एके दिवशी दहा कुष्ठरोगी येशू कडे आले
त्याने त्यांना पाहून म्हटले, तुम्ही जाऊन स्वतःस 'याजकांना दाखवा'. मग असे झाले की, ते जाता जाता शुद्ध झाले. (लूक १७: १४)
त्यांच्या स्वतःला याजकाला दाखविणे हे वैध ठरविणे आणि निश्चित करण्याचा मार्ग होता की ते वास्तवात महारोग पासून स्वस्थ झाले आहेत. याच कारणासाठी मी लोकांना सांगतो की त्यांनी डॉक्टर कडे जावे आणि ते दुष्टात्म्यापासून स्वस्थ झाले आहेत याचा तपशील घ्यावा. लोक तुम्हाला आणि मला प्रश्न करतील परंतु ते वैद्यकीय प्रमाणास नाकारू शकत नाही.
परमेश्वर मोशेला म्हणाला, महारोग्यास शुद्ध ठरविण्याच्या वेळचा नियम हा त्याला याजकाकडे आणावे. (लेवीय १४: १-२)
हीविधी त्या दिवसात फार क्वचितच केला जात असेन कारण महारोगहा नैसर्गिक माध्यमाने स्वस्थ केला जाऊ शकत नव्हता. म्हणून जेव्हा, प्रभु येशूने त्या महारोग्यास सांगितले जो स्वस्थ झाला होता की जाऊन स्वतःस याजकास दाखव आणि मोशेने सांगितलेले अर्पण कर. हे कदाचित एक आगळेवेगळे दृश्य असेन जे पाहावे.
जुन्या करारात, येथेतीन प्रकारचे अभिषेक आहेत जे आपण ख्रिस्ती लोक म्हणून चिन्हात्मक असे आहे.
तीन अभिषेक:
१. महारोग
२. याजक
३. राजाचा अभिषेक
याजकाने छावणीच्याबाहेर जाऊन त्या महारोग्यास तपासून पहावे, व त्याच्या अंगावरचा महारोगाचा चट्टा बरा झाला असल्यास त्याने आज्ञा करावी की, ज्याला शुद्ध ठरवावयाचे आहे त्याच्यासाठी दोन जिवंत शुद्ध पक्षी, गंधसरुचे लाकूड, किरमिजी रंगाचे कापड व एजोब ही घेऊन यावे. (लेवीय १४: ३-४)
१. दोन जिवंत शुद्ध पक्षी
२. गंधसरुचे लाकूड
३. किरमिजी रंगाचे कापड
४. एजोब
ही प्रक्रिया पाप्यास शुद्ध करण्यासाठी चिन्हात्मक अशी आहे. वस्तू ज्या महारोग्याचा अभिषेक मध्ये आहेत हे त्याचे चित्रण आहे जे आपल्यासाठी प्रभु येशूने वधस्तंभावर केले.
मग याजकाने आज्ञा करावी की, वाहत्या पाण्यावर मातीच्या पात्रात त्यातला एक पक्षी मारावा. (लेवीय १४: ५)
हे आपला प्रभु येशू ख्रिस्त शरीरात येण्याचे, पाण्यात बाप्तिस्मा घेण्याने आणि आपल्यासाठी मरण पावण्याचेचिन्हात्मक असे आहे.
आणि जिवंत पक्षी, गंधसरुचे लाकूड, किरमिजी रंगाचे कापड आणि एजोब ही घेऊन जिवंत पक्ष्यासह वाहत्या पाण्यावर मारिलेल्या पक्ष्याच्या रक्तांत त्याने बुडवावी. (लेवीय १४: ६)
लाकडू वधस्तंभाचेप्रतीक आहे. किरमिजी हे पापाचे प्रतीक आहे. यशया १: १८ म्हणते, "परमेश्वर म्हणतो, चला, या, आपण बुद्धिवाद करू; तुमची पातके लाखेसारखी लाल असली तरी ती बर्फासारखी पांढरी होतील; ती किरमिजासारखी तांबडी असली तरी लोकरीसारखी निघतील." मग पक्ष्याला रक्तात बुडविले पाहिजे. हे चिन्हात्मक आहे की पापी व्यक्तिहा येशूच्या रक्ता द्वारे शुद्ध होतो.
आणि ते रक्त महारोगापासून शुद्ध ठरावावयाच्या मनुष्यावर सात वेळा शिंपडावे, मग तो शुद्ध झाला आहे असे सांगून त्या जिवंत पक्ष्याला माळरानात सोडून दयावे. (लेवीय १४: ७)
मग याजक एजोब घेऊन महारोग्यावर सात वेळा रक्त शिंपडतोआणि त्यास शुद्ध झाल्याचे घोषित करतो. जुन्या करारात, एजोब हे शुद्धीकरण (रक्त शिंपडणे किंवा लावणे)बाबतीत जुडलेले आहे. स्तोत्रसंहिता ५१: ७ म्हणते, "एजोबाने माझा पापमल काढ म्हणजे मी निर्मळ होईन; मला धू म्हणजे मी बर्फाहून शुभ्र होईन."
जिवंत पक्ष्याला माळरानात सोडून दयावे
हे चित्र संपूर्ण बायबल भर मिळते
हे उद्धाराचे चित्र आहे. एक दुसऱ्याच्या स्थानी मरत आहे.
येशू ऐवजी बरब्बाला मुक्त केले गेले
बरब्बा चा अर्थ 'पित्याचा मुलगा', येशू सुद्धा पित्याचा पुत्र होता.
आणि शुद्ध ठरवावयाच्या मनुष्याने आपले कपडे धुवावे, आपले मुंडन करवावे आणि पाण्याने स्नान करावे, म्हणजे तो शुद्ध ठरेल; त्यानंतर त्याने छावणीत यावे. (लेवीय १४: ८)
-नवीन जन्म झाल्याचा अनुभव. जसे बाळ केसविरहित असते तसेच मनुष्य सुद्धा.
आणि त्याने पाण्याने स्नान करावे, म्हणजे तो शुद्ध होईल.
पाणी देवाच्या वचनास प्रतिनिधित करते.
ते देवाच्या वचनाबाबत बोलते जे व्यक्तीला शुद्ध करते.
जे वचन मी तुम्हांला सांगितले त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालाच आहां. (योहान १५: ३)
मग याजकाने दोषबलीचे काही रक्त घेऊन शुद्ध ठरवावयाच्या मनुष्याच्या उजव्या कानाच्या पाळीला, उजव्याहाताच्या अंगठयाला, उजच्या पायाच्या अंगठयाला लावावे. (लेवीय १४: १४)
उजव्या कानाच्या पाळीला (कान-ऐकणे)
उजव्याहाताच्या अंगठयाला(हात-आपल्या हाताची कामें)
उजच्या पायाच्या अंगठयाला (पाय-आपले चालणे)
तारणाचे बक्षीस आपण स्वीकारण्या अगोदर, आपण विनाशाच्या मार्गावर होतो.नीतिसूत्रे १४:१२ म्हणते, "मनुष्याला एक सरळ मार्ग दिसतो, पण त्याच्या शेवटास मृत्युपथ फुटतात." आपण जेव्हा येशू कसे येतो, तो आमचे आचरण शुद्ध करतो, आणि आम्हांला जीवनाच्या मार्गावर स्थित करतो.
आणि त्याच्या तळहातावर जे तेल उरेल त्यातले काही घेऊन याजकाने शुद्ध ठरवावयाच्या मनुष्याच्या उजव्या कानाच्या पाळीवरील व उजव्या हाताच्या अंगठयावरील व उजव्या पायाच्या अंगठयावरील दोषबलीच्या रक्तावर लावावे. (लेवीय १४: १७)
कान-हे दाखविते की ऐकणे हे शुद्ध केले गेले आहे.
अंगठा-त्याचे काम सुद्धा शुद्ध केले गेले आहे. बायबल आपल्याला दाखविते की आपले काम जर परमेश्वरा द्वारे अभिषिक्त असेकेलेले नाही, तर त्याचा अस्वीकार केला जाईल.
पायाचा अंगठा –जरआपले चालणे हे अभिषिक्त असे नाही, आपण अडखळू. परमेश्वर आपल्याला सांगतो की आपण आत्म्यामध्ये चालले पाहिजे जेणेकरून शरीराची वासना पूर्ण करू नये. (रोम ८: १३)
लक्षात घ्या, येथे प्रथम रक्त येते आणि मग त्याच ठिकाणी तेल येते.
याजकाने तळहातावर उरलेले तेल त्याने शुद्ध ठरवावयाच्या त्या मनुष्याच्या डोक्याला लावावे आणि त्याच्यासाठी त्याने परमेश्वरासमोर प्रायश्चित्त करावे. (लेवीय १४: १८)
मगयाजक उरलेले तेल त्याच्या हातात घेतो आणि ते महारोग्याच्या डोक्यावर ओततो. मला, हे देवाच्या अधिकाराच्या अधीन होणे दाखविते.
हे केवळ कोकऱ्याचेच रक्त नाही ज्याने महारोग्यास शुद्ध केले, हे ते अभिषेकाचे तेल (पवित्र आत्म्याचे चिन्ह) होते ज्याने त्यास पुनर्स्थापित केले.
Chapters