अहरोनाला असे सांग की, पुढील पिढ्यांमध्ये तुझ्या वंशात जर कोणाला काही व्यंग निघाले तर त्याने आपल्या देवाप्रीत्यर्थअन्न अर्पिण्यासाठी जवळ येऊ नये. त्याला कोणतेही व्यंग असले तरी त्याने जवळ येऊ नये; मग तो अंधळा असो, लंगडा असो, बसक्या नाकाचा असो, मोडक्या पायाचा असो अथवा थोटा असो, कुबडा असो, खुजा असो, नेत्रदोषी असो, किंवा चाई, खरुजझालेला असो अथवा भग्नांड असो; अहरोन याजकाच्या वंशांपैकी कोणात असे एखादे व्यंग असले तर त्याने परमेश्वराला हव्य अर्पिण्यासाठी जवळ येऊ नये; त्याच्यात व्यंग आहे; त्याने आपली देवाला अन्न अर्पावायला जवळ येऊ नये. त्याने आपल्या देवाचे अन्न म्हणजे परमपवित्रस्थानातील अन्न व पवित्र पदार्थ खावे; पण त्याला व्यंग असल्यामुळे त्याने अंतरपटाच्या आंत आणि वेदीपाशी जाऊ नये व माझी पवित्रस्थाने भ्रष्ट करू नये; कारण त्यांना पावन करणारा मी परमेश्वर आहे. (लेवीय २१: १७-२३)
पुरुष आणि स्त्रियांच्या मनावर दृश्य वस्तूंचा मोठा प्रभावपडतो. जुन्या करारातील याजकांव्यतिरिक्त, जे ख्रिस्ताचे प्रतीक असे आहेत, जुन्या करारातील लोकांनी याजकांस देवाकडे जाण्याचा मार्ग असे पाहिले. शारीरिक दोषाने ह्या प्रक्रियेला अडथळा केला असता. तथापि, नवीन करारात असा प्रकार नाही.
Chapters