इस्राएलापैंकी ज्यांना कनान देशातील लढायचा अनुभव नव्हता त्यांना कसास लावण्यासाठी आणि इस्राएल लोकांच्या पिढ्यांपैकी ज्यांना युद्धाचा पूर्वीचा मुळीच अनुभव नव्हता त्यांना तीचा अनुभव तरी घडावा व युद्धकलेचे शिक्षण मिळावे म्हणून परमेश्वराने मोशेच्या द्वारे इस्राएलाच्या पूर्वजांना दिलेल्या आज्ञा ते पाळतात की नाही ह्याची परीक्षा त्यांच्याकरवी घेण्याकरिता परमेश्वराने त्यांना मागे ठेवले होते.(शास्ते ३: १-२, ४)
तुमच्या जीवनात शत्रूचा उद्देश
१. तुमची परीक्षा घ्यावी
२. म्हणजे तुम्ही जाणाल की कसे लढावे-आध्यात्मिक युद्ध. आध्यात्मिक स्नायू बळकट करण्यास हे साहाय्य करेल.
३. हे ओळखावे की ते परमेश्वराच्या आज्ञा पाळतातकी नाही
परमेश्वराने मोशेच्या द्वारे इस्राएलाच्या पूर्वजांना दिलेल्या आज्ञा ते पाळतात की नाही ह्याची परीक्षा त्यांच्याकरवी घेण्याकरिता परमेश्वराने त्यांना मागे ठेवले होते. (शास्ते३: ४)
खजुरीच्या झाडाचे शहर- शास्ते ३: १३
एहूद नंतर अनाथाचा मुलगा शमगार हा पुढे आला. त्याने सहाशे पलिष्ट्यांना बैलाच्या पराणीने जिवे मारिले; अशा प्रकारे त्यानेही इस्राएलाची सुटका केली. (शास्ते ३: ३१)
परमेश्वराने शमगार ला बैलाच्या पराणीने उपयोगात आणले. परमेश्वर नेहमीच कमी महत्वाच्या गोष्टी वापरून त्याचे कार्य करून घेईल.
मीख्रिस्ती लोकांना नेहमी हेम्हणताना ऐकले आहे, "परमेश्वर आपल्याला उत्तम ते देईल" आणि त्यात काहीही चूक नाही. ही परमेश्वराची इच्छा आहे की आपल्याला उत्तम ते दयावे.
तथापि, जेव्हा देवाचा अभिषेक गोष्टींवर येतो ज्या अगोदरच आपल्याकडे आहेत (कमी महत्वाच्या गोष्टी), तो तरीही त्या गोष्टींद्वारे त्याचे कार्य करून घेईल.
Chapters