दावीद राजाआता वृद्ध व वयातीत झाला होता; ते त्याजवर पांघरुणे घालीत तरी त्याला ऊब येत नसे. तेव्हा त्याचे सेवक त्यास म्हणाले, आमच्या स्वामीराजासाठी एखादी तरुण कुमारी पाहावी, तिने तैनातीस राहून आमच्या स्वामीमहाराजाची शुश्रुषा करावी आणि त्यांस ऊब यावी म्हणून त्याच्या उराशी निजावे.
मग त्यांनी सर्व इस्राएल देशात एका सुंदर कुमारीचा शोध केला, तेव्हा त्यास शुनेमकरीण अबीशग नावाची एक कुमारी आढळली तिला ते राजाकडे घेऊन आले. (१ राजे १: १-३)
प्राचीन वेळेपासून, अनेकांना ह्या सुंदर तरुण मुलीला शलामोनच्या गीतरत्ने मधील शुलेमकरीण स्त्री बरोबर जोडावयास पाहिजे होते (गीतरत्ने ६: १३ आणि त्या अध्यायात).
"सिद्धांतनुसार, तिने दाविदाची सेवा केली, ती रोमांचकपणे त्याचा पुत्र शलमोन बरोबर सामावून गेली होती आणि नंतर त्याच्या कवितेचा विषयवस्तू झाली."
त्या समयी हग्गीथेचा पुत्र अदोनीया शिरजोर होऊन म्हणाला, मी राजा होणार. त्याने रथ, स्वार, व आपणापुढे धावण्यासाठी पन्नास पुरुष ठेविले. (१ राजे १: ५)
अदोनीया ने पवित्र शास्त्रातील आधारभूत सिद्धांताचे उल्लंघन केले होते-की परमेश्वराने आपणाला उंच करावे आणि हे नाही कीआपण स्वतःलाच उंच करावे.
कारण उन्नति ही पूर्वेकडून नव्हे, पश्चिमेकडून नव्हे व अरण्याकडूनही नव्हे;
तर न्याय करणारा देव आहे; तो एकाला खाली पाडितो व दुसऱ्याला वर चढवितो. (स्तोत्रसंहिता ७५: ६-७)
"प्रभूसमोर नम्र व्हा, म्हणजे तो तुम्हांस उच्च करील." (याकोब ४: १०)
परमेश्वर माझ्या स्वामीराजाबरोबर राहिला तसाच तो शलमोनाच्याबरोबर राहो, व त्याच्या गादीचा महिमा माझे स्वामीराजे दावीद याच्या गादीहून अधिक वाढवो. (१ राजे १: ३७)
मानवी स्तरावर, शलमोनाचे राज्य हे दाविदाच्या राज्यकारभारापेक्षा वास्तवात महान होते. परंतु आध्यात्मिक, सार्वकालिक स्तरावर, ते तसे नव्हते.
मग बथशेबा खोलीत राजाकडे गेली; राजा फार वृद्ध झाला होता; त्याची सेवा शुनेमकरीण अबीशग ही करीत होती. बथशेबेने राजास लावून मुजरा केला त्याने तिला विचारले, तुला काय पाहिजे?(१ राजे १: १५-१६)
जरी बथशेबा त्याची पत्नी होती तरी तिने तिच्या पदाचा हक्क गृहीतधरला नाही.
तेव्हा सादोक याजक, नाथान संदेष्टा आणि यहोयादाचा पुत्र बनाया हे करेथी व पलेथी यांस बरोबर घेऊन खाली गेले आणि शलमोनास दावीद राजाच्या खेचरावर बसवून गीहोन येथे घेऊन गेले.तेव्हा सादोक याजकाने सभामंडपातील तेलाने भरलेले शिंग घेऊन शलमोनास अभिषेक केला आणि कर्णा वाजविला; तेव्हा शलमोन राजा चिरायु होवो असा लोकांनी घोष केला.(१ राजे १: ३८-३९)
शलमोनाचा राज्याभिषेक सोहळा हा गीहोन ओहळाजवळ करण्यात आला.
ही तीच जागा होती जेव्हा आम्ही इस्राएल ला भेट दिली होती-हिज्कीयाची गुहा
Chapters