मग शमशोनाने तीनशे कोल्हे पकडले, मशाली मिळविल्या, व कोल्यांच्या शेपटालाशेपूट बांधून दोनदोन शेपटामध्ये एक एक मशाल बांधली. मग त्याने त्या मशाली पेटवून पलिष्ट्यांच्या उभ्या पिकात त्या कोल्यांना सोडिले; तेव्हा धान्याच्या सुड्या, उभे पीक, द्राक्षमळे व जैतुनाचे मळे जळून गेले. पलिष्टी विचारू लागले, हे कोणी केले? तेव्हा लोकांनी उत्तर दिले, तिम्नाकराचा जावई शमशोन ह्याने; कारण त्याच्या सासऱ्याने त्याची बायको काढून त्याच्या सोबत्याला दिली आहे. मग पलिष्ट्यांनी जाऊन तिला व तिच्या बापाला जाळून टाकले. (शास्ते १५: ४-६)
शमशोन ला पाहिजे होते की पलिष्ट्यांच्या संपूर्ण उत्पन्नाचा नाशकरावा. म्हणून पलिष्ट्यांच्याधान्याच्या सुड्या, उभे पीक, द्राक्षमळे व जैतुनाचे मळे हेएकमशाल लावून जाळण्याऐवजी, आता त्याकडे १५० मशाली होत्या की त्याचे काम पूर्ण करावे (दोन कोल्यांमध्ये एक मशाल).
सुवार्ताप्रसार साठी हाएक मोठा धडा आहे. शमशोन बदला घेण्याच्या भावनेने पेटला होता, आणि त्याने ३०० कोल्हे पकडले आणि त्यांच्या शेपटाला एक मशाल पेटवून दिली. मग त्याने त्या कोल्ह्यांना त्यांच्या शेतात सोडून दिले. त्याचा परिणाम हा विनाशकारक होता. पलिष्ट्यांची शेते पूर्णपणे जळून गेली.
एके दिवशी येशू विलाप करीत म्हणाला, "शेते ही भरपूर आहेत, पण कामकरी हे थोडे आहेत." कापणी करण्यास उरलेला कमी वेळ आणि येणाऱ्या न्यायाने आपल्याला आवाहन केले पाहिजे की उत्पन्नामध्ये जावे आणि कापणी करावी.
तर मग काय जर आपण आपल्यासाठी एक ध्येय निश्चित करावेकी ३०० लोकांना उभे करावे ज्यांचे अंत:करण देवासाठी पेटलेले आहे, आणि त्यांना उत्पन्नामध्ये(आपल्या शहरात)सोडून दयावे. मग असे होणार नाही काय कीशत्रूलाआक्रोश करावा लागेल, "हे कोणी केले आहे?"
येशूने त्याच्या शिष्यांना उत्पन्नात पवित्र आत्म्याच्या अग्नीव अभिषेक सहदोन दोन करून पाठविले.
मी आणखी तुम्हांस खचितसांगतो, पृथ्वीवर तुमच्यापैंकी दोघे कोणत्याही गोष्टीविषयी एकत्रित होऊन (एकमत होतील, आणि एक विचार घेऊन चालतील)विनंती करितील [काहीही व सर्वकाही]तर ती माझ्या स्वर्गातील पित्याकडून त्यांच्यासाठी केली जाईल. (मत्तय १८: १९ ऐम्पलीफाईड बायबल)
जसे एक कुटुंब एकत्र येते आणि प्रार्थना करते
जसे एक चर्च एकत्र येते आणि प्रार्थना करते
एकटयापेक्षा दोघे बरे; कारण त्यांच्या श्रमाचे त्यांना चांगले फळ प्राप्त होते. त्यांतला एक पडला तर त्याचा सोबती त्याला हात देईल; पण जो एकटा असून पडतो त्याला हात देण्यास कोणी नसते; त्याची दुर्दशा होते. दोघे एकत्र निजले तर त्यांस ऊब येते;
एकटयाला ऊब कशी येईल? जो एकटा असतो त्याला कोणी माणूस भारी झाला तर त्याचा प्रतिकार दोघांना करिता येईल; तीनपदरी दोरी सहसा तुटत नाही. (उपदेशक ४: ९-१२)
नंतर त्याला फार तहान लागल्यामुळे तो परमेश्वराचा धावा करीत म्हणाला, तूं आपल्या दासाच्या हस्ते एवढा मोठा विजय मिळवून दिलास खरा, पण मी आता तहानेने तडफडून मरावे आणि बेसूनत लोकांच्या हाती पडावे काय? तेव्हा परमेश्वराने लेही येथे एक झरा खोदला आणि त्यातून पाणी वाहू लागले. ते पाणी पिऊन त्याच्या जिवात जीव आला व तो ताजातवाना जहाल. ह्यावरून त्याचे नांव त्याने एन-हक्कोरे (धावा करणाऱ्यांचा झरा) असे ठेवले. तो अदयाप लेहीत आहे.
पालीष्ट्यांच्या अमदानीत वीस वर्षे शामाशोनाने इस्राएलाचा न्यायनिवाडा केला. (शास्ते १५: १८-२०)
एन-हक्कोरे याचा अर्थ धावा करणाऱ्यांचा झरा
परमेश्वराने शमशोन चा पाण्यासाठी धावा ऐकला आणि त्यास पिण्यासाठी पाण्याचा एक झरा दिला. परमेश्वर मग आपला धावा कितीतरी अधिक असे ऐकेल आणि आपल्याला पाण्याचा झरा देईल.
परमेश्वराकडे धावा करण्यावर हेसर्व अवलंबून आहे.
तुम्ही वाईट असतांही तुम्हांला आपल्या मुलांना चांगल्या देणग्या द्यावयाचे कळते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यांस तो किती विशेषकरून पवित्र आत्मा देईल? (लूक ११: १३)
Chapters