पेत्र व योहान हे तिसऱ्या प्रहरी प्रार्थनेच्या वेळेस वरती मंदिरात जात होते. (प्रेषित ३:१)
प्रार्थनेची निश्चित वेळ ठरविण्याने ते तुम्हाला प्रार्थनेचा एक शिस्तबद्ध योद्धा बनवेल.
घराच्या छपरावर दुपारच्या वेळी पेत्राने प्रार्थना केली. (प्रेषित १०:९)
दिवसातून तीन वेळा दानीएल ने प्रार्थना केली. (दानीएल ६:१०)
संपूर्ण शास्त्रभर आपण प्रार्थनेची एक निश्चित वेळ पाहतो, दिवसातूनअनेक वेळा.
प्रार्थनेची वेळ:
यहूदी लोकांच्या प्रार्थनेच्या तीन वेळा ह्यास'अर्पणाची किंवा बलिदान' देण्याची वेळ असे ओळखतात (दानीएल ९:२१; २ राजे १६:१५). याची नोंद केलेली आहे की दानीएलाने दिवसातून तीन वेळा प्रार्थना केली (दानीएल ६:१०). सकाळी९ वाजता मंदिराचे दरवाजे उघडले जात होते. (प्रेषित २:१५)
हे अत्यंत महत्वाचे आहे हे लक्षात घेणे की यहूदी लोकांची प्रार्थनेची वेळ ही आपला प्रभु व तारणारा येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरदेण्यास मिळतीजुळती आहे. मार्क १५:२५ नुसार, येशू तिसऱ्या प्रहरी वधस्तंभावर गेला आणि दुपारीतीन वाजता मरण पावला.
तसेच पेंटेकॉस्टच्या दिवशी सकाळी ९ वाजता पवित्र आत्म्याचा वर्षाव हा झालेला आहे.
तेव्हा जन्मापासून पांगळा असलेला कोणीएक माणूस होता; त्याला मंदिरात जाणाऱ्याजवळ भीक मागण्यासाठी म्हणून दररोज उचलून मंदिराच्या सुंदर नांवाच्या दरवाजाजवळ ठेवीत असत. (प्रेषित ३:२)
हे मनोरंजक आहे हे लक्षात घेणे की पांगळ्या मनुष्याने त्याच्या पांगळ्या पायाला स्वस्थ करावे हे मागण्याऐवजी पैशा साठी मागणी केली. हे आपल्याला सांगते की अनेक वेळेला, आपण देवाकडे आपल्या गरजे ऐवजी वेगळे काहीतरीच मागतो.
याकोब ४:३ मध्ये याकोबाचे हेच काय ते म्हणणे होते, "तुम्ही मागता परंतु तुम्हांस मिळत नाही; कारण तुम्ही अयोग्य प्रकारे मागता, म्हणजे आपल्या चैनीकरिता खर्चावे म्हणून मागता."
तेव्हा जन्मापासून पांगळा असलेला कोणीएक माणूस होता; त्याला मंदिरात जाणाऱ्याजवळ भीक मागण्यासाठी म्हणून दररोज उचलून मंदिराच्या सुंदर नांवाच्या दरवाजाजवळ ठेवीत असत. पेत्रव योहान हे मंदिरात जात आहेत असे पाहून त्याने भीक मागितली. तेव्हा पेत्र व योहान ह्यांनी त्याच्याकडे निरखून पाहिले; आणि पेत्र म्हणाला, आम्हांकडे पाहा. तेव्हा त्यांच्यापासून काहीतरी मिळेल ह्या अपेक्षेने त्याने त्यांच्याकडे लक्ष लाविले. मग पेत्र म्हणाला, माझ्याजवळ सोनेरूपे काही नाही; पण जे आहे ते तुला देतो; नासोरी येशू ख्रिस्ताच्या नांवाने चालू लाग; आणि त्याने त्याचा उजवा हात धरून त्याला उठविले, तेव्हा त्याची पावले व घोटे ह्यांत तत्काळ बळ आले; तो उडी मारून उभा राहिला व चालू लागला; आणि तो चालत, उड्या मारीत व देवाची स्तुति करीत त्यांच्याबरोबर मंदिरात गेला. (प्रेषित ३:२-८)
हे फार मनोरंजक आहे हे पाहणे की पवित्र आत्म्याने प्रार्थनेच्या वेळी चमत्कार केला आहे. प्रार्थनाही चमत्कार होण्यासाठी किल्ली आहे.
ह्या वाक्याकडे लक्ष दया, "त्यांच्यापासून काहीतरी मिळेल ह्या अपेक्षेने त्याने त्यांच्याकडे लक्ष लाविले"
मुख्य किल्ली प्राप्त करण्यासाठी ही अपेक्षा ठेवणे आहे.
जेव्हा तुम्ही कोणत्याही प्रार्थना सभेला जाता, जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा प्रभूपासून काहीतरी प्राप्त करण्याची अपेक्षा ठेवा.
पांगळा मनुष्य त्यांच्याबरोबर मंदिरात गेला-चालत, उड्या मारीत व देवाची स्तुति करीत.
तो मंदिरात स्वस्थ असा व देवाची स्तुति करीत गेला.
आजार देवाला गौरव आणीत नाही परंतु स्वास्थ्य व स्वस्थ होणे हे नेहमीच आणते.
आणि त्याच्या नांवात, त्याच्या नांवावरील विश्वासाद्वारे, ह्या मनुष्याला बळ आणले आहे, ज्यास तुम्ही पाहता व ओळखता. होय, जो विश्वास त्याच्याद्वारे येतो त्याने तुमच्या सर्वांच्या समक्ष यास संपूर्ण स्वास्थ्य दिले गेले आहे.
प्राचीन काळात, नाव केवळ मनुष्याची ओळख किंवा त्यास वेगळे असे दाखवीत नव्हते, परंतुते त्या मनुष्याचा अगदी स्वभाव व्यक्त करीत होते. म्हणून त्या व्यक्तीचे सामर्थ्य व अधिकार हे उपलब्ध होते जेव्हा त्या व्यक्तीच्या नांवाचा उल्लेख हा केला जातो.
सर्व गोष्टी पूर्वस्थितीला पोहचण्याच्या ज्या काळाविषयी देवाने आरंभापासून आपल्याला पवित्र संदेष्ट्यांच्या मुखाने सांगितले त्या काळापर्यंत येशूला स्वर्गात राहणे प्राप्त आहे. (प्रेषित ३:२१)
जगाच्या सुरुवातीपासून देवाने त्याच्या सर्व पवित्र संदेष्ट्यांच्या मुखाद्वारेहे म्हटले आहे.
संदेष्ट्याचे मुख हे महत्वाचे साधन आहे.
Chapters