त्या दिवसांत पुन्हा एकदा लोकांचा मोठा समुदाय जमला होता व त्यांच्याजवळ खावयाला काही नव्हते, म्हणून त्याने आपल्या शिष्यांना बोलावून त्यांना म्हटले, मला ह्या लोकांचा कळवळा येतो, कारण आज तीन दिवस ते माझ्याबरोबर आहेत व त्यांच्याजवळ खावयाला काही नाही; मी त्यांना उपाशी घरी लावून दिले तर ते वाटेने कासावीस होतील; त्यांतील कित्येक तर दुरून आलेले आहेत. (मार्क ८:१-३)
सांघिक उपासाचे हे एक उदाहरण आहे.
सांघिक उपासाचे पुढील हेआणखी एक उदाहरण आहे.
ते प्रभूचीसेवा व उपास करीत असता पवित्र आत्मा म्हणाला की, बर्णबा व शौल ह्यांना ज्या कार्यासाठी मी बोलाविले आहे त्यासाठी त्यांना माझ्याकरिता वेगळे करून आणि त्यांच्यावर हात ठेवून त्यांची रवानगी केली. (प्रेषित १३: २-३)
सांघिक उपासाचे महत्त्व
आत्म्यासाठी तुमची संवेदनशीलता वाढविते
सामान्य विश्वासणारे एकत्र आले की प्रार्थना व उपास करावा आणि प्रेषित १३ म्हणते, उपासना करीत असताना त्यांनी पवित्र आत्म्याकडून ऐकले. सांघिक उपासाने पवित्र आत्म्याची वाणी व कार्याच्या सांघिक संवेदनशीलतेकडे नेले.
ऐक्यता वाढविते
विश्वासणाऱ्यांमधील किरकोळ गैरसमजमुळे उभारलेल्या अदृश्य भिंती आत्म्याच्या प्रवाहास अडथळा करतात. संघाला वाढण्यासाठी अदृश्य मर्यादा अडथळा करतात ते खाली ओढून काढले जाईल. जेव्हा आपण उपास करीत असतो, आपण शारीरिकतेत आपल्या शरीराला नकार देत असतो. आपला स्वार्थ व स्वयंकेंद्रित राहणे हे निघून जाते. उपासाकडे सामर्थ्य आहे की तुमच्या चर्च ला साहाय्य करावे की एकच दृष्टांत घेऊन पुढे जावे जेव्हा स्वयंकेंद्रित महत्वाकांक्षा ह्या सोडल्या जातात.
सांघिक उपासाचे आणखी काही उदाहरण
१ शमुवेल ७:५-६, "आणि शमुवेल ने म्हटले, सर्व इस्राएल लोकांना एकत्र करा .....आणि ते एकत्र झाले.....आणि उपास केला....
२ इतिहास २०:२२
आता, लक्षात घ्या जेव्हा त्यांनी स्तुति करण्यास सुरुवात केली: "तेव्हा अम्मोनी, मवाबी, व सेईर पहाडातले लोक जे यहूदावर चाल करून येत होते त्यांस गाठण्यास परमेश्वराने दबा धरणारे बसविले व त्यांनी त्यांचा मोड केला."
सांघिक उपासात येथे सामर्थ्य आहे आणि सांघिक स्तुति मध्ये सामर्थ्य! देवाच्या मंदिरात ते स्वस्थ करण्याचा प्रवाह, सुटका व विजयाचा प्रवाह, शुद्ध करण्याचा प्रवाह निर्माण करते. सुंदरते साठी राख, आनंदा साठी शोक, स्तुतीच्यावस्त्रा साठी दु:खाचे वस्त्र बदलण्याची ही वेळ आहे.
एज्रा ८:२१-२३ "मग मी उपासाची घोषणा केली ...
मग आम्ही उपास केला आणि आमच्या देवाचा धावा केला....."
मग त्याच्या शिष्यांनी त्याला उत्तर दिले, येथे अरण्यात हे तृप्त होतील इतक्या भाकरी कोठून आणाव्या? (मार्क ८:४)
प्रभु येशूने त्याच्या शिष्यांना सिद्ध केले की तो न बदलणारा परमेश्वर आहे....
मागे जसे जुन्या करारात त्याने रानात लोकांना भाकरी द्वारे तृप्त केले होते. त्याने त्या दिवशी सुद्धा लोकांना रानात भाकरीने तृप्त केले होते.
तेव्हा त्याने त्या आंधळ्याचा हात धरून त्याला गांवाबाहेर नेले आणि त्याच्या डोळ्यांवर थुंकून व त्याच्यावर हात ठेवून त्याला विचारले, तुला काही दिसते काय? (मार्क ८:२३)
येशूने त्या आंधळ्या मनुष्याला गावात का ठीक केले नाही आणि त्यालागावाच्या बाहेर का नेले. वातावरण अवश्य फरक करते. तुम्ही स्वस्थ झाल्यानंतर सुद्धा, तुम्हाला योग्य वातावरणात राहिले पाहिजे. पाहा येशूने त्यास काय म्हटले, "ह्या गावात जाऊ नको, व कोणाला सांगू देखील नको." तुमचे स्वस्थ होणे किंवा सुटका चुकीच्या वातावरणाने गमावू शकता.
तेव्हा त्याने वळून आपल्या शिष्यांकडे पाहिले व तो पेत्राला दटावून म्हणाला, सैताना, माझ्यापुढून चालता हो; कारण तुझा दृष्टीकोन देवाचा नव्हे तर मनुष्यांचा आहे. (मार्क ८:३३)
पारख करण्याच्याआत्म्याचे दान त्याच्यामध्ये कार्य करीत होते. त्यास त्या वाक्याचा उगम ठाऊक होता.
Chapters