आणखी, तो त्यांना म्हणाला, मी तुम्हांला खचित सांगतो की, येथे उभे असणाऱ्यांपैकी काहीं जण असे आहेत की, देवाचे राज्य सामर्थ्यानिशी आलेले दिसेपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही. (मार्क ९:१)
रूपांतराच्या डोंगरावरील अनुभवाचा संदर्भ प्रभु येशू देत आहे काय?
तेव्हा एक मेघ आला व त्याने त्यांच्यावर छाया केली आणि मेघांतून अशी वाणी झाली की, हा माझ्या 'प्रिय पुत्र आहे, ह्याचे तुम्ही ऐका.' (मार्क ९:७)
कोणी असा विचार करीलकी स्वर्गातील वाणी हे म्हणेल, "माझे ऐका!" परंतु पित्याने म्हटले, "ह्याचे ऐका!" सर्व काही आपल्याला येशूकडे निर्देश देते.
लक्षात घ्या, वाणी ने हे सुद्धा म्हटले नाही, "एलीया किंवा मोशे चे ऐका!" वाणी ने म्हटले, "ह्याचे ऐका".
इब्री १:१-२ ह्या सर्वांना सारांशीत करते.
देव प्राचीन काळी अंशाअंशांनी व प्रकाराप्रकारांनी संदेष्ट्यांच्या द्वारे आपल्या पूर्वजांशी बोलला. तो ह्या काळाच्या शेवटी पुत्राच्या द्वारे आपल्याशी बोलला आहे; त्याने त्याला सर्व गोष्टींचा वारीस करून ठेविले आणि त्याच्याद्वारे त्याने विश्व निर्माण केले.
ऐका व स्वस्थ व्हा आणि सुटका प्राप्त करा.
तेव्हा एक मेघ आला व त्याने त्यांच्यावर छाया केली आणि मेघांतून अशी वाणी झाली की, हा माझ्या 'प्रिय पुत्र आहे, ह्याचे तुम्ही ऐका.' (मार्क ९:७)
ह्या लोकांनी डोळ्यांनी पाहून, कानांनी ऐकून व मनाने समजून मजकडे वळून सुधारू नये म्हणून त्यांचे हृदय जड कर, त्यांचे कान बधिर कर व त्यांचे डोळे चिपडे कर. (यशया ६:१०)
एक सर्वांत प्रमुख कारण की लोक स्वस्थ झाले नाहीत कारण त्यांचे कान जड झालेहोते आणि याकारणामुळे ते ऐकू शकले नाही. यानेत्यांस परमेश्वराकडे वळणेआणि स्वस्थता प्राप्त करण्यापासूनरोखले.
तथापि, त्याच्याविषयी वार्ता ही अधिकच पसरत गेली; आणि मोठा लोकसमुदाय एकत्र त्याच्याकडे ऐकण्यासाठी, आणि त्यांच्या व्याधींपासून स्वस्थ होण्याकरिता आला.
ते त्यास ऐकण्यासाठी आले, आणि ह्याने त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण केला जो स्वस्थ होण्यास आवश्यक होता.
आणि तो त्यांच्याबरोबर खाली उतरून सपाटीच्या जागेवर उभा राहिला, आणि त्याच्या शिष्यांचा मोठा समुदाय, आणि सर्व यहूदीया व यरुशलेम येथून, व सोर व सीदोन ह्यांकडल्या समुद्रकिनाऱ्यापासून त्याचे श्रवण करावयास व आपले रोग बरे करून घ्यावयास जे लोक आले होते, त्यांचा मोठा जमाव तेथे उभा होता; तेव्हा जे अशुद्ध आत्म्यांनी पीडलेले होते त्यांस त्याने बरे केले.
ऐकणे केवळ स्वस्थता आणीत नाही परंतु सुटका सुद्धानिर्माण करते.
विश्वास ऐकण्याने येतो...(रोम १०:१७)
तेव्हा त्या आत्म्याने येशूला पाहताच मुलाला पिळून टाकले आणि तो जमिनीवर पडून तोंडाला फेंस आणून लोळू लागला.
जर तुम्ही लोकांना देवाचे वचन ऐकण्याकडे नेऊ शकले, तरीही तुम्ही त्यांना स्वस्थ करू शकता.
दुष्ट आत्मे कसे काढावे
अरे मुक्याबहिऱ्या आत्म्या, मी तुला आज्ञा करितो ह्याच्यातून नीघ व पुन्हा कधी ह्याच्यांत शिरू नको. (मार्क ९:२५)
तो त्यांस म्हणाला, ही जात प्रार्थनेवाचून दुसऱ्या कशानेही निघणारी नाही. (मार्क ९:२९)
उपास व प्रार्थना विश्वासणाऱ्यास समर्थ करते की अंधाराच्या हट्टी आत्म्यांना काढून टाकावे.
योहान त्याला म्हणाला, गुरुजी, आपला अनुयायी नसलेल्या कोणाएकाला आम्ही आपल्या नांवाने भुते काढताना पाहिले, तेव्हा आम्ही त्याला मना केले, कारण तो आपला अनुयायी नव्हता. (मार्क ९:३८)
ह्या मनुष्याला येशूच्या नांवाचे अगोदरच प्रकटीकरण होते. केवळ याची गरज आहे की तुम्हाला येशूच्या नांवाचे प्रकटीकरण असावे.
Chapters