परमेश्वर मोशेला म्हणाला, अहरोन, त्याचे मुलगे आणि सर्व इस्राएल लोक ह्यांना सांग की, परमेश्वराने आज्ञा केली आहे ती ही: इस्राएल घराण्यातील एखादया माणसाने छावणीत किंवा छावणीबाहेर बकरा मारिला, पण परमेश्वराच्या निवासमंडपासमोर परमेश्वराला अर्पण करावयाला तो दर्शनमंडपाच्या दारापाशी आणिला नाही, तर त्या माणसाला रक्तपात केल्याचा दोष लागेल; त्याने रक्तपात केला म्हणून त्याचा स्वजनांतून उच्छेद व्हावा. (लेवीय १७: १-४)
मूर्तिपूजक जगतात त्या वेळी, जेथे कोठे कोणाला आवडेल तेथे बलिदान करणे ही वहिवाट होती.ह्या वहिवाट नुसार टेकडीवर, जंगलात, किंवा एका विशेष ठिकाणी वेदीबांधल्या जात होत्या.
ह्यामुळे व्यभिचारी मतीने अजदैवताच्या मागे लागून त्याना त्यांनी आपले यज्ञपशु अर्पण करू नयेत. (लेवीय १७: ७)
येथे मूर्तिपूजक लोकांच्या दैवता मागे आध्यात्मिक सत्यता होती परंतु प्रत्यक्षता ही खरेच सैतानी होती. बाल, अष्टरोथ आणि इतरांना बळी अर्पण करण्यात, त्यांनी खरेच सैतानाची उपासना केली होती.
प्रेषित पौलाने १ करिंथ १०: २०-२१ मध्ये मुख्यतः हेच म्हटले होते: तर असे आहे की, परराष्ट्रीय जे यज्ञ करितात 'ते देवाला नव्हे तर भूतांना करितात;' आणि तुम्ही भूतांचे सहभागी व्हावे अशी माझी इच्छा नाही. तुमच्याने प्रभूचा प्याला व भूतांचाही प्याला पिववत नाही; 'प्रभूच्या मेजावरचे' व भुतांच्याही मेजावरचे तुमच्याने खाववत नाही.
येथे एक विचार आहे की सर्व उपासना ज्या देवासाठी केल्या जात नाही त्यासैतानाला आणि त्याच्या भूतांना केल्या जातात.
रक्ताचेमहत्त्व
इस्राएल घराण्यापैकीअथवा त्यांच्या मध्ये राहणाऱ्या परदेशीय लोकांपैकी कोणी कोणत्याही प्रकारचे रक्त सेवन केले तर रक्त सेवन करणाऱ्या मनुष्याला मी विन्मुख होऊन त्याचा स्वजनांतून उच्छेद करीन (लेवीय १७: १०).
तोव्यक्ति जो रक्त खातो त्या मनुष्याला मी विन्मुख होईन.
इस्राएली लोकांना ही परमेश्वराची कडक आज्ञा होती, परंतु कारण हे सरळ होते:
शरीराचे जीवन तर रक्तात असते, आणि तुमच्या जीवांबद्दल वेदीवर प्रायश्चित्त करण्यासाठी ते मी तुम्हांला दिले आहे; कारण रक्तात जीव असल्याकारणाने रक्तानेच प्रायश्चित्त होते. (लेवीय १७: ११)
१. कारणशरीराचे जीवन तर रक्तात असते.
कल्पना ही, सर्व जीवन हे देवाचेच आहे, आणि कारण रक्त हे जीवनाच्या चिन्हात आहे, ते विशेषतः देवाचेच आहे.
बायबल जोर देऊन सांगते की"जीवन" हे रक्तात आहे. जेव्हा रक्त तुमच्या शरीरात वाहण्याचे थांबते,तुम्ही मृत आहात, पूर्णपणे, क्षणात. त्याचप्रमाणे, ईश्वरविज्ञान, चर्च, प्रार्थना गट किंवा व्यक्ति जो ख्रिस्ताच्या रक्ता शिवाय आहे तो मृत आहे. ख्रिस्ताचे जीवन, त्याचे सर्व सामर्थ्य आणि आशीर्वादासह, हे केवळ तुमचे आहे जेव्हा तुम्ही त्याच्या रक्ता मध्ये विश्वासा सह जुडलेले आहात.
२. आणि तुमच्या जीवांबद्दल वेदीवर प्रायश्चित्त करण्यासाठी ते मी तुम्हांला दिले आहे.
अतिरिक्त, रक्त हे हेच माध्यम होते ज्याद्वारे प्रायश्चित्त हे केले जात होते-त्यामुळे रक्त खाणे, हे त्यास अपवित्र करणे होय. तसेच, पापाची गंभीरता ही प्रायश्चीत्ताचीमोठी किंमत-मृत्यू द्वारे प्रकट केली जाते.
३. हे खरे आहे, की मूर्तिपूजक लोकांचे अनेकविधी हे रक्त पिऊन साजरे केले जात होते, आणि परमेश्वराला सुद्धा ह्या मूर्तिपूजक लोकांच्या पद्धती पासून वेगळे असे पाहायचे होते.
इस्राएल लोकांपैकी कोणी अथवा त्यांच्यामध्ये राहणाऱ्या परदेशियांपैकी कोणी खाण्यालायक पशुची किंवा पक्ष्याची शिकार केली तर त्याने त्याचे रक्त जमिनीवर ओतून मातीने झाकावे. कारण प्राणीमात्रांच्या जीवनाविषयी म्हणाल तर त्यांचे रक्त हेच त्यांचे जीवन होय; ह्यास्तव इस्राएल लोकांना मी म्हटले आहे की, कोणत्याही प्राण्यांचे रक्त सेवन करू नये, कारण सर्व प्राण्यांचे जीवन हेच त्यांचे रक्त होय, ते जो कोणी सेवन करील त्याचा उच्छेद व्हावा. (लेवीय १७: १३-१४)
जुन्या करारात प्राण्यांच्या रक्ताला हा आदर हे आपल्याला विचार करावयालालावते की आपण येशूच्या रक्ताला किती आदर दिला पाहिजे. जर, जुन्या करारा अंतर्गत, प्राण्यांच्या रक्ताला आदर दिला जात होता, तर मग येशूच्या बहुमुल्य रक्ता विषयी काय जे नवीन करार करते?
तर ज्याने देवाच्या पुत्राला पायाखाली तुडविले, जेणेकरून तो पवित्र झाला होता ते 'कराराचे रक्त' ज्याने अपवित्र मानले, आणि कृपेच्या आत्म्याचा अपमान केला तो किती अधिक कठीण दंडास पात्र ठरेल? (इब्री १०: २९)
Chapters