परुशी तेथे आले आणि त्याची परीक्षा पाहण्याच्या उद्देशाने त्यांनी त्याला विचारले की, पुरुषाने बायको टाकणे सशास्त्र आहे काय? उत्तरादाखल तो म्हणाला, मोशेने तुम्हांला काय आज्ञा दिली आहे? (मार्क १०:२-३)
प्रभु येशूने प्रश्नाला प्रश्नाने उत्तर दिले जेव्हा त्याने पाहिले कीव्यक्ति हा शिकण्यासाठी विचारत नाही परंतु वादविवाद करण्यासाठी.
मी तुम्हांस खचित सांगतो, जो कोणी बाळकासारखा होऊन देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही त्याचा प्रवेश त्यात मुळीच होणार नाही. (मार्क १०:१५)
तुम्हाला देवाच्या गोष्टींमध्ये प्रवेश करण्यासाठी तुम्हांला बाळकासारखे व्हावयाला पाहिजे. (बालीश नाही)
येशूने त्याच्याकडे निरखून पाहिले, व त्याच्यावर त्याने प्रीति केली. तो त्याला म्हणाला, तुझ्यांत एका गोष्टीची उणीव आहे; जा, तुझे असेल नसेल ते विकून गोरगरिबांना देऊन टाक म्हणजे तुला स्वर्गात संपत्ति मिळेल आणि चल, माझ्यामागे ये. (मार्क १०: २१)
हा तरुण मनुष्य एक प्रामाणिक आध्यात्मिक भूक घेऊन येशूकडे आला. देवाच्या आज्ञा पाळण्याविषयी मुलभूत गरजांसाठी तरुण मनुष्याचे आज्ञापालन समजण्यासाठी प्रभु परिचित गोष्टींचा आढावा घेतो.
पवित्र आत्म्याच्या अभिषेकाने, येशू फारच व्यक्तिगतरीत्या ह्या तरुण मनुष्याच्या विनंतीलाउपदेशदेतो. येशूने त्यातरुण मनुष्याकडे प्रीतीने पाहिले, आणि म्हटले, "एका गोष्टीची उणीव आहे." या मनुष्याला पुढील आध्यात्मिक प्रगती करण्यामध्ये एक गोष्ट होती जी अडथळा करीत होती-प्रत्यक्षता ही की त्याने त्याच्या संपत्ति मध्ये विश्वास ठेवला होता. प्रगट होण्यामध्ये "एक गोष्ट" प्रत्यक्षात"ज्ञानाचे वचन" आहे.
देवाकडे जाण्याच्याह्या मनुष्याच्या मार्गात तेथे शक्यतो शेकडो गोष्टी अडथळा करीत असतील परंतु पवित्र आत्म्याने "ज्ञानाच्या वचना" ने येशूला हे प्रगट केले की त्याचा त्याच्या संपत्ति वरील विश्वास हा त्यास मागे खेचत होता. आता असे आहे की हा अडथळा उघड केला गेला आहे, येशू त्या मनुष्याला ज्ञानाच्या वचनाने उत्तर देतो.
ज्ञानाचे वचन हे देवाकडून एक अद्भुत शिकवण आहे जे समस्या सोडवते आणि पुढे जाण्यासाठी मार्गप्रगट करते. "तुझे असेल नसेल ते विकून गोरगरिबांना देऊन टाक म्हणजे तुला स्वर्गात संपत्ति मिळेल आणि चल, माझ्यामागे ये. परंतु हे शब्द ऐकून त्याचे तोंड उतरले व कष्टी होऊन तो निघून गेला; कारण तो फार श्रीमंत होता. (मार्क १०:२१-२२) दु:खद आहे की ह्या मनुष्याने ज्ञानाच्या वचनाचे पालन केले नाही. देवाच्या सिद्ध इच्छे मध्ये प्रवेश करण्यापासून तो मागेच थांबून राहिला.
परंतु हे शब्द ऐकून त्याचे तोंड उतरले व कष्टी होऊन तो निघून गेला; कारण तो फार श्रीमंत होता. (मार्क १०:२२)
हे चूक नाही की संपत्ति असावी परंतु हे धोकादायक आहे की संपत्तीने तुम्हाला ताब्यात ठेवावे.
प्रभु येशूने ह्या बंधनाला उघडे केले. वचन हे तुमचा अशक्तपणा प्रगट करेल. तुम्ही पाहिले आहे काय, लोक दु:खविले जातात जेव्हा दान देण्याविषयी उल्लेख केला जातो? ही तीच अगदी गोष्ट असते जी करण्याची त्यांना गरज असते म्हणजे ते त्यांची नवीन वाटचाल प्राप्त करू शकतील.
परंतु तुमची गोष्ट तशी नाही; तर जो तुम्हांमध्ये मोठा होऊ पाहतो त्याने तुमचा सेवक झाले पाहिजे; आणि जो कोणी तुम्हांमध्ये पहिला होऊ पाहतो त्याने सर्वांचा सेवक झाले पाहिजे. कारण मनुष्याचा पुत्रही सेवा करून घ्यावयास नाही तर सेवा करावयास व पुष्कळांच्या मुक्तीसाठी आपला जीव खंडणी म्हणून अर्पण करावयास आला आहे. (मार्क १०: ४३-४५)
प्रेषित पौलाने स्वतःला अनेक प्रसंगी ख्रिस्ताचा गुलाम किंवा सेवक असे संबोधले आहे. येशूने तारणा द्वारे तुम्हाला पुत्र किंवा पुत्री केले आहे परंतु मग तुम्हाला एक सेवक होणे हे निवडले पाहिजे. सेवकपण हे निवडी विषयक गोष्ट आहे. आपण सेवा करण्यासाठी निवड केली पाहिजे.
"मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावयास नाही, तर सेवा करावयास व पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करण्यास आला आहे." (मत्तय २०:२८)
सेवक साठी आणखी एक शब्द जे बायबल वापरते ते 'लीटूरगॉस' आहे, याचा अर्थ "एक सार्वजनिक सेवक, एक सेवा करणारा, एक सेवक." याचा अर्थ ते सेवकपण निभावण्यासाठी स्वतःला कमी लेखले पाहिजे. सेवा करण्यासाठी तुम्हांला किंमत सुद्धा भरावी लागू शकते.
Chapters