घटक:
१. अहरोन आणि त्याचे मुलगे
२. पाणी
३. वस्त्रे
४. अभिषेकाचे तेल
५. बैल हे पापार्पण असे
६. दोन गोऱ्हे
७. बेखमीर भाकरीची टोकरी
कारण येशू मध्ये, आपण पवित्र याजकीयगण आहोत.......राजकीय याजकगण. (१ पेत्र २: ५, ९). ह्या अभिषिक्त करण्याच्या संस्कारात येथे तुलनात्मक आपल्यासाठी बरेच काही शिकण्यासारखे आहे. परमेश्वराला पाहिजे की त्याचे उद्धेश आणि इच्छे साठी आपल्यास्वतःला वेगळे असे करावे, आणि तो हा सिद्धांत वापरतो की ते उद्देश्य पूर्ण करावे.
मोशेने अहरोन आणि त्याच्या मुलांना तेथे आणले आणि पाण्याने धुतले.
अ. अहरोन आणि त्याचे मुलगे: इस्राएल मध्ये कोणासाठी हा काही केवळ एक उत्सव नव्हता. इतर कोणासाठी अभिषिक्त करण्याचे उत्सव तेथेउपलब्ध होते- जसे गणना ६ मध्ये नाजीर राहण्याची शपथ. परंतु हा उत्सव याजकासाठी होता, अहरोन आणि त्याचे मुलगे.
ब. आणि त्यांना पाण्याने धुतले.
अभिषिक्त करण्याची प्रक्रिया शुद्धीकरणाने सुरु झाली. सर्व याजकीय सेवाकार्ये ही शुद्धता झाल्यानंतर सुरु होतात आणि शुद्धता जी प्राप्त केली: तू त्यांना धु. अहरोन आणि त्याच्या मुलांनी स्वतःला धुतले नाही; त्यांनी धुणे प्राप्त केले.
१. हे लीन करण्याचे आहे, कारण हे सार्वजनिकपणे दर्शनमंडपाच्या द्वाराजवळ घडले. आपण अगोदर लीन झाल्याशिवाय आपल्याला आपल्या पापापासून शुद्ध करता येणे शक्य नाही.
२. "काही यहूदी भाषांतरकारांनी हेमानले आहे कीअहरोन आणि त्याच्या मुलांचे धुणे हे पूर्णपणे बुडवून होते, जसे मुख्य याजकाकडून प्रायश्चीत्ताच्या दिवशी आवश्यक होते. (लेवीय १६: ४)."
३. हे महान-शुद्धीकरण हे एकदाच होणारी गोष्ट होती. मग तेव्हापासून त्यांना केवळ त्यांचे हात आणि पाय हेच केवळ धुणे होते.
४. ह्याप्राचीन याजकांप्रमाणे, प्रत्येक ख्रिस्ती हा देवाच्या वचनाच्या कार्याद्वारे धुतला गेला आहे (इफिस ५: २६), पवित्र आत्म्याच्या पुनर्जीवनाच्या कार्याद्वारे (तीताला पत्र ३: ५). हे शुद्धीकरणाचे कार्य आपल्यासाठी येशूच्या मृत्यू द्वारे पूर्ण केले गेले आहे (प्रकटीकरण १: ५) आणि ते विश्वासा द्वारे लागू केले जाते.
आणि त्याने त्यांना अंगरखा घातला: शुद्ध केल्यानंतर, याजकाला वस्त्रे घालावयाची होती-परंतु त्यांची स्वतःची वस्त्रे नाही. त्यास परमेश्वरा द्वारे दिलेली वस्त्रे घालायची होती.
१. ह्या प्राचीन याजकाप्रमाणे, प्रत्येक विश्वासणाराहा येशू ख्रिस्ता मध्ये आणि त्याच्या धार्मिकतेने परिधान केलेला आहे (प्रकटीकरण ३: ५). हीवस्त्रे आहेत जी येशू द्वारे मोफत दिली गेली आहेत, परंतु विश्वासा द्वारे प्राप्त केली आणि "परिधान" केलेली आहे.
२. लक्षात घ्या, ही वस्त्रे ही त्यांना पुरविली गेली आहेत. त्यांना विकत घेण्यासाठी काही खर्च झालेला नाही, ना ही त्यांना विणण्यात काही परिश्रम लागले आहेत, ना ही त्यास बनविण्यात काही कुशलता; त्यांना सहज ती परिधान करावयाची होती. आणि तुम्ही, परमेश्वराचे प्रिय लेकरू, तुम्हाला ती वस्त्रे परिधान करावयाची आहे, जी येशू ख्रिस्ताने तुम्हाला पुरविली आहेत, त्याच्या स्वतःचे मोल देऊन, आणि तुम्हांवर अमर्यादित प्रीति मुळे मोफतपणे दिले गेले आहे."
ब. कमरबंद कसलेला..... त्याच्यावर एफोद...त्याच्यावर ऊरपट बांधलेला, त्यावर एक पट्टी आवळली. वस्त्राचे हे प्रत्येक प्रकार हे मुख्य याजकासाठी केले होते, पेहराव हा गौरव आणि याजकाच्या सुंदरतेलादाखविण्यासाठी होता. (निर्गम २८: २)
आणि तुमच्या समर्पणाचे सात दिवस पुरे होईपर्यंत तुम्ही दर्शनमंडपाच्या दाराबाहेर जाऊ नये, कारण तुमचे समर्पण सात दिवस चालेल. (लेवीय ८: ३३)
याजकीयपणात कार्य करणे
ही गुपिते आहे जी जुन्या करारात लपलेली आहेत जीप्रभु येशू ख्रिस्ता कडे इशारा करते. नवीन करार म्हणजे जुना करार जो प्रकट केलेला आहे.
पण तुम्ही तर 'निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र,' देवाचे'स्वतःचे लोक' असे आहा; ह्यासाठीकी, ज्याने तुम्हांस अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले 'त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे.' (१ पेत्र २: ९)
ज्यांनी प्रभु येशू ख्रिस्ताला त्यांचा प्रभु आणि तारणारा म्हणून स्वीकारले आहे त्या सर्वांना नवीन करार याजक म्हणतो. जुन्या करारात तेथे एक याजकीय संस्कार होता परंतु येशू मध्ये आपल्याला राजकीय याजकगण आहे.
मग तुम्ही श्रीमंत किंवा गरीब, काळे, गोरे, पिवळे, हिरवे, शिक्षित, अशिक्षितकसेही असा- तुम्ही एक राजकीय याजकगण आहात.
आणि मोशेने ते जिवंत मारले (बलिदान कापले). आणित्याचे काही रक्त मोशेने घेऊन अहरोनाच्या उजव्या कानाच्या पाळीला, उजव्या हाताच्या अंगठयाला व उजव्या पायाच्या अंगठयाला लाविले. ते झाल्यावर मोशेने अहरोनाच्या मुलांना आणून त्याच्या उजव्या कानाच्या पाळीला, उजव्या हाताच्या अंगठयाला व उजव्या पायाच्या अंगठयाला काही रक्त लावून ते वेदीवर सभोवती टाकिले. (लेवीय ८: २३-२४)
लक्षात घ्या बलिदानाचे रक्त हे तीन मुख्य भागावर लावण्यात आले.
१. कान
२. अंगठा
३. पायाचा अंगठा
उजवा कान: आपण शारीरिक कानाने ऐकतो (इब्री-ओझेन), परंतु परमेश्वर हा त्याची वाणी कोणी आध्यात्मिकरित्या ऐकणे याबद्दल विचार करतो. परमेश्वर कान उघडतो, म्हणजे मनुष्याने दैवी सुचना ह्या सरळपणे प्राप्त कराव्या.
स्तोत्रसंहिता ४०: ६ पाहा,
यज्ञपशु व अन्नार्पण ह्यांत तुला संतोष नाही;
तूं माझे कान उघडिले आहेस;
होम व पापाबद्दल अर्पण ही तूं मागत नाहीस.
उपदेश प्राप्त करण्यात चूक करणे हेपाप आणि विनाशाकडे नेते
पेत्राने एक उपदेश मानला आणि संपन्नते साठी त्याची गरिबी
तुमच्या कानाचे द्वारे काळजीपूर्वक संरक्षित करा. विश्वास किंवा भीती हा अंतिम परिणाम
उजवा अंगठा:तुमचा उजवा हात घ्या; तुमच्या हाताचे अंगठया शिवाय चित्र काढा आणि हा प्रश्न विचारा: "कशा तरी वस्तूला मी कसे घेऊ आणि माझा अंगठा नसताना त्यास कसे धरून ठेवू?" परमेश्वराने अंगठयामध्ये अद्भुत सामर्थ्य ठेवले आहे.
निर्गम २९: २० मध्ये अहरोनाच्या मुलांच्या अंगठयाला रक्त हे बलिदान असे लावले गेले आणि आपण सर्व जण रक्ताच्या सामर्थ्याला ओळखतो आणि समजतो.
मी अनेक वर्षे हा विश्वास ठेवला की अंगठा सामर्थ्याला प्रतिनिधित करतो ज्यास आपण वापरतो जे आपण देवासाठी करतो जे करण्यासाठी त्याने आपल्याला बोलाविले आहे. परमेश्वर आपल्याला काहीतरी कधीही काही करण्यासाठी देत नाही जोपर्यंत तो आपल्याला कामासाठी तयार करीत नाही.
उजव्या अंगठया शिवाय व्यक्ति परमेश्वराची सेवा करू शकतो काय? अर्थातच ते करू शकतात. माझा मुद्दा हा अंगठ्याच्या चिन्हात्मक वापर आणि उपयोगा बाबत आहे.
माझे पाचारण काय आहे?
मी हे नेहमी पाहिले आहे लोक मला लिहित हे विचारतात, "काय मी प्रेषित, भविष्यवक्ता, शिक्षक, पाळक वगैरे आहे काय?" मी ते शोधण्यासाठी थांबत नाही.
परमेश्वराने तुमच्या हाताच्या कामाला शुद्ध केले आहे-कार्य करीत राहा.
(प्रार्थना: मी माझे हात येशूच्या रक्ताने आच्छादित करतो. मी माझ्या हाताच्या कामाला येशूच्या रक्ताने आच्छादित करतो.)
उपदेशक ९: १०: (अ) येथे आपल्याला हा उपदेश केला आहे की, "जे काही काम आपल्या हाती पडेल ते आपले सर्व सामर्थ्य खर्च करून करावे."
पायाचा उजवा मोठा अंगठा: तुमच्या पायाचा मोठा किंवा महान अंगठा नाही असे मनात चित्र उभारा आणित्या मोठया अंगठया शिवाय चालणे आणि संतुलन ठेवणे हे किती कठीण होईल.
निश्चितच तुमच्या पाया बद्दल देवाला धन्यवाद देणे आहे.
स्तोत्रसंहिता ४०:२ दर्शविते, परमेश्वर स्थिरता आहे, "माझे पाय खडकावर स्थिर कर आणि माझी पावले स्थिर कर."
मोठया अंगठयाचे कार्य हे तुमचे परमेश्वराबरोबर चालण्यात संतुलन ह्यासंबंधात आहे. जे काही परमेश्वराकडून नाही ते तुम्हाला असंतुलित करेल ज्यामुळे तुम्ही अडखळाल आणि शक्यतो जमिनीवर पडाल.
त्या मोठा अंगठ्याने तुम्हाला देवाच्या सत्यामध्ये स्थिर आहे असे प्रतिनिधित केले पाहिजे, सरळपणे चालणे जसे तो तुम्हाला मार्गदर्शित करतो, ती ठिकाणे आणि कार्ये टाळावी जे तुम्हाला अडखळण्यात कारणीभूत ठरतील.
त्या मित्रांना भेट देणे आणि मद्य पिणे याने कित्येक कुटुंब आणि विवाह नष्ट केले आहेत. मी एका मुलाला 'आनंदी फादर्स डे' शुभेच्छा दिली, तो म्हणाला, मी माझ्या बापाचा द्वेष करतो, कारण तो केवळ मद्य प्याले आणि आम्हाला मारले आहे.
तुमचे पाय चुकीच्या दिशेने जात आहेत काय.....
अहरोन आणि त्याच्या मुलांसाठी सात दिवस समर्पितराहण्याचा समय
आणि तुमच्या समर्पणाचे सात दिवस पुरे होईपर्यंत तुम्ही दर्शनमंडपाच्या दाराबाहेर जाऊ नये, कारण तुमचे समर्पण सात दिवस चालेल. (लेवीय ८: ३३)
Chapters