अबिमलेखानंतर इस्राएलांचे संरक्षण करावयाला इस्साखार वंशातील तोला बिन पुवा बिन दोदो हा पुढे आला. तो एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशात शामीर येथे राहत असे. त्याने तेवीस वर्षे इस्राएलाचा न्यायनिवाडा केला; नंतर तो मृत्यू पावला; त्याला शामीर येथे मूठमाती देण्यात आली. (शास्ते १०: १-२)
सर्व शास्त्यांपैकी तोला विषयी फारच कमी लिहिले गेलेआहे. त्याच्या कोणत्याही कृत्यांची नोंद ही केली गेली नाहीत. आणि त्याला सुद्धा तेच नाव होते जे इस्साखार च्या एका मुलाचे होते जो मिसर मध्ये त्याचा आजोबा याकोब बरोबर गेला होता जे उत्पत्ति ४६: १३ मध्ये आहे.
त्याच्यानंतर याईर गिलादी हा पुढे आला; त्याने बावीस वर्षे इस्राएलाचा न्यायनिवाडा केला. त्याला तीस मुलगे होते; ते तीस गाढवावर स्वारी करीत; गिलाद प्रांतात त्यांची तीस नगरे असून त्यांना आजपर्यंत हव्वोथ-याईर म्हणतात. याईर मरण पावला व त्याला कामोन येथे मूठमाती देण्यात आली. (शास्ते १०: ३-५)
३० लोकांचे कुटुंबिय जे तीस गाढवावर स्वारी करून होते त्यांना त्यांस साहाय्य करावयाचे होते. सर्वपरिस्थिती मध्ये याचा अर्थ प्रत्येक पुत्राकडे पुरेसे प्राणी होते की जेणेकरून ते स्वतःसाठी एक वापरू शकत होते, याचा अर्थ त्यांचे पाय फार क्वचितच जमिनीवर स्पर्श करीत होते. ते एक उच्च दर्जाचे चिन्ह आहे आज सुद्धा.
मग ते आपल्यांतील परके देव टाकून देऊन परमेश्वराची सेवा करू लागले. इस्राएलांचे हाल पाहून त्यांचा मनाला खेद झाला. (शास्ते १०: १६)
परमेश्वराच्या दृष्टित जे योग्य आहे ते जेव्हा तुम्ही करता, तर मग तोतुमच्यासाठी जे चांगले आहे तेच करेन.
चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये; कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल. (गलती ६: ९)
Chapters