english हिंदी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us आमच्याशी संपर्क साधा स्पॉटिफाय वर ऐका स्पॉटिफाय वर ऐका Download on the App StoreIOS अँप डाउनलोड करा Get it on Google Play अँड्रॉइड अँप डाउनलोड करा
 
लॉग इन
ऑनलाइन देणगी
लॉग इन
  • होम
  • कार्यक्रम
  • थेट प्रसारण
  • टी.वी.
  • नोहाट्यूब
  • स्तुती
  • बातमी
  • डेली मन्ना
  • प्रार्थना
  • अंगीकार
  • स्वप्ने
  • ई पुस्तके
  • भाष्य
  • श्रद्धांजली
  • ओएसिस
  1. होम
  2. बायबल भाष्य
  3. अध्याय २
बायबल भाष्य

अध्याय २

Book / 43 / 1388 chapter - 2
1345
"नंतर पेंटेकॉस्ट म्हणजे पन्नासावा दिवस आला तेव्हा ते सर्व एकत्र जमले असतांना, अकस्मात मोठया वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्यानेभरले. आणिवेगवेगळ्याहोत असलेल्या अग्नीच्या जिभासारख्या जिभा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एकएक अशा बसल्या. तेव्हा ते सर्व जण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषांतून बोलू लागले. (प्रेषित २:१-४)

पेंटेकॉस्ट चा दिवस:
हा एक यहूदी सण होताजो वल्हंडणा नंतर५० दिवसांनी साजरा केला जात होता. तो गव्हाच्या पिकाच्या प्रथम फळाचा सण होता.

त्यावेळेच्या यहूदी रीतीप्रमाणे, सातूच्या पिकांच्या प्रथम पेंढ्या ज्या वल्हंडण सणात परमेश्वराला सादर केल्या जात होत्या. परंतु, पेंटेकॉस्टच्या दिवशी, गव्हाच्या पिकांच्या प्रथम पेंढ्या परमेश्वराला सादर केल्या जात होत्या, पेंटेकॉस्ट ला प्रथम फळांचा दिवस असे म्हटले आहे. (गणना २८:२६)

यहूदी परंपरेने सुद्धा शिकविले आहे की पेंटेकॉस्ट त्या दिवसाविषयी सुचवितो जेव्हा इस्राएल ला नियमशास्त्र दिले गेले. पेंटेकॉस्ट च्या जुन्या कराराच्या दिवशी इस्राएल ने नियमशास्त्र प्राप्त केले; पेंटेकॉस्टच्या नवीन कराराच्या दिवशी चर्च ने कृपेच्या आत्म्याला विपुलतेत प्राप्त केले.

त्या वेळेस आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रातील भक्तिमान यहूदी यरुशलेमेत राहत होते. तो नाद झाल्यावर लोकसमुदाय एकत्र होऊन गोंधळून गेला; कारण प्रत्येकाने त्यांना आपआपल्या भाषेत बोलताना ऐकले. ते सर्व आश्चर्याने थक्क होऊन म्हणाले, पाहा, हे बोलणारे सर्व गालीली ना? तर आपण प्रत्येक जण आपआपली जन्मभाषा ऐकतो हे कसे? पार्थी, मेदी, एलामी, मेसोपटेम्या, यहूदीया, कप्पुदुकीया, पंत, आसिया, परुगिया, पंफूलिया, मिसर व कुरणेच्या जवळचा लिबुवा देश ह्यांत राहणारे, यहूदी व यहूदीयमतानुसारी असे रोमन प्रवासी, क्रेतीय, अरब, असे आपण त्यांना आपआपल्या भाषांत देवाची महत्कृत्ये सांगताना ऐकतो. (प्रेषित २:५-११)

जेव्हानाद झाला
१. असंख्य लोक एकत्र आले
२. तेगोंधळले होते- ह्याकारणामुळेच देवाचे एक मोठे कार्य हे बायबल वर आधारित योग्य शिकवणीद्वारे समजाविले गेले पाहिजे.
३. सर्वांनी ऐकले
४. तेसर्व आश्चर्यचकित व थक्क झाले.
५. इतरांनी त्यांची निंदा केली-येथे प्रत्येक युगात निंदा करणारे नेहमीच असणार.

जेथेकोठे देवाचे प्रमाणिक कार्य होत असेल तेथे ह्या पाच गोष्ठी नेहमीच घडणार 

ते तुम्हांस असे सांगत असत की, शेवटल्या काळी आपल्या कुवासनेप्रमाणे चालणारी कुटाळ माणसे निघतील. (यहूदा १८)

एक धर्मपरिवर्तीत हा एक व्यक्ति आहे जो एका धर्माकडून दुसऱ्या धर्मात परिवर्तीत झाला आहे.

आपण त्यांना आपल्या मातृभाषेत देवाच्या अद्भुत कार्यांविषयी बोलताना ऐकतो.
एकखरे दर्शविणे की देवाचा हात तुमच्यावर आहे तो हा की तुम्ही देवाच्या अद्भुत कार्याविषयी सांगाल जे तुमच्याद्वारे भविष्यात पूर्ण होईल.

तेव्हा पेत्र अकरा प्रेषितांबरोबर उभा राहून त्यांना मोठयाने म्हणाला, अहो यहूदी लोकांनो व यरुशलेमेतील रहिवाश्यांनो, हे लक्षात आणा व माझे बोलणे ऐकून घ्या. तुम्हांला वाटते हे मस्त झाले आहेत; पण असे नाही; कारण हा दिवसाचा पहिला प्रहर आहे. (प्रेषित २: १४-१५)

दिवसाचा पहिला प्रहर आहे.
दिवसाचा पहिला प्रहर हा सकाळी ९.०० वाजताचा आहे.
देव म्हणतो, शेवटल्या दिवसांत 'असे होईल की, मी मनुष्यमात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन; तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या तरुणांस दृष्टांत होतील, व तुमच्या वृद्धांस स्वप्ने पडतील; आणखी त्या दिवसांत मी आपल्या दासांवर व आपल्या दासींवर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन,' म्हणजे ते संदेश देतील. (प्रेषित २:१७-१८)

तसेच जेव्हा तुम्ही पवित्र आत्म्याच्या प्रभावाखाली असाल तुम्ही स्वप्ने पाहाल, तुम्हाला दृष्टांत होतील, तुम्ही ते पाहाल, तुम्ही ते बोलाल. तुमच्या भविष्याबाबत तुम्ही सामर्थ्यशाली वचन बोलाल.

हे ऐकून त्यांच्या अंत:करणात चुटपूट लागली, आणि ते पेत्र व इतर प्रेषित ह्यांना म्हणाले, बंधुजनहो, आम्ही काय करावे? पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या; म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. (प्रेषित २:३७-३८)

ही वचने पेत्राच्या पेंटेकॉस्टच्या दिवसाच्या संदेशाबद्दल व पेत्राने त्यांना दिलेल्या शिकवणी बद्दल यहूदी लोकांच्याप्रतिक्रियेची नोंद करते.

"आम्ही काय करावे?"
पेत्र दोन आदेश देतो
१. पश्चाताप करा
२. मग बाप्तिस्मा घ्या.

कोणताहीव्यक्तिजो तारण प्राप्त करण्याची इच्छा करतो त्या व्यक्तीकडून प्रथम गोष्ट जी परमेश्वर मागतो ती नेहमीच पश्चाताप आहे. म्हणून पश्चाताप हा बाप्तिस्मा होण्याच्या अगोदर झाला पाहिजे. त्यानंतर, बाप्तिस्मा हा बाह्यदृष्टया शिक्कामोर्तब होणे किंवा पश्चातापाद्वारे आंतरिक बदल होण्याची पुष्टी आहे.

"तेव्हा ज्यांनी त्याच्या संदेशाचा स्वीकार केला त्यांचा बाप्तिस्मा झाला; आणि त्या दिवशी त्यांच्यात सुमारे तीन हजार माणसांची भर पडली. ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात, भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत." (प्रेषित २:४१-४२)

त्यांच्यात सुमारे तीन हजार माणसांची भर पडली:
पेंटेकॉस्टच्या दिवशी आत्म्याचीअद्भुत विपुलता पाहण्यास मिळाली. एका दिवसात मंडळी ही १२० वरून ३१२० लोक एवढी मोठी झाली. होय! मी विश्वास ठेवतो जेव्हा कोणत्याची चर्च किंवा सेवाकार्यात पवित्र आत्मा केंद्रस्थानी असतो, असंख्य लोक हे जोडले जातील.

पवित्र शास्त्र हे सुद्धा सांगते की ज्यांनी खरेच वचन प्राप्त केले त्यांचा बाप्तिस्मा झाला व ते चर्च मध्ये सामील केले गेले. [जर तुम्हांला पाण्याने बाप्तिस्मा विषयी अधिक जाणावयाचे आहे, तर माझे पुस्तक वाचा: पाण्याने बाप्तिस्मा-तुम्हाला त्याची का गरज आहे.]

आपण पाहतो की ते ज्यांनी विश्वास ठेवला त्यानंतर त्यांचा बाप्तिस्मा झाला, त्यांनी[प्रारंभीच्या चर्च ने] स्वतःला चार गोष्टींसाठी समर्पित केले :
१. सिद्धांत
२. संगती
३. प्रार्थना व
४. भाकर मोडणे

जर तुम्ही तुमच्या आध्यात्मिक वाढीविषयी गंभीर आहात तर मग तुम्ही ह्या चार गोष्टींकडे दुर्लक्ष करू नये जे मी वर उल्लेखिले आहेत.

भाकर मोडण्याविषयीच्या महत्वाविषयी सुद्धा हे आपल्याला दाखविते. लक्षात घ्या,प्रार्थना व सिद्धांत च्या स्तरावर त्यास विचारात घेतले जाते. बायबल आपल्याला सांगते की प्रारंभीच्या चर्च ने नियमितपणे भाकर मोडली.

मला अजूनही आठवते, माझ्या प्रारंभीच्या दिवसात परमेश्वराबरोबरच्या चालण्यात, एक विलक्षण देवाचा मनुष्य ज्याचे नाव पास्टर पौल क्वाड्रोस यांनी मला भाकर मोडण्याच्या महत्वाविषयी शिकविले होते. ते घरी येत असत आणिमी व माझ्या पत्नीबरोबर प्रार्थना करीत असत आणि मग आम्ही एकत्र भाकर मोडत असू. मी विश्वास ठेवतो की माझ्या आध्यात्मिक वाढीसाठी ही एक महत्वाची किल्ली होती.

Join our WhatsApp Channel

Chapters
  • अध्याय १
  • अध्याय २
  • अध्याय ३
  • अध्याय ४
  • अध्याय ५
  • अध्याय ६
  • अध्याय ७
  • अध्याय ८
  • अध्याय ९
  • अध्याय १०
  • अध्याय ११
  • अध्याय १२
  • अध्याय २८
मागील
पुढे
संपर्क
फ़ोन: +91 8356956746
+91 9137395828
व्हाट्स एप: +91 8356956746
ईमेल: [email protected]
पता :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
आमच्या सामाजिक नेटवर्कवर सामील व्हा!
Download on the App Store
Get it on Google Play
मेलिंग यादीमध्ये सामील व्हा
अन्वेषण
कार्यक्रम
थेट प्रसारण
नोहाट्यूब
टी.वी.
देणगी
डेली मन्ना
स्तुती
अंगीकार
स्वप्ने
संपर्क
© 2025 Karuna Sadan, India.
➤
लॉग इन
कृपया या साईट वर टिपणी आणि कंमेंट करण्यासाठी आपल्या NOAH खात्यावर प्रवेश करा |
लॉग इन