नंतर कुलपतींनी हेव्यामुळे योसेफाला मिसर देशांत विकून टाकले; पण देव त्याच्याबरोबर होता, त्याने त्याला त्याच्यावरील सर्व संकटातून सोडविले आणि मिसर देशाचा राजा फारो ह्याच्या दृष्टीने कृपापात्र व ज्ञानी असे केले; म्हणून फारोने त्याला मिसर देशावर व आपल्या सर्व घरावर अधिकारी नेमले. (प्रेषित ७:९-१०)
परमेश्वर त्याच्याबरोबर होता-इम्मानुएल. ही योसेफाची बुद्धिमत्तापूर्वक क्षमता नाही ज्याने योसेफाला त्याच्या संकटापासून सोडविले होते. ही ती वास्तविकता होती की परमेश्वर त्याच्याबरोबर होता.
तुला अधिकारी व न्यायाधीश कोणी केले, असे म्हणून ज्या मोशेला त्यांनी झिडकारले होते, त्यालाच, झुडपात दर्शन झालेल्या देवदूताच्या हस्ते, देवाने अधिकारी व मुक्तिदाता म्हणून पाठविले. (प्रेषित ७:३५)
जेव्हा अस्वीकृत परमेश्वराला भेटतात, तेव्हा त्यांची कथा ही बदलेल. मोशे ज्यास त्यांनी नाकारले हा तोच होता ज्यास देवाने देवदूताच्या हस्ते पाठविले की शासक व सोडविणारा व्हावे.
ज्यांना देवदूतांच्या योगे योजिलेले नियमशास्त्र प्राप्त झाले होते; त्यांनी ते पाळले नाही. (प्रेषित ७:५३)
नियमशास्त्र देण्यात देवदूतांचा सहभाग आहे.
मग गुडघे टेकून तो मोठयाने ओरडला, हे प्रभु, हे पाप त्याच्याकडे मोजू नको. (प्रेषित ७:६०)
मानवी अंत:करणात देवाच्या कृपेचे विलक्षण कार्य होते जेव्हा पवित्र आत्म्याने स्तेफनाला समर्थ केले की जे त्यास दगडमार करीत होते त्यांना प्रेम करावे.
अनेक पत्नींनी त्यांच्या पतीच्या तारणास जन्म दिला आहे त्यांच्यामधील पवित्र आत्म्याच्या कारणामुळे. हजारो उद्धट तरुण मुले चुंबकासारखे त्यांच्या प्रेमळ आई-वडिलांकडे परत घरी गेली आहेत पवित्र आत्म्याच्या प्रीतीमुळे. केवळ पवित्र आत्मा अशा प्रकारची प्रीति मानवी हृदयात उत्पन्न करू शकतो.
परंतु पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्याने आकाशाकडे निरखून पाहिले तेव्हा देवाचे तेज व देवाच्या उजवीकडे येशू उभा असलेला त्याच्या दृष्टीस पडला; आणि त्याने म्हटले, पाहा, आकाश उघडलेले व मनुष्याचा पुत्र देवाच्या उजवीकडे उभा असलेला मला दिसत आहे. (प्रेषित ७:५५-५६)
अभिषेक हा इतका प्रबळ वाढू शकतो की दुसऱ्या जगात घडणाऱ्या घटनांना तुम्ही पाहू शकता. अभिषेक हा स्तेफनावर इतका प्रबळ होता की त्याने स्वर्गांमध्ये पाहिले.
तेव्हा ते मोठयाने ओरडून व कान बंद करून एकजुटीने त्याच्या अंगावर धावून गेले. मग ते त्याला शहराबाहेर घालवून दगडमार करू लागले; आणि साक्षीदारांनी आपली वस्त्रे शौल नांवाच्या एका तरुणाच्या पायांजवळ ठेवली. ते दगडमार करीत असता स्तेफन प्रभूचा धावा करीत म्हणाला, हे प्रभु येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर. मग गुडघे टेकून तो मोठयाने ओरडला, हे प्रभु, हे पाप त्याच्याकडे मोजू नको. असे बोलून तो झोपी गेला. (प्रेषित ७:५७-६०)
अभिषेक इतरांना क्रोधात आणू शकतो व तुमच्या विरोधात आक्रमणास प्रवृत्त करू शकतो जसे स्तेफनाच्या बाबतीत घडले.
अभिषेक प्रत्येकाला आकर्षित करीत नाही
अभिषेक आपणावर धमकी आणतो व
अभिषेक कोणास चीडीस आणतो
युट्युब किंवा सामाजिक माध्यमावर परमेश्वर व्यक्तीला बरे करीत व
दुष्टात्म्याकडून सोडवीत आहे हा विडीओ पाहून काही व्यक्तींना त्यावर टिप्पणी करताना तुम्ही पाहिले आहे काय. अधिकतर लोक अशी समज व्यक्त करतात की हे देवाचे कार्य आहे. तथापि, तेथे एक किंवा काही विषम लोक असतील जे असभ्यपणे टिप्पणी करतील. कधीकधी तुम्ही आश्चर्य करता ते गडबडले आहेत काय.
Chapters