मी परमेश्वर तुमचा देव आहे म्हणून आपणांस पवित्र करून पवित्र राहा, कारण मी पवित्र आहे; म्हणून तुम्ही जमिनीवर रांगत चालणाऱ्या कोणत्याही जातीच्या प्राण्यांमुळे आपणांस विटाळू नका. कारण तुमचा देव व्हावे म्हणून ज्याने तुम्हांला मिसर देशातून इकडे आणिले तोच मी परमेश्वर आहे; मी पवित्र आहे, म्हणून तुम्हीही पवित्र व्हा. (लेवीय ११: ४४-४५)
येथे एका प्रमाणासाठी, एका मोजमाप साठी तातडीची गरज आहे ज्याद्वारे आपण चांगले आणि वाईट यामध्ये फरक करू शकतो.
आधुनिक तत्वज्ञानी आपल्याला अचूकपणे सांगतात कीयेथे काहीही खरेच हानिकारक नाही, आज जर आपण आपले विचार बदलू शकलो तर मग सर्व काही चांगले होईल.
बायबल आपल्याला सांगते की आपण त्या जगामध्ये राहत आहोत जेथे सत्य आणि चूक हे गुंतागुंतीप्रमाणे संमिश्र झालेले आहेत आणि कोणी सहजपणे फरक हा सांगू शकत नाही.
लेवीय ११ मध्ये तुम्हाला खाण्याविषयी काही नियम आहेत कि शुद्ध आणि अशुद्ध प्राण्यांमध्ये फरक करावा आणि त्यामध्ये अनेक आरोग्यविषयक बाबी सुद्धा टाकल्या आहेत. अशा अनेक व्यवहारिक पद्धतींमध्ये स्वास्थ्यपूर्ण राहण्यासाठी सामान्य विचाराच्या आधारभूत गोष्टी आहेत.परमेश्वराने त्याच्या लोकांना अशा नियमाद्वारे शारीरिकदृष्ट्या स्वास्थ्यपूर्ण ठेवले होते.
शब्द पवित्र मुख्यतः संपूर्णरित्या असा आहे. त्यास पाहिजे की आपण संपूर्ण असे असावे आणि आपल्या मानवतेला पूर्ण करावे. हे केवळ धार्मिक कार्य ज्याद्वारे तुम्ही कार्यरत आहात त्यामध्येच परमेश्वर रुची घेत आहे. तुम्ही जेथे आहात त्या परिस्थितीच्या मध्य तो त्याचेवैशिष्ट्येगुण प्रगट होत आहे की नाही हे पाहत आहे.
ह्या वचनामध्ये प्रथमच आपण हे वाक्य "मी परमेश्वर तुमचा देव आहे" पाहत आहोत, जे जुन्या करारात पन्नास वेळा वापरले गेले आहे. हे ह्या कारणासाठी की परमेश्वर हा त्यांचा देव होता की त्यांनी भिन्न असावे, त्यांनी वेगळे आणि पवित्र असावे.
वधस्तंभावर येशूने त्याचे जीवन आपल्यासाठी बदलले. आणि आपल्यामध्ये राहण्याचा त्याचा परिणाम हा एक नवीन हृद्य आहे, एक हृदय जे त्याच्यासाठी वेगळे केलेले आहे. आपण आपल्या स्वतःला पवित्र ठेवावे आणि योग्य कार्य करणारे असावे असे पाहतो कारण तो आपल्यामध्ये आहे.
Chapters