माझे नाव तूं का विचारत आहेस, पाहा ते अगम्य आहे? येथे परमेश्वराचा दूत स्वतःला येशू, हेअगम्य नाव घेत असे दाखवीत आहे. (यशया ९: ६)
शमशोन तिम्ना येथे गेला; तेथे त्याने एक पलिष्टी मुलगी पाहिली. (शास्ते १४: १)
अधिक संकटे ही टाळता येऊ शकतात जर आपण एकाच गोष्टी कडे निरखून पाहत राहणार नाही.
येशूने मत्तय ५: २८ मध्ये म्हटले आहे, "मी तर तुम्हांला सांगतो, जो कोणी एखादया स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे."
ईयोब ३१: १ म्हणते, "मी तर आपल्या डोळ्यांशी करार केला आहे; मी कोणा कुमारीवर नजर कशी जाऊ देऊ?"
शमशोन च्या चुका
विवाहाचा सिद्धांत
त्याचे आईबाप त्याला म्हणाले, तूं त्या बेसूनत पलिष्ट्यातली बायको का करू पाहत आहेस? तुझ्या भाऊबंदात किंवा आपल्या साऱ्या लोकांत कोणी मुली नाहीत काय? शमशोन आपल्या बापाला म्हणाला,"तीच मला मिळवून दया; कारण माझे तिच्यावर मन बसले आहे." (शास्ते १४: ३)
शमशोननेत्याच्या आईबापाकडून भक्तीपर सल्ला नाकारीला.
तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्याबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका; कारण नीति व स्वैराचार ह्यांची भागी कशी होणार? उजेड व अंधार ह्यांचा मिलाफ कसा होणार? ख्रिस्ताची बलियाराशी एकवाक्यता कशी होणार? विश्वास ठेवणारा व विश्वास न ठेवणारा हे वाटेकरी कसे होणार? (२ करिंथ ६: १४-१५)
शमशोन ने त्याचे पावित्रीकरण फारच हलक्या पद्धतीने घेतले
त्यांतला काही मध हातात घेऊन तो वाटेने खातखात गेला. आपल्या आईबापाकडे येऊन त्यांना काही मध त्याने दिला आणि त्यांनीही तो खाल्ला; तथापि सिंहाच्या कलेवरातून त्याने तो मध आणला होता हे त्याने त्यांना सांगितले नाही. (शास्ते १४: ९)
Chapters