अद्भुत सामर्थ्य- भुताने पछाडलेअसण्याचे चिन्ह (मार्क ५:१-५).
ते येशुजवळ आल्यावर तो भूतग्रस्त, म्हणजे ज्यांत सैन्य होते तो, बसलेला, वस्त्र पांघरलेला आणि शुद्धीवर आलेला त्यांच्या दृष्टीस पडला; आणित्यांना भीति वाटली. (मार्क ५:१५)
काय विरोधाभास? जेव्हा मनुष्य भुताने ग्रस्त होता, लोक हे त्यास भीतनव्हते परंतु जेव्हा मनुष्य बसलेला, वस्त्र पांघरलेला आणि शुद्धीवर आलेला आहे, तेव्हा लोकांना भीती वाटली.
उच्च पदावर असलेले लोक हे भ्रष्ट लोकांना घाबरत नाहीत, ते त्या लोकांना घाबरतात जे सत्य बोलतात व त्याप्रमाणे जगतात.
चार प्रार्थनेच्या विनंत्या
विनंती#१
येशूला दुरून पाहताच तो धावत आला व त्याच्या पाया पडला; आणि मोठयाने ओरडून म्हणाला, हे येशू, परात्पर देवाच्या पुत्रा, 'तूं मध्ये का पडतोस?' मी तुला देवाची शपथ घालतो, मला छळू नकोस. (मार्क ५:६-७)
विनंती#२
तेव्हा भुतांनी त्याला विनंती केली की, आम्ही त्या डुकरांत शिरावे म्हणून त्यांच्याकडे आम्हांस लावून दे. मगत्याने त्यास परवानगी दिली. (मार्क ५:१२)
विनंती#३
ज्यांनी ते पाहिले होते त्यांनी, भूतग्रस्ताला काय झाले ते वा डुकरांविषयी हकीकत त्यांना सांगितली. तेव्हा आपण आमच्या प्रांतातून निघून जावे असे ते त्याला विनवू लागले. (मार्क ५:१६-१७)
तिन्हीही विनंत्यांना प्रभूने उत्तर दिले परंतुचवथीला उत्तर दिले नाही.
विनंती#४
मग तो मचव्यावर जात असता, पूर्वी भूतग्रस्त असलेला माणूस त्याला विंनती करू लागला की, मला आपल्याजवळ राहू दया. (मार्क ५:१८)
येशूला पाहिजे की आपण त्याचे साक्षीदार व्हावे. तुम्हाला स्वस्थ केले आणि भुतांपासून मुक्त केले की साक्षी दयावे.
Chapters