नवीन करार मध्ये ज्ञानाच्या वचनाचे प्रकटीकरण
त्या दिवसांत शिष्यांची संख्या वाढत चालली असतां हेल्लेणी यहूद्यांची इब्री लोकांविरुद्ध कुरूकुर सुरु झाली; कारण रोजच्या वाटणीत त्यांच्या विधवांची उपेक्षा होत असे. (प्रेषित ६:१)
येथे आपण वाद पाहतो ज्याने प्रारंभीच्या चर्च ला विभागण्याचा धोका आणला होता. वाद हा दोन पक्षा मध्ये निर्माण झाला होता- इब्री (यहूदी ख्रिस्ती जे इब्री किंवा अरामी भाषा बोलणारे होते) व हेल्लेणी (यहूदी ख्रिस्ती जे हेल्लेणी भाषा बोलणारे होते).
तेव्हा बारा प्रेषितांनी शिष्यगणाला बोलावून म्हटले, आम्ही देवाचे वचन सांगण्याचे सोडून पंक्तिसेवा करावी हे ठीक नाही. तर बंधुजनहो, तुम्ही आपल्यामधून पवित्र आत्म्याने व ज्ञानाने पूर्ण असे सात प्रतिष्ठित पुरुष शोधून काढा. त्यांना आम्ही ह्या कामावर नेमू; म्हणजे आम्ही स्वतः प्रार्थनेत व वचनाच्या सेवेत तत्पर राहू. ही गोष्ट सर्व लोकांना पसंत पडली; आणि त्यांनी विश्वासाने व पवित्र आत्म्याने पूर्ण असा पुरुष स्तेफन, आणि फिलिप्प, प्रखर, निकानुर, तीमोन, पार्मिना व यहूदीमतानुसारी निकलाव अंत्युखीयकर ह्यांची निवड केली; त्यांना त्यांनी प्रेषितांसमोर उभे केले आणि त्यांनी प्रार्थना करून त्यांच्यावर हात ठेवले. (प्रेषित ६:२-६)
१. स्तेफन
२. फिलिप्प
३. प्रखर
४. निकानुर
५. तीमोन
६. पार्मिना
७. निकलाव
ह्या कार्याकरिता सात पुरुषांची निवड केली गेली. पुन्हा एकदा, एक व्यवहारिक समस्या ज्ञानाच्या वचनाच्या दाना द्वारे जी प्रेषितांद्वारे कार्य करीत होती त्याने सोडविली गेली. तसेच, प्रारंभीच्या चर्च वर ह्या ज्ञानाच्या वचनाचा प्रभाव ह्याकडे लक्ष देणे महत्वाचे आहे.
मग देवाच्या वचनाचा प्रसार होत गेला; यरुशलेमेत शिष्यांची संख्या फार वाढत गेली; याजकवर्गातीलही पुष्कळ लोकांनी ह्या विश्वासाला मान्यता दिली. (प्रेषित ६:७)
हे निश्चितच घडले नसते, जर त्यांनी ती व्यवहारिक समस्या सोडविली नसती. तेथे मग सतत विभाजन, निराशा व द्वेष हा राहिला असता-आणि देवाच्या आत्म्याच्या कार्याला अडथळा झाला असता.
प्रारंभीच्या चर्च मध्ये अन्यभाषा
प्रेषित ६:४ हे पुढील प्रमाणे स्पष्ट करते; "आम्ही प्रार्थनेस वचनाच्या (लोगॉस) सेवेला सांभाळू." नवीन कराराचे ग्रीक भाषांतर इंटरलिनीयर
प्रारंभीच्या ख्रिस्ती लोकांनी हे समजले की ते प्रार्थनेकडे दुर्लक्ष करू शकत नाही. ते प्रार्थना करणारे चर्च होते व प्रार्थने द्वारे त्यांनी किती महान व सामर्थ्यशाली गोष्टी ह्या प्राप्त केल्या होत्या. जरी जेव्हा ते सेवाकार्यात अत्यंत व्यस्त झाले होते, तेव्हा त्यांनी 'नेहमीच्या कार्याला' त्यांच्या प्रार्थने मध्ये अडथळा होऊ दिला नाही.
मला पाहिजे की तुम्ही शब्दशः वचनात काळजीपूर्वक पाहावे, "आम्ही याची काळजी घेऊ व स्वतःला प्रार्थने मध्ये तत्पर ठेवू." "प्रार्थना" ह्या शब्दाकडे लक्ष दया, हे केवळ "एक प्रार्थना" नाही. प्रारंभीच्या चर्च ने समजले की 'अन्य भाषेत प्रार्थना करणे' ही प्रार्थना आहे. 'अन्य भाषेत प्रार्थना करणे' ही प्रार्थना अशी ओळखली गेली.
Chapters