जेव्हा महारोगाचा चट्टा हा व्यक्तीवर आहे, तेव्हा त्यास याजकाकडे आणावे. (लेवीय १३: ९)
जेव्हा बायबल ही संज्ञा वापरते, हे केवळ रोगाचा संदर्भ देण्यासाठी नाही ज्यास आपण आज महारोग म्हणतो, हान्सेन चा रोग.
ते त्या संज्ञे मध्ये सामाविलेले आहे, परंतु इब्री शब्द ज्यास येथे महारोग असे भाषांतरित केले आहे त्यामध्ये इतर त्वचेचे संसर्गजन्य आणिपसरणारे रोग सामील आहेत. ते सर्व धोकादायक आणि विनाशकारक असे ओळखले जातात, एक गंभीर धोका केवळ एखादया व्यक्तीला नाही परंतु सर्व इस्राएली लोकांसाठी, आणि म्हणून त्याचा शोध घेत होते.
आध्यात्मिकदृष्टया म्हटले तर, अनेक वेळेला, आपण आपल्या स्वतःच्या चुकांकडे दुर्लक्ष करत असतो. आपल्या सर्वांमध्ये हा आंधळेपणा आहे. त्यासाठीच आपली एक-दुसऱ्याला गरज आहे. आणि म्हणून इस्राएली लोकांना सुचना दिली गेली होती, जेव्हा त्यांना ह्या रोगाचे लक्षण दिसेल, तेव्हा त्यास याजकाकडे आणावे.
बायबल च्या दिवसात महारोग्याचीअवस्था
"ज्या महारोग्याच्याअंगावर हा चट्टा असेल त्याचे कपडे फाटके असावे; त्याच्या डोक्याचे केस मोकळे सोडिलेले असावे, त्याने आपला वरचा ओठ झाकून ठेवावा आणि अशुद्ध, अशुद्ध असे ओरडत जावे. जितके दिवस हा चट्टा त्याच्या अंगावर राहील तितके दिवस त्याने अशुद्ध राहावे; तो अशुद्ध होय, त्याने एकटे राहावे, छावणीच्याबाहेर त्याची वस्ती असावी." (लेवीय १३: ४५-४६)
Chapters