व समुद्राला म्हटले, "उगा राहा, शांत हो." जो अंतर्मनात शांति मध्ये आहे तोच उग्र वातावरणास शांतमय वातावरणात बदलू शकतो. त्यानेत्याच्या शिष्यांच्या हृदयातील वादळास सुद्धा शांत केले, हे जेथे सुरु झाले होते. तुम्हाला तीच शांति असू शकते कारण तुम्ही ख्रिस्ता मध्ये आहात!
जेव्हा तुम्ही त्या शांति मध्ये चालता, तुम्ही लवकरच हे पाहाल की तुम्ही सुदृढ होत आहात. तुमचे संबंध हे घनिष्ठ आणि अर्थपूर्ण होईल.
Chapters