english हिंदी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us आमच्याशी संपर्क साधा स्पॉटिफाय वर ऐका स्पॉटिफाय वर ऐका Download on the App StoreIOS अँप डाउनलोड करा Get it on Google Play अँड्रॉइड अँप डाउनलोड करा
 
लॉग इन
ऑनलाइन देणगी
लॉग इन
  • होम
  • कार्यक्रम
  • थेट प्रसारण
  • टी.वी.
  • नोहाट्यूब
  • स्तुती
  • बातमी
  • डेली मन्ना
  • प्रार्थना
  • अंगीकार
  • स्वप्ने
  • ई पुस्तके
  • भाष्य
  • श्रद्धांजली
  • ओएसिस
  1. होम
  2. बायबल भाष्य
  3. अध्याय ६
बायबल भाष्य

अध्याय ६

Book / 10 / 2063 chapter - 6
368
१ राजेचा लेखक नेमके ठिकाण प्रगट करीत नाही जेथे मंदिर बांधले गेले होते परंतु २ इतिहासचा लेखक आपल्याला हे सांगतो की मंदिर हे मोरिया डोंगरावर बांधले गेले होते (२ इतिहास ३:१). हा तोच डोंगर आहे जेथे अब्राहाम गेला होता की इसहाकास बलिदान करावे आणि जेथे नंतर येशूला वधस्तंभावर खिळण्यात येईल (टेकडीच्या दुसऱ्या भागात).
 
मंदिराची लांबी 90 फूट, रुंदी 30 फूट आणि उंची 45 फूट होती. (1 राजे 6:2)
प्राचीन मंदिराबरोबर तुलना केल्यावर, हे तेवढे विशाल असे नव्हते; तरीही इस्राएली लोकांच्या मंदिराचे वैभव हे त्याच्या आकारामध्ये नव्हते.
 
भिंतीच्या बांधकामात कामगारांनी चांगले मोठे चिरे वापरले होते. खाणीतूनच ते योग्य मापाने कातून काढले होते. त्यामुळे मंदिरात ते बसवताना होतोड्या, कुऱ्हाही किंवा अन्य कुठल्या लोखंडी हत्याराचा आवाज झाला नाही. (1 राजे 6:7)
 
पद्धत ज्याप्रकारे मंदिर हे बांधिले गेले होते याने मला नेहमीच संमोहित केले आहे. १ राजे ६:७ नुसार, "मंदिर हे इतर कोठेतरी बनविले गेले आणि मग यरुशलेमेस आणले गेले की त्याची रचना करावी. हे दर्शविते की येथे काम करण्याची विविध ठिकाणे होती जी आसपासच्या भागात पसरलेली होती, त्यापैकी काही इतर राष्ट्रांच्या सीमेबाहेर देखील गेलेली होती.
 
बांधकाम हे यरुशलेमेच्या बाहेर घडले, जेथे हातोड्यांचा आवाज ऐकला जाणे शक्य नाही आणि खडकांच्या विशाल दगडांस चिरे पाडणे हे बांधकाम करण्याच्या ठिकाणी घडिले गेले नव्हते. केवळ तेव्हाच जेव्हा दगडांचे काही भाग तोडले व त्यास चिरे पाडले जात, त्यांना तुळतुळीत केले जात तेव्हाच त्यांना जहाजातून यरुशलेमेस पाठविले जात होते, जेथे कामगार त्या चिरे पाडलेल्या विशाल दगडांचा वापर करून एका विशाल अनाकलनीय कोड्यासारखे त्यांच्या व्यवस्थित बसणाऱ्या आकारानुसार एकांवर एक रचत असत.
 
हे विशाल बांधकाम जे सुरु होते ते पटाशी, हातोडा, करवत, किंवा खिळ्यांचा वापर केल्याशिवाय केले जात होते. हे सामान्यपणे विशाल बांधकाम ठिकाणी सामान्य असे होते की तेथे कर्कश आवाज गोंधळात टाकीत असे. तथापि, जेव्हा तुम्ही मंदिर टेकडीच्या बांधकाम करण्याच्या ठिकाणाहून चालत गेला असता, तुम्ही यापैकी कोणताही आवाज तेथे ऐकला नसता. त्याऐवजी केवळ विशाल दगडाचा आवाज जे विविध ठिकाणाहून यरुशलेम येथे आणल्या गेल्यावर त्यांना परिश्रमपूर्वक एकांवर एक रचले जात होते.
 
त्याचप्रमाणे, शुद्धीकरणाचे आवाहनात्मक काम हे बांधकामाच्या प्रत्यक्ष ठिकाणापेक्षा इतर ठिकाणी केले जात होते. आपण जेव्हा मंडळी उपासना, सभा, किंवा आध्यात्मिक संमेलन केंद्र हे अर्धे संपत आहे आणि आपण आपल्या आध्यात्मिक अनुभवाच्या शिखराजवळ पोहचत आहोत, तेव्हा आपण नेहमीच आपल्या स्वतःला शुद्ध करीत नाहीत. त्याऐवजी, शुद्धीकरणाची कठीण प्रक्रिया ही आपल्या जीवनात त्यावेळे दरम्यान घडते जे आपल्या जीवाची अगदी सखोलतेमध्ये परीक्षा घेते.
 
या भेटी दरम्यान हातोडा व पटाशीचा आवाज हा सतत ऐकला जातो, जे विशेषकरून बांधकाम करण्याच्या ठिकाणापेक्षा इतर ठिकाणी घडत असते. कापणे व खरडणे हे चर्च बाहेर व आपल्या शांत समया दरम्यान घडत असते. तथापि, याच ठिकाणी मोठे दगड (तुम्ही आणि मी) यांस चिरणे, तुळतुळीत करणे, तयार करणे आणि हातोड्याने त्या आकारात बनविणे घडत असते जे शेवटी व सिद्धपणे इतर दगडांबरोबर व्यवस्थित रचले जाते, जे आपल्याला मंदिर बनविते जेथे देव स्वतः निवास करतो. 
 
हातोडा किंवा पटाशी किंवा कोणतेही लोखंडाचे साधन तेथे वापरले गेले नाही याचे आणखी एक कारण महत्वपूर्णरित्या सूचित करते की देवाचे घर विश्रांतीचे ठिकाण आहे काम करण्याचे नाही.

3 सर्वशक्तिमान परमेश्वरा, माझ्या राजा, माझ्या देवा, चिमण्यांना आणि पाकोळ्यांना देखील घरे असतात. ते पक्षी तुझ्या सिंहासनाजवळ त्यांचे घरटे बांधतात आणि तिथे त्यांना पिल्ले होतात. 4 तुझ्या मंदिरात राहाणारे लोक खूप सुखी असतात.
ते नेहमी तुझी स्तुती करतात. (स्तोत्रसंहिता 84:3-4)
 
तुम्ही जर दगडाची वेदी बांधणार असाल तर ती चिऱ्याच्या दगडाची नसावी; जर वापरावयाचा दगड चिऱ्याचा बनविण्यासाठी तू त्याला कसले हत्यार लावशील तर ती वेदी मी मान्य करणार नाही. (निर्गम 20:25)
 
 हे देखील रूपकात्मक आहे की ते कृपेद्वारे बनविले गेले आहे आणि कामा द्वारे नाही.

Join our WhatsApp Channel

Chapters
  • अध्याय १
  • अध्याय २
  • अध्याय ३
  • अध्याय ४
  • अध्याय ५
  • अध्याय ६
  • अध्याय ७
  • अध्याय ८
  • अध्याय ९
  • अध्याय १०
  • अध्याय ११
  • अध्याय १२
  • अध्याय १३
  • अध्याय १४
  • अध्याय १५
  • अध्याय १६
  • अध्याय १७
  • अध्याय १८
  • अध्याय १९
  • अध्याय २०
  • अध्याय २१
  • अध्याय २२
मागील
पुढे
संपर्क
फ़ोन: +91 8356956746
+91 9137395828
व्हाट्स एप: +91 8356956746
ईमेल: [email protected]
पता :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
आमच्या सामाजिक नेटवर्कवर सामील व्हा!
Download on the App Store
Get it on Google Play
मेलिंग यादीमध्ये सामील व्हा
अन्वेषण
कार्यक्रम
थेट प्रसारण
नोहाट्यूब
टी.वी.
देणगी
डेली मन्ना
स्तुती
अंगीकार
स्वप्ने
संपर्क
© 2025 Karuna Sadan, India.
➤
लॉग इन
कृपया या साईट वर टिपणी आणि कंमेंट करण्यासाठी आपल्या NOAH खात्यावर प्रवेश करा |
लॉग इन