राजाने त्या देवाच्या माणसांस विनंती केली की, माझा हात पुनः पूर्ववत व्हावा म्हणून देव परमेश्वर याजकडे मजसाठी प्रार्थना करून त्याचा कृपाप्रसाद माग. देवाच्या माणसाने परमेश्वराची विनवणी केली तेव्हा राजाचा हात पुनः पूर्वस्थितीवर आला; तो पूर्वी होता तसा झाला.(१ राजे १३: ६)
हे दुर्दैवी आहे की यराबामचे देवाचे भय धरणे याने त्यास पश्चाताप करण्याकडे नेले नाही. तुम्ही याकडे लक्ष दिले काय की यराबाम ने देवाच्या माणसास प्रार्थना करण्यास कसे सांगितले? "कृपा करून परमेश्वर जो तुझा (लक्षात घ्या शब्द तुझा)देव याकडे विनवणी कर.
मला हे मनोरंजक वाटते त्याने असे म्हटले नाही, "कृपा करून आपला परमेश्वर याजकडे विनवणी कर." ते हे दाखविते की यराबाम हा देवाकडून किती दूर गेला होता.
तेव्हा तो त्यास म्हणाला, मीही तुझ्यासारखाच संदेष्टा आहे; परमेश्वराच्या आज्ञेवरून एक देवदूत मला म्हणाला, त्याला परत आपल्या घरी घेऊन ये, म्हणजे तो अन्नपाणी सेवन करील; पण हे त्याचे सांगणे खोटे होते.(१ राजे१३: १८)
तोच परमेश्वर ज्याने तुम्हाला काही विशेष गोष्ट करू नका असे म्हटले आहे तो दुसऱ्या कोणास तुम्हाला ते करण्यास सांगणार नाही. परमेश्वर सरळपणे तुम्हांला बोलेल.
जेव्हा परमेश्वर बोलतो, तेव्हा विषय पूर्ण होतो. देवाच्या वचनाचे पालन न करण्यात येथे कधीही बहाणा नाही. जरी सहकारी विश्वासणारा-जरी देवदूत स्वर्गातून उतरला-तो देवाचे वचन रद्द करू शकत नाही. (गलती १: ८-९ स्पष्टीकरण)
परीक्षा ह्या आश्चर्यकारक क्षेत्रातून येतात. राजाने देवाच्या मनुष्यास परीक्षेत टाकले की देवाच्या आज्ञेचे उल्लंघन करावे, परंतु देवाच्या मनुष्याने त्याचा नकार केला. तो दक्ष होता, आणि तेथे असा काही प्रश्नच येत नाही कीदुष्ट राजाबरोबर जेवण करण्या खातर देवाच्या माणसाने देवाची आज्ञा मोडावी.
तथापि, जेव्हाएक सहकारी संदेष्ट्याने देवाच्या माणसास पाप करण्यास परीक्षेत टाकले, तो त्यात फसला. त्याचा जागरूकपणा सोडला, आणि त्याने प्रामाणिक संदेष्ट्याबरोबर (तसे दिसणाऱ्या)जेवण करण्याखातर देवाची आज्ञा मोडली.
लोकांकडून येणाऱ्या परीक्षेसाठी सावध राहा जे विश्वासणारे आहे किंवा स्वतःला ख्रिस्ती म्हणतात
प्रथम, आपण प्रत्येक आत्मा किंवा भविष्यवाणीची परीक्षा करावी की ते परमेश्वराकडून आहे किंवा नाही (१ योहान ४: १-२. प्रत्येकव्यक्ति जो हा दावा करतो कीतो देवाच्या मनाच्या गोष्टी बोलत आहे हा आवश्यकपणे देवाकडून नसतो. काही हे सैतानाकडून आहेत, आपल्या विश्वासाला नष्ट करण्याचा हेतू आहे.
प्रभु येशूने उघडपणे पेत्राला झिडकारले, जेव्हा वधस्तंभाच्या आड उभे राहण्याचा त्याने प्रयत्न केला (मत्तय १६: २३). देवाचे वचन हे आपल्या आध्यात्मिक प्रवासात एक सूचक यंत्र आणि स्थिर स्तंभअसले पाहिजे.
तेथून निघून तो चालला असत वाटेने त्यास एका सिंहाने गाठून मारून टाकिले; त्याचे प्रेत वाटेत तसेच पडून राहिले आणि ते गाढव त्याच्यापाशी उभे राहिले, आणि सिंहही त्या प्रेताजवळ उभा राहिला.(१ राजे१३: २४)
दुष्ट राजाने त्याच्या मूर्तीपूजे मुळे न्यायाला तोंड दिले. आणि त्याचप्रमाणे देवाच्या माणसाने त्याच्या अवज्ञेमुळे न्यायाला तोंड दिले. कोणीही नियमाच्या वर नाही. मोठया पदासह मोठी जबाबदारी असते.
व्यक्ति जो देवाचे वचन आणतो तो सिद्ध मनुष्य नाही परंतु तरीही हे देवाचे वचन आहे, ते पाळण्यास सावध राहा.
Chapters