देवदूताने त्या स्त्रियांस म्हटले, तुम्ही भिऊ नका; वधस्तंभावर खिळलेल्या येशूचा शोध तुम्ही करीत आहा, हे मला ठाऊक आहे. तो येथे नाही; कारण त्याने सांगितल्याप्रमाणे तो उठला आहे. या, तो निजला होता ते हे स्थळ पाहा. (मत्तय २८:५-६)
जर ख्रिस्त उठविला गेला नाही तर आमची घोषणा व्यर्थ व तुमचा विश्वासही व्यर्थ (१ करिंथ १५:१४). आपल्या प्रभूच्या पुनरुत्थाना पेक्षा ख्रिस्ती धर्माला कोणतीही घटना ही अधिक टीकात्मक नाही; त्याची ऐतिहासिकता ही वास्तविकता आहे ज्यावर आपला विश्वास स्थिर राहतो किंवा पडतो.
येशूला प्रथम कोणी पाहिले?
मी हे म्हणेन की मरीया मग्दालीया ही पहिली व्यक्ति होती जिने पुनरुत्थित येशूला पाहिले. मी हे मार्क १६:९ वर आधारित करतो, कारण तेथे विशेषकरून म्हटले आहे की मरीया मग्दालीया ही विशेषकरून पहिली व्यक्ति होती जिने पुनरुत्थित येशूला पाहिले. योहान २०:१४ ह्या मतावर ठाम आहे.
त्या जात असतां, पाहा, पहारेकऱ्यांतील कित्येकांनी नगरांत जाऊन झालेले सर्व वर्तमान मुख्य याजकांस सांगितले. तेव्हा त्यांनी व वडिलांनी मिळून मसलत केली आणि शिपायांस पुष्कळ पैसे देऊन सांगितले की, आम्ही झोपेंत असतांना त्याच्या शिष्यांनी रात्री येऊन त्याला चोरून नेले, असे म्हणा; आणि ही गोष्ट सुभेदाराच्या कानावर गेली तर आम्ही त्याची समजूत घालून तुम्हांला निर्धास्त करू. मग त्यांनी पैसे घेऊन शिकविल्याप्रमाणे केले; आणि ही जी गोष्ट यहूदी लोकांमध्ये पसरवण्यात आली, ती आजपर्यंत चालू आहे. (मत्तय २८: ११-१५)
परुशी आणि मुख्य याजकांनी पिलाताला कबर सीलबंद करण्यास सांगितले होते, की त्याचे शिष्य त्याचे शरीर चोरून नेऊ शकणार नाही आणि मग हा दावा करावा की तो मृत्युमधून उठला आहे (मत्तय २६:६२-६६). तरीही जेव्हा येशू पुनरुत्थित झाला (२८:१-१०), त्याच्या विरोधकांनी पश्चाताप केला नाही, त्याऐवजी त्यांनी चोरीची कल्पना रचली की इस्राएल ला फसवावे (वचने ११-१५), सत्य स्वीकारण्या ऐवजीआपली लाजवाचविण्याकडे लक्ष लाविले.
मथ्यू हेन्री म्हणतात की, उत्तम प्रमाण लोकांना विश्वास पटवून देणार नाही जोपर्यंत पवित्र आत्मा त्यांच्यामध्ये कार्य करीत नाही.
इकडे अकरा शिष्य गालीलात जो डोंगर येशूने सांगून ठेविला होता त्यावर गेले; आणि त्यांनी त्याला तेथे पाहून नमन केले, तरी कित्येकांस संशय वाटला. तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे; तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा; त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नांवाने बाप्तिस्मा दया; जे काही मी तुम्हांला आज्ञापिले ते सर्व त्यांस पाळावयास शिकवा; आणि पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.
(मत्तय २८:१६-२०)
मत्तय च्या शुभवर्तमान मध्ये महान आज्ञा ही येशूचात्याच्या शिष्यांना शेवटचा संदेश होता. जेव्हा आपण परमेश्वराला आज सुद्धा त्याच्या मार्गदर्शना साठी धन्यवाद देतो, हा मुख्य संदेश आहे जो त्यास पाहिजे की त्याच्या शिष्यांनी लक्षात ठेवावा जी त्याची शेवटची आज्ञा होती.
शिष्य काय आहे?
एकव्यक्ति जो येशूच्या मागे चालण्यात शिस्तबद्ध आहे, जो येशू द्वारे बदलला आहे, आणि तो येशूच्या वचनास समर्पित आहे (मत्तय ४:१९).
शिष्य बनविणे म्हणजे काय?
शिष्य बनविणे हे एका आध्यात्मिक संबंधामध्ये प्रवेश करणे होय की लोकांना येशूवर विश्वास ठेवण्यास व त्याच्या मागे चालण्यात साहाय्य करणे आहे (मत्तय २८: १८-२०). व्यक्तिगत लक्ष देणे आणि ख्रिस्ती मार्गदर्शन करण्याद्वारे हे मुख्यतः आध्यात्मिक वडीलपण आहे. शिष्य बनविणे म्हणजे लोकाबरोबर कार्य करणे. तुम्ही केवळ चर्च ला येत नाही आणि उपासना संपल्यावर गायब होणे नाही. करुणा सदन मध्ये जे-१२ पुढाऱ्याचा हा पाया आहे.
आज, चर्च मध्ये अनेक नवीन पुढाकार घेतले जातात आणि त्यातकाहीही चूक नाही. तथापि, सत्य हे आहे कीमुलभूत स्तरावर शिष्य बनविण्यात आणि स्वतः शिष्य होणे यात अपयशी आहोत.
कारण#१
का अनेक ख्रिस्ती शिष्य बनवीत नाहीत?
हे ह्या कारणासाठी कीत्यांना स्वतःला कोणी शिष्य बनविलेले
नाही.
कारण#२
का अनेक ख्रिस्ती शिष्य बनवीत नाहीत?
हेह्या कारणासाठी की शिष्य बनविण्यासाठी तुमच्या सुविधाजनक स्थितीतून बाहेर पडायचे असते, त्यामध्ये कार्य करणे सामाविलेले आहे.
परमेश्वराला पाहिजे की आपल्याला जीवनात चांगल्या गोष्टी प्राप्त व्हाव्यात. तथापि, जेव्हा ख्रिस्ताची आज्ञा पाळणे मागची सीट सुखसुविधेचे जीवन घेते, तेव्हा सुखसुविधा हे मूर्तीपूजा होते. जीवनाच्यासुखसुविधा ने ख्रिस्ती मिशन ला आळशी नाही केले पाहिजे.
जर कारण हे एक ख्रिस्ती शिष्य बनवीत नाही याचे कारण की ते इतर मिशन व्यतिरिक्त कार्यात अधिक व्यस्त आहेत, मग ते शांतपणे परमेश्वराला हा संदेश देत आहे की त्याच्या मिशन पेक्षा 'त्यांच्या गोष्टी' ह्या अधिक महत्वाच्या आहेत.
चांगल्या शोमरोनी चेप्रेम त्यास प्रेरणा देते कीव्यक्ति जो रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत पडला आहे त्यासाठी कार्य करावे आणि त्यास वाचवावे (लूक १०:३३-३४). जर तुम्ही परमेश्वराला प्रेम करता, तर तुम्ही त्याच्या लोकांवर प्रेम कराल आणि हे तुम्हाला प्रेरणा देईल की देवाच्या मार्गात त्यांना साहाय्य आणि मार्गदर्शन करावे.
Chapters