सुटका
इस्राएल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते पुन्हा केले तेव्हा परमेश्वराने त्यांना चाळीस वर्षे पलिष्ट्यांच्याअंकित केले. (शास्ते १३: १)
पुन्हा
इस्राएललोकांसाठी ही आतां एक सवय होऊन गेली होती की वाईट करीत राहावे.
परमेश्वराच्या दृष्टीसमोर वाईट केले
हे यामुळे की त्यांच्या वाईट कृत्यांमुळे परमेश्वराने त्यांना चाळीस वर्षे पलिष्ट्यांच्या हवाली केले. तथापि, याच्याउलट सुद्धा खरे आहे; योग्य कृती सुद्धा परमेश्वराला त्यांना पलिष्ट्यांच्या हातातून सोडवावयास लावेल.
प्रार्थनेच्या उत्तरात देवदूतास पाठविले गेले
हे ऐकून मानोहाने परमेश्वराची प्रार्थना केली. तो म्हणाला. “हे परमेश्वरा, त्या दूताला परत आमच्याकडे पाठव या जन्माला येणाऱ्या मुलाचे संगोपन आम्ही कसे करावे हे आम्हाला त्याच्याकडून पुन्हा ऐकू दे.”
लक्षात घ्या की मानोहाने दुताकडे प्रार्थना केली नाही परंतु परमेश्वराकडे. येथे अनेक आहेत जे परमेश्वराऐवजी दुताकडे प्रार्थना करतात.
मी माझ्या पित्याला सांगितले तर तो देवदूतांच्या बारापेक्षा अधिक पलटणी पाठवील, हे तुम्हांला कळत नाही काय? (मत्तय २६:५३)
जर प्रभू येशूला संरक्षणासाठी, त्याच्याकडे देवदूत पाठवावे यासाठी पित्याकडे प्रार्थना करावी लागली, तर देवदूताने आपल्याला सोडवावे म्हणून आपण सरळपणे त्याच्याकडे प्रार्थना कशी करू शकतो.
ख्रिस्ताचे जुन्या करारातील प्रगट होणे
परमेश्वराच्या दूताने त्याला उत्तर दिले, माझे नाव अगम्य आहे तेव्हा ते तूं का विचारतोस? (शास्ते १३: १८)
परमेश्वराकडून वचन प्राप्त केल्यावर, स्त्रीला काळजी घ्यावयाची होती की काही अटी पूर्ण कराव्यात. अनेक जण सोईस्कररित्या हा भाग टाळतात.
परमेश्वराचे एक नाव अद्भुत असे आहे (यशया 9:6). परमेश्वराचे नांव हे केवळ एक नाव नाही. त्याच्या नांवात त्याचे चारित्र्य आहे. ह्या प्रकरणात, नांव हे अद्भुत आहे.
मानोहाने मग एका करडाचा खडकावर बळी दिला तो बली आणि धान्यार्पण परमेश्वराला व आश्चर्यकारक कृत्ये करणाऱ्या त्या माणसाला अर्पण केले. मग जे जे घडले ते मानोहा व त्याची पत्नी यांनी पाहिले वेदीवरुन ज्वाळा आकाशाकडे झेपावत असताना त्यातूनच तो परमेश्वरदूत स्वर्गस्थ झाला. (शास्ते १३:१९-२०)
प्रत्येकवेळी जेव्हा एक चिन्ह व एक आश्चर्य घडते, तेव्हा नाव अद्भुत हे प्रकट होते.
साधी गोष्ट
पण ती नवऱ्याला म्हणाली, “आपण मरावे असे परमेश्वराच्या मनात नाही. तसे असते तर त्याने आपले होमार्पण, धान्यार्पण स्वीकारले नसते. आपल्याला जे दिसले ते दाखवले नसते किंवा ज्या गोष्टी सांगितल्या त्या सांगितल्या नसत्या” (Judges 13:23शास्ते 13:23)
Chapters