आणितारण दुसऱ्या कोणाकडून नाही; कारणजेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नांव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेले नाही. (प्रेषित ४:१२)
आपण त्या जगात राहत आहोत जे आपल्याला अनेक निवडी,अनेक पर्याय देतात. वास्तवात, आपल्याला हे पटले आहे की आपल्याला अधिक पर्याय किंवा निवडी उपलब्ध आहेत, की जे आपले निर्णय घेणे हे उत्तम करू शकते.
येथे अनेक आहेत ज्यांनी मला प्रश्न विचारले आहे जसे:
तहाने बाळ जे मरते त्यांच्याविषयी काय?
त्या व्यक्तीविषयी काय ज्याने येशू विषयी कधीही ऐकलेले नाही?
मी तर केवळ एवढेच म्हणू शकतो की परमेश्वर त्याच्या दयेनुसार त्यांच्याबरोबर व्यवहार करो, आणि ते जे तारण पावलेले आहेत ते येशू ख्रिस्ताचे कार्य जे त्यांच्या वतीने केले गेले आहे त्याद्वारे त्यांचा बचाव केला जाईल, जरी त्यांना येशू विषयी संपूर्ण समज नसेल.
तेव्हा पेत्राचे व योहानाचे धैर्य पाहून, तसेच हे निरक्षर व अज्ञानी इसम आहेत हे जाणून ते आश्चर्य करू लागले; आणि हे येशूच्या सहवासात होते हेही त्यांनी ओळखले. (प्रेषित ४:१३)
त्यांचे शत्रू सुद्धा हे पाहू शकत होते कीयेशू ख्रिस्ताने ह्या मनुष्यांच्या जीवनात इतका मोठा प्रभाव केला आहे. तुमच्या आणि माझ्या विषयी असे वाक्य म्हटले जाऊ शकते काय हे लोक येशूच्या सहवासात होते?
ह्या माणसांना आपण काय करावे? कारण त्यांच्याकडून खरोखरच प्रसिद्ध चमत्कार घडला आहे, हे सर्व यरुशलेमकरांस कळून चुकले आहे; तेव्हा ते आपणांला नाकारता येत नाही. (प्रेषित ४:१६)
असामान्य चमत्काराची ह्या शेवटच्या समयात फारच गरज आहे की शंका घेण्याच्या गुदमरण्याच्याह्या स्थितीला स्पष्ट करावे. आपल्याला प्रार्थना करण्याची गरज आहे, हे परमेश्वरा, असे चमत्कार कर जे डॉक्टर किंवा ह्या जगाच्या शिक्षित लोकांद्वारे सुद्धा नाकारले जाऊ शकणार नाही.
विरोधाभास हा की धार्मिक पुढाऱ्यांनी मानिले की चमत्कार हा खरेच घडला आहे; तरीही देवाच्या अधीन होण्यास त्यांनी नाकारले ज्याने हा चमत्कार केला होता. असे लोक आज सुद्धा अनेक आहेत.
परंतु पेत्र व योहान ह्यांनी त्यांना उत्तर दिले की, देवाच्या ऐवजी तुमचे ऐकावे हे देवाच्या दृष्टीने योग्य की अयोग्य आहे हे तुम्हीच ठरवा. (प्रेषित ४:१९)
पेत्र व योहान यांना येशूच्या नांवात येथून पुढे बोलू नये अशी धमकी देण्यात आली. तथापि, त्यांनीत्याशी सहमत होण्यास नकार दिला.आपल्याला जरी जेव्हा ठाऊक आहे की काय बरोबर आहे तरीही वाईट करण्यास आपल्याला काय प्रेरणा देते?
टीकामिळण्याची भीती
आपण त्या समाजामध्ये राहतो त्यामध्ये लोकांना जे बरोबर आहे असे वाटते त्या गोष्टी करावयास वाटते. जेव्हा आपण आपल्या ख्रिस्ती विश्वासासाठी ठाम उभे राहतो किंवा ते जे आपल्याभोवती आहेत त्यांना सांगतो की परमेश्वर त्यांच्या आचरणाविषयी काय बोलत आहे, ते निस्संशयपणे टीकाओढून घेते.
अस्वीकार केले जाण्याची भीती
अस्वीकार केले जाण्याची भीती ही ते जे आपल्याभोवती आहेत त्यांच्याद्वारे स्वीकारले जात नाही याची भीती. म्हणून, आपण आपले पवित्र शास्त्रानुसार जीवन जगणे व मुल्यांचा त्याग करतो की आपल्याला स्वीकारावे. अनेकांसाठी अस्वीकार केले जाण्याच्या भीतीने त्यांना बेकायदेशीर, अनैतिक किंवा दुष्कृत्ये करण्याकडे नेले आहे. हे अत्यंत उत्तम आहे की ख्रिस्ता साठी जगावे आणि त्याच्या आज्ञेप्रमाणे चालावे म्हणजे आपण देवाचे उत्तम ते प्राप्त करू शकू.
कारण जे आम्ही पाहिले व ऐकले ते न बोलणे हे आम्हाला शक्य नाही. (प्रेषित ४:२०)
पवित्र आत्म्याच्या आंतरिक प्रेरणेमुळेच केवळ नाही, परंतु येशूच्या आदेशामुळे त्यांना हे करावे लागले: तुम्ही यरुशलेम मध्ये माझी साक्षी दयाल. (प्रेषित १:८)
त्यांनी प्रार्थना केल्यावर ज्या जागेत ते जमले होते ती हादरली आणि ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन देवाचे वचन धैर्याने बोलू लागले. (प्रेषित ४:३१)
किती अंशी हादरली हे आपल्याला ठाऊक नाही; तथापि, ते घराच्या परीघ पर्यंतच मर्यादित असेन.
ते पवित्र आत्म्याने पुन्हा भरले. पवित्र आत्म्याने पेंटेकॉस्टच्या दिवशी भरणे ही केवळ एक वेळेची घटना नव्हती. पेत्रा साठी, ही तीन वेळा झाली जेव्हा तो विशेषकरून पवित्र आत्म्याने भरला. प्रार्थना हे साधन आहे कीज्याने सर्व जण पवित्र आत्म्याने भरून जातात.
Chapters