त्या दिवसांत बाप्तिस्मा करणारा योहान यहूदीयाच्या रानांत येऊन अशी घोषणा करू लागला की, पश्चाताप कर, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. (मत्तय ३:१-२)
पश्चाताप हा निर्णय आहे जो मन बदलण्याने होतो, जे मग पुढे उद्धेशआणि कृतीच्या बदलाकडे नेते.
त्याच्याचविषयी यशया संदेष्ट्याच्या द्वारे सांगितले होते की, अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी झाली की'परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा;
त्याच्या'वाटा नीट करा.' (मत्तय ३:३)
यशया संदेष्ट्याने योहान बाप्तिस्मा देणाऱ्या विषयी भविष्यवाणी केली होती (यशया ४०:३)
योहानाच्या पित्या (जखऱ्या) ने सुद्धा त्याच्या सेवाकार्या विषयी भविष्यवाणी केली होती
त्यामुळे पश्चातापास योग्य फळ उत्पन्न करा. (मत्तय ३:८)
कोण हे कसे जाणू शकतो की पश्चाताप का प्रामाणिक आहे?तो किंवा तिने पश्चाताप केल्याचा दावाकेल्यानंतर फळे जी ते उत्पन्न करतात त्याद्वारे.
आणि अब्राहाम आमचा बाप आहे, असे म्हणण्याची कल्पना आपल्या मनात आणू नका; कारण मी तुम्हांला सांगतो, ह्या दगडांपासून अब्राहामासाठी मुले निर्माण करण्यास देव समर्थ आहे. (मत्तय ३:९)
शारीरिक वंशातून येणे हे कोणालाही परमेश्वराच्या राज्यात स्थान असण्याची शास्वती देत नाही. केवळ याकारणासाठी कीतुमचे आई-वडील ख्रिस्ती आहेत त्याचा अर्थ हा होत नाही की तुम्ही आपोआप परमेश्वराच्या राज्यात प्रवेश कराल.
आणि आताच तर झाडाच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवलेली आहे; जे जे झाड चांगले फळ देत नाही ते ते तोडून अग्नीत टाकिले जाते. (मत्तय ३:१०)
"झाडाच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवलेली आहे"
परमेश्वर नेहमीचमूळ विषयास (मुख्य विषय)सोडवीत असतो तो दुसरे किंवा तिसऱ्या विषयाबाबत विचार करीत उगीचवेळ घालवित नाही.
तेव्हा योहानाच्या हातून बाप्तिस्मा घेण्याकरिता येशू गालीलातून यार्देनेवर त्याच्याकडे आला; परंतु योहान त्याला मना करीत म्हणाला, आपल्या हातून मी बाप्तिस्मा घ्यावा, असे असता आपण माझ्याकडे येता हे काय? येशूने त्याने उत्तर दिले, आतां हे होऊ दे; कारण ह्या प्रकारे सर्व धर्माचरण पूर्णपणे करणे हे आपणाला उचित आहे. तेव्हा त्याने तसे होऊ दिले.
मग बाप्तिस्मा घेतल्यावर येशू लागलाच पाण्यातून वर आला आणि पाहा, आकाश उघडले; तेव्हा त्याने परमेश्वराचा आत्मा कबुतरासारखा उतरतांना व आपणांवर येतांना पाहिला, आणि पाहा, आकाशातून अशी वाणी झाली की, हा माझा पुत्र मला 'परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे.' (मत्तय ३: १३-१७)
येशूचा बाप्तिस्मा का केला गेला?
जरी येशूचा बाप्तिस्मा हा योहान बाप्तिस्मा देणाऱ्याने केला, तो त्याचप्रकारचा नव्हता जसे इतर लोकांचा बाप्तिस्मा योहाना द्वारे केला गेला होता. योहानाचा बाप्तिस्मा हा 'पश्चातापाचा बाप्तिस्मा' होता, ज्यामध्ये पापाचा अंगीकार केला जात होता.
पुढील वचन हे स्पष्ट करते.
त्याप्रमाणे पापांच्या क्षमेसाठी पश्चाताप करून बाप्तिस्मा घ्यावा अशी घोषणा करीत बाप्तिस्मा करणारा योहान अरण्यात प्रगट झाला. तेव्हा सगळा यहूदीया देश व सर्व यरुशलेमकर त्याच्याकडे लोटले आणि त्यांनी आपआपली पापे पदरी घेऊन यार्देन नदीत त्याच्यापासून बाप्तिस्मा घेतला. (मार्क १:४-५)
कारण येशू पापी नव्हता की त्याची कबुली दयावी किंवा त्याविषयी पश्चाताप करावा, मगअशा प्रकारे बाप्तिस्मा होणे हे पुढील कारणासाठी होते:
त्याने एक पद्धत स्थित केली की ते सर्व जे त्याच्या मागे येतील ते परमेश्वर पित्याच्या इच्छेसाठी ते पाळतील. हे त्या कारणाद्वारे दर्शविते जे येशूने दिले: "आतां हे होऊ दे; कारण ह्या प्रकारे सर्व धर्माचरण पूर्णपणे करणे हे आपणाला उचित आहे." (मत्तय ३:१५)
म्हणजे तो इस्राएल ला प्रगट केला जाऊ शकतो.
हा माझा पुत्र मला 'परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे.'
प्रभु येशू ने अजून काहीही महान कार्य केले नव्हते तरीही पित्याने फार आदराने त्याची स्तुति केली. हे त्याचे आज्ञाधारकपण होते ज्यामुळे पित्याने त्याच्या वतीने असे म्हटले.
जॉन जी. लेक, देवाचा एक महान सेवक, याने नेहमी म्हटले आहे की, स्वर्गाचे गुप्त सामर्थ्य हे काही करण्यात नाही तर तसे असण्यात आहे.
Chapters