कारण आज परमेश्वर तुम्हाला दर्शन देणार आहे. (लेवीय ९: ४)
लक्षात घ्या हे कदाचित (निश्चित नाही)दिवसरात्र सात दिवस (दर्शन मंडपाच्या येथे) देवाचा शोध घेतल्यानंतर घडणार होते.
"तुम्ही जे करावे म्हणून परमेश्वराने आज्ञा दिली तें हेच; आता परमेश्वराचे तेज तुमच्या दृष्टीस पडेल." (लेवीय ९: ६)
तर मग काय जर व्यक्ति परमेश्वराबरोबर दिवसरात्र (सात दिवस)राहतो. मी विश्वास ठेवतो परमेश्वराचे गौरव हे प्रगट होईल.
मग अहरोनाने लोकांकडे वळून हात उभारून त्यांना आशीर्वाद दिला आणि जेथे त्यानेपापार्पण, होमार्पण व शांत्यर्पणे केली होती तेथून उतरून तो खाली आला. नंतर मोशे व अहरोन दर्शनमंडपात गेले व बाहेर आल्यावर त्यांनी लोकांना आशीर्वाद दिला, तेव्हा परमेश्वराचे तेज सर्व लोकांच्या दृष्टीस पडले; आणि परमेश्वरासमोरून अग्नी निघाला, व त्याने वेदीवरील होमार्पण व चरबी ही भस्म केली; हे पाहून सर्व लोकांनी जयजयकार केला व दंडवत घातले. (लेवीय ९: २२-२४)
तेव्हा परमेश्वराचे तेज सर्व लोकांच्या दृष्टीस पडले; आणि परमेश्वरासमोरून अग्नी निघाला: परमेश्वराने त्याची उपस्थिती अग्नि पाठवून सिद्ध केली. याजक तेथे होते, अर्पण तेथे होते, निवासमंडप तेथे होता आणि राष्ट्र तेथे होते परंतु देवाकडूनअग्नि येण्यापर्यंत ते सर्व अपूर्ण होते.
बायबल आपल्याला स्वर्गातून अग्निसह देवाने अर्पणाचा स्वीकार केला गेला आहे याची सात उदाहरणे देते:
हाबेल(उत्पत्ति ४: ४)
अहरोन(लेवीय ९: २४)
गिदोन(शास्ते ६: २१)
मानोहा(शास्ते १३: १९-२३)
दावीद(१ इतिहास २१: २८)
शलमोन(२ इतिहास७: १)
एलीया (१ राजे १८: ३८)
Chapters