मुलगा बाळ
इस्राएल लोकांना सांग: स्त्री गर्भवती होऊन तिला मुलगा झाल्यास तिने सात दिवस अशुद्ध राहावे; ऋतुकाली जशी ती दूर बसते तशीच ती अशुद्ध समजावी. (लेवीय १२: २)
नंतरत्या स्त्रीने आपल्या रक्तस्त्रावापासून [जे गमाविले आहे]शुद्ध होण्यासाठी तेहतीस दिवस कंठावे [वेगळे राहावे]; तिची शुद्धि होण्याची मुदत पुरी होईपर्यंत तिने कोणत्याही पवित्र वस्तूला स्पर्श करू नये व पवित्रस्थानात [अंगणात]आजू नये. (लेवीय १२: ४)
मुलगी बाळ
तिला मुलगी झाल्यास ऋतूकाली जशी ती दूर बसते तसेच तिने चौदा दिवस अशुद्ध राहावे, आणि आपल्या रक्तस्त्रावापासून [जे गमाविले आहे]शुद्ध होण्यासाठी सहासष्ट दिवस कंठावे. (लेवीय १२: ५)
मुलगी बाळ साठी पूर्णपणे दुप्पट
मरिया मंदिरात ३३ दिवसानंतर आली असेन
मरिया जी येशूची आई होती ती ईश्वरीय आणि धन्यवादीत होती, परंतु पाप विरहित नव्हती. येशू हाच एक मनुष्य जो पापविरहित होता. येशूने"पाप केले नाही" (२ करिंथ ५: २१).
"त्याच्यामध्येपाप नव्हते" (१ योहान ३: ५). अशा प्रकारे मरिया किंवा इतर कोणाच्याही बाबतीत असे कधी म्हटले गेले नाही.
पुढील वचन हे पूर्णपणे स्पष्ट करते:
पुढे मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे त्यांचे 'शुद्धीकरणाचे दिवस भरल्यावर' ते त्याला वर यरुशलेमेस घेऊन आले. ते अशासाठी की, त्याचे प्रभूला समर्पण करावे; (म्हणजे'प्रत्येक प्रथम जन्मलेला नर प्रभूसाठी पवित्र म्हटला जावा असे जे प्रभूच्या नियमशास्त्रात लिहिले आहे त्याप्रमाणे करावे.) आणि प्रभूच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे 'होल्यांचा जोडा किंवा पारव्यांची दोन पिले' ह्यांचा यज्ञ करावा. (लूक २: २२-२४)
पुढील वचन आपल्याला उपदेश देते की मरिया येशूची आई जे नियमशास्त्र पूर्ण करीत होती.
तिला मुलगा किंवा मुलगी झाल्यावर तिची शुद्धि होण्याची मुदत पुरी झाली म्हणजे तिने होमार्पणासाठी एक वर्षाचा मेंढा आणि पापार्पणासाठी पारव्याचे पिलू किंवा होला दर्शनमंडपाच्या दारापाशी याजकाकडे घेऊन जावे. मग याजकाने ते परमेश्वरासमोर अर्पून तिच्यासाठी प्रायश्चित्त करावे, म्हणजे ती आपल्या रक्तस्त्रावापासून शुद्ध होईल. मुलगा किंवा मुलगी झालेल्या स्त्रीविषयीचा नियम हा. तिला मेंढा अर्पिण्याची ऐपत नसेल तर तिने दोन होले अथवा पारव्यांची दोन पिले, एक होमार्पणासाठी व दुसरे पापार्पणासाठी आणावी, आणि याजकाने तिच्यासाठी प्रायश्चित्त करावे म्हणजे ती शुद्ध होईल. (लेवीय १२: ६-८)
हे स्पष्ट होते कीमरीया आणि योसेफ कडे मेंढा आणण्याची ऐपत नव्हती आणिम्हणून हे कारण आहे की त्यांनी दोन होले किंवा पारव्यांची दोन पिले आणली.
नियमशास्त्रानुसार, मरीयेला सुद्धा अशुद्ध समजले गेले आहे आणि तिला होमार्पण व पापार्पणासाठी अर्पण आणण्याची गरज आहे की तिला शुद्ध घोषित करावे.
आता येशूने पश्चातापाचा बाप्तिस्मा प्राप्त केला काय जरी त्याला पश्चातापाची गरज नव्हती,....कारण हे योग्य होते की, सर्व धर्मशास्त्र पूर्ण करावे (मत्तय ३: १५). मरीये च्या बाबतीत पवित्र शास्त्र शांत आहे.
Chapters