त्याने त्यांना उत्तर दिले, तुम्हां ढोंग्यांविषयी यशयाने चांगलाच संदेश देऊन ठेवला आहे. त्याचा लेख असा: 'हे लोक ओठांनी माझा सन्मान करितात, परंतु त्यांचे अंत:करण माझ्यापासून दूर आहे.' (मार्क ७:६)
सन्मान हा ओठांद्वारे (शब्द) देऊ शकतात. केवळ जर आपले ओठ आणि हृदय सहमत झाले तर तो खरा सन्मान आहे. खरी उपासना ही हृदयापासून येते.
'हे लोक ओठांनी माझा सन्मान करितात, परंतु त्यांचे हृदय हे संकुचित आणि फार दूर आहे.
परमेश्वराबरोबर आत्म्या द्वारे (अंत:करणा द्वारे)जुळलेले नसताना सुद्धा प्रार्थना करणे हे शक्य आहे. प्रार्थना ही मग केवळ एक रीतहोऊन जाते जी केवळ आपल्या मानसिक स्तराला समाधान देते. येथे आध्यात्मिक वाढ होत नाही.
परमेश्वराबरोबर आत्म्या द्वारे (अंत:करणा द्वारे)जुळलेले नसताना सुद्धा अन्य भाषेमध्ये प्रार्थना करणे हे शक्य आहे. येथे उन्नति होत नाही.
परमेश्वराबरोबर आत्म्या द्वारे (अंत:करणा द्वारे)जुळलेले नसताना सुद्धा परमेश्वराचीस्तुति आणि उपासना करणे हे शक्य आहे. हे मग केवळ बाह्य देखावा होतो की मनुष्यांना प्रभावित करावे.
ते व्यर्थ माझी उपासना करितात कारण ते शास्त्र म्हणून जे शिकवितात, ते असतात मनुष्यांचे नियम. (मार्क ७: ७)
खऱ्या उपासनेचा पाया हा देवाच्या वचनात आहे.
ते व्यर्थ (निष्पळपणे आणिकोणत्याही लाभा विना) माझी उपासना करितात.(मार्क ७: ७)
उपासने मध्ये येथे निष्पळपणा आहे. जिवंत परमेश्वराची उपासना करण्यात येथे लाभ आहे.
तुम्ही देवाची आज्ञा बाजूला सारून देता व माणसांच्या संप्रदायाला चिकटून राहता-भांडेआणि कप धुणे आणि इतर अनेक अशा गोष्टी तुम्ही करता. (मार्क ७:८)
सर्वसंप्रदाय हे वाईट नाहीत. काहीसंप्रदाय हे चांगले आहेत. जेव्हासंप्रदाय देवाच्या वचनाला बाजूला सारून देतात, मग ते एक धोकादायक नियम होतो.
प्रभु येशूने सर्वच संप्रदायांचा धिक्कार केला नाही. त्याने म्हटले, "तुम्ही देवाची आज्ञा बाजूला सारून देता व माणसांच्या संप्रदायाला चिकटून राहता".
संप्रदायाने देवाच्या वचनाला कधीही बाजूला नाही सारले पाहिजे.
संप्रदाय काय आहे?
हे काहीतरी आहे ज्याची देवाने आज्ञा दिली नाही परंतु पिढ्यांपासून एक आचरण किंवा पद्धती आपल्याला दिल्या गेल्या आहेत.
संप्रदाय चे एक उदाहरण:
आणखी तो त्यांना म्हणाला, तुम्ही आपला संप्रदाय पाळण्याकरिता देवाची आज्ञा मोडण्याचा छान मार्ग शोधून काढला आहे! कारण मोशेने सांगितले आहे की, 'तूं आपला बाप व आपली आई ह्यांचा मान राख' आणि'जो कोणी आपल्या बापाची किंवा आईची निंदा करितो त्याला देहांत शिक्षा व्हावी.' परंतु तुम्ही म्हणता जर एखादा आपल्या बापाला अथवा आईला म्हणाला की, जे मी तुम्हाला पोषणासाठी द्यावयाचे ते कुर्बान म्हणजे अर्पण केले आहे. तर तुम्ही त्याला आपल्या बापासाठी किंवा आईसाठी पुढे काही करू देत नाही; अशा प्रकारे तुम्ही आपला संप्रदाय चालू ठेवून देवाचे वचन रद्द करता आणि ह्यासारख्या आणखी पुष्कळ गोष्टी करता. (मार्क ७:९-१३)
जर तुम्ही देवाची सेवा करीत आहात तर मग तुम्ही आपल्या आई-वडिलांचासन्मान करावा, तसे करण्यापासून ते तुम्हाला सूट देत नाही.
काही लोक लोकांना दुखवू नये याभीतीमुळेसंप्रदायपाळतात हे न जाणून की तसे करण्याने ते शेवटी देवालाच दुखवितात.
तो त्यांना म्हणाला, तुम्ही देखील इतके अज्ञानी आहा की काय? जे काही बाहेरून माणसाच्या आत जाते ते त्याला भ्रष्ट करू शकत नाही, हे तुम्हाला समजत नाही काय? कारण ते त्याच्या अंत:करणात नव्हे तर त्याच्या पोटांत जाते व शौचकुपातून बाहेर पडते. (अशा रीतीने त्याने सर्व प्रकारचे अन्न शुद्ध ठरविले.) (मार्क ७:१८-१९)
अन्न हे तुम्हाला आध्यात्मिकदृष्टया दूषित करू शकत नाही.
देवापुढे आपली योग्यायोग्यता अन्नानेठरत नाही; न खाण्याने आपण कमी होत नाही; आणि खाण्याने आपण अधिक होत नाही. (१ करिंथ ८:८)
हे आतून, मनुष्यांच्या अंत:करणातून (मार्क ७:२१)
१. वाईट विचार निघतात
२. जारकर्म
३. चोरी
४. खून
५. व्यभिचार
६. लोभ
७. दुष्टपणा
८. कपट
९. कामातुरपणा
१०. हेवा
११. शिव्यागाळ
१२. अहंकार
१३. मूर्खपणा
ह्या सर्व वाईट गोष्टी आतून बाहेर निघतात व माणसाला भ्रष्टकरितात. (मार्क ७: २३)
तो तिला म्हणाला, तुझे म्हणणे पटले, जा; तुझ्या मुलीतून भूत निघून गेले आहे. (मार्क ७: २९)
कारण हे म्हणणे याचा अर्थ, तुमची पापकबुली ही तुमची सुटका आणेल.
Chapters