तर आता मजसाठी लबानोन पर्वतावरील गंधसरू कापण्याची आज्ञा दया; माझे सेवक आपल्या लोकांबरोबर राहतील; जी काही मजुरी आपण ठरवाल ती मी आपल्या सेवकांस देईन; आपल्याला हे ठाऊक आहे की इमारती लाकडे कापावयाचे कसब सिदोनी लोकांसारखे आमच्या लोकांपैकी कोणात नाही. (१ राजे ५: ६)
याचा अर्थ हा सुद्धा आहे की शलमोन देवाचे महान मंदिर परराष्ट्रीय लोकांचे लाकूड आणि परराष्ट्रीय लोकांच्या परिश्रमाने बांधण्यासतयार होता. इस्राएलच्या देवाचे हे मंदिर होते, परंतुहे इस्राएल साठीच केवळ नव्हते. फक्त यहूदी लोकांनी निवासमंडप बांधला, "परंतु मंदिर हे यहूदी आणि परराष्ट्रीय लोकांनी बांधले होते-ते दोघेही त्यात समाविष्ट होते.
माझे वडील दावीद यांचे शत्रू परमेश्वर पादाक्रांत करीपर्यंत त्यांच्या सभोवार युद्ध चालले असल्यामुळे त्यांना आपला देव परमेश्वर याच्या नामासाठी मंदिर बांधिता आले नाही हे आपणांला ठाऊक आहे;
पण आता माझा देव परमेश्वर याने मला चोहोकडे स्वास्थ्य दिले आहे; कोणी शत्रू अथवा अरिष्ट राहिले नाही.
पाहा, मी आपला देव परमेश्वर याच्या नामासाठी मंदिर बांधण्याचे योजिले आहे; परमेश्वराने माझे वडील दावीद यास म्हटले होते की तुझ्या जागी तुझ्या गादीवर तुझा जो पुत्र मी बसवीन तोचमाझ्या नामासाठी मंदिर बांधील; त्याप्रमाणे मी करणार आहे. (१ राजे ५: ३-५)
देवाचे मंदिर बांधण्यासाठी शांति हे पहिले चिन्ह होते.
ते जे शांति करणारे आहेत ते शांतीचे बी पेरतील आणि नितीमत्वाच्या उपजाची कापणी करतील. (याकोब ३: १८)
जशा प्रकारचे बी तुम्ही पेरीत आहात, हे तुमच्या बद्दल बरेच काही प्रगट करते
शांति करणारे शांतीचे बी पेरतील
निंदा करणारे निंदे चे बी पेरतील
प्रार्थना करणारे पुरुष किंवा स्त्री जेथे कोठे जातील तेथे प्रार्थनेचे बी पेरतील.
जशा प्रकारचे बी तुम्ही पेरीत आहात ते हे सुद्धा प्रगट करेल की तुम्ही कशा प्रकारची कापणी ही प्राप्त करणार आहात.
संपूर्ण जगभर लोक शांती प्राप्त करण्यास आटोकाट प्रयत्न करीत आहेत.
शांति ही अधिक कार्य करण्याने मिळणार नाही परंतु एक काम करण्याने आणि ते म्हणजे त्याच्या अधीन होऊन. बायबल दोन बहिणी, मार्था आणि मरिया याबद्दल बोलते. मार्था ही अधिक काम करण्यात थकलेली आणि निराशअशी दिसत होती, तर मरियेने येशूच्या चरणाजवळ समर्पणाच्या स्थितीत व नम्रतेत बसण्याचे निवडले होते. या ठिकाणीच तिने शांति प्राप्त केली होती.
तर आता मजसाठी लबानोन पर्वतावरील गंधसरू कापण्याची आज्ञा दया; माझे सेवक आपल्या लोकांबरोबर राहतील; जी काही मजुरी आपण ठरवाल ती मी आपल्या सेवकांस देईन; आपल्याला हे ठाऊक आहे की इमारती लाकडे कापावयाचे कसब सिदोनी लोकांसारखे आमच्या लोकांपैकी कोणात नाही. (१ राजे ५: ६)
"जी काही मजुरी आपण ठरवाल ती मी आपल्या सेवकांस देईन"
शलामोन उत्तम ते मजूर मिळविण्यास तयार होता.
Chapters