नंतर तो तेथून निघून आपल्या गांवी आला व त्याचे शिष्य त्याच्यामागे आले. (मार्क ६:१)
मत्तय आणि मार्क दोघेही हे स्पष्ट करतात की येशू गालील च्या भागातून गेला, आणि त्याच्या आपल्या गावी आला. (मत्तय १३:५४; मार्क ६:१)
निस्संशय त्याचे गाव नासरेथचाहा संदर्भ आहे, नगर जेथे येशू योसेफ व त्याची आई यांच्या घरी मोठा झाला.
थोडयाशाच रोग्यांवर हात ठेवून त्याने त्यांस बरे केले, ह्याशिवाय दुसरे कोणतेही महत्कृत्य त्याला तेथे करता आले नाही. त्यांच्या अविश्वासामुळे त्याला आश्चर्य वाटले. मग तो शिक्षण देत देत गांवोगाव फिरला. (मार्क ६:५-६)
पुन्हा पुन्हात्यांनी देवाची परीक्षा पाहिली, व इस्राएलाच्या पवित्र प्रभूस चिडविले. (स्तोत्रसंहिता ७८:४१)
परंतु हे ऐकून हेरोद म्हणाला, ज्या योहानाचा मी शिरच्छेद केला, तोच उठला आहे. (मार्क ६:१६)
हेरोद ने हे म्हटले आणि अनेकांनी त्यावर विश्वास ठेवला असेन.
तथापि, येशू मृत्युमधून उठला (आणि ही एक वास्तविकता आहे)आणि तरीही लोकांना त्यावर विश्वास ठेवणे अवघड होते.
जसे ईजबेल ने एलीयाचा विरोध केला, हेरोदियास ने योहान बाप्तिस्मा देणाऱ्याचा विरोध केला. एक तिसरे उदाहरण येथे प्रकटीकरण २:२० मध्ये आढळते.
येशूचे प्रार्थनेचे जीवन
मग लोकांना निरोप देऊन तो प्रार्थना करावयास डोंगरावर गेला.
आणि रात्र झाली तेव्हा तो मचवा समुद्राच्या मध्यभागी होता व तो (येशू) एकटाच जमिनीवर होता. त्याला ते वल्ही मारता मारता हैराण झालेले दिसले कारण वारा तोंडचा होता. नंतर रात्री चौथ्या प्रहराच्या [पहाटे३.०० ते ६.०० च्या मधील वेळ]सुमारास तो समुद्रावरून चालत [सरळपणे]त्यांच्याकडे आला; व त्यांच्याजवळून पुढे जाण्याचा त्याचा बेत होता. (मार्क ६: ४६-४८)
रात्री(७ वाजता म्हणा) ते सकाळी ३- म्हणजे ८ तास. प्रभु येशूने जवळ जवळ ८ तासापेक्षा अधिक वेळ पाण्यावर चालण्याअगोदर प्रार्थनेत घालविला असेन.
आपण बायबल मध्ये वाचतो की ख्रिस्ताने चवथ्या प्रहरी प्रार्थना केली आहे, जे पहाटे ३ वाजता सुरु होते. गालील समुद्राच्या मध्य त्याने पाहिले की त्याचे शिष्य वल्ही मारता मारता हैराण झालेले आहेत कारण वारा तोंडचा होता. तेव्हा अजूनही अंधार होता, तर मग डोंगरावरून ३ मैलाच्या अंतरावरून७ मैल रुंद तलावाच्या मध्य कोणी कसे पाहू शकतो?
ह्या उताऱ्यात शब्द पाहणे हा ग्रीक शब्द आहे ज्याचा अर्थ "आत्म्याने पाहणे" असा आहे. ख्रिस्ताने त्याच्या स्वाभाविक नेत्रांनी त्यांना पाहिले नाही; त्याने त्याच्या आध्यात्मिक नेत्रांनी पाहिले की ते संकटामध्ये आहेत.
...कित्येक आपल्या वस्त्राच्या गोंड्याला तरी स्पर्श करू दया अशी त्याला विनंती करीत; आणि जितके त्याला स्पर्श करीत तितके बरे होत. (मार्क ६:५६)
स्त्री जिला रक्तस्राव होता तिने फार त्रास भोगला आणि मग त्याची साक्ष दिली होती. अनेकांनी असेच करण्यास सुरु केले जे तिने केले होते आणि तसाच परिणाम प्राप्त करू लागले. हे साक्षीचे सामर्थ्य दाखविते.
जर त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श करण्याने लोक बरे होत होते, तर मग आज त्याची लेकरे जेव्हा त्यास स्पर्श करीत आहेत त्याबद्दल काय-ते म्हणजे मृत्युमधून जीवनच असेन!
Chapters